केसात कोंडा होणे कारणे व उपाय (hair dandruff reson and solution )
कोंड होणे ही सर्वसामान्य त्वचा विकाराच्या प्रकारात मोडणारा विकार आहे.या विकाराचा परिणाम स्त्री व पुरुष या दोघात दिसून येतो .परंतु सरासरी तुलनेने पुरुष या विकाराने जास्त ग्रस्त असल्याचे दिसून येते.कोंडा म्हणजे आपल्या शरीरातील मृत पेशींचा साठलेला थर होय .हा थर पांढऱ्या भूशा प्रमाणे जास्त करून केसात तयार होतो.याच्या परिणामी केसात मोठ्या प्रमणात खाज येण्यास सुरुवात होते व खाजवल्यानंतर तो इतर ठिकाणी पसरतो.यामुळे आपल्याला कधी कधी लाजिरवान्या स्थितीला तोंड द्यावे लागते.याचा प्रसार केसा सोबतच शरीराच्या इतर भागात देखील होतो ,जसे डोळ्याच्या पापण्या शरीरावरील त्वचा ,नखे या अवयवान मध्ये तो पसरतो.अशा या कोंड्याच्या निर्माण होण्याची कारणे काय आहेत याचा विचार आपण या लेखाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत.कोंडा निर्माण होण्याची कारणे :
१)पोषण आहाराची कमतरता ;-
शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक अन्नातून आपल्याला मिळतात परंतु आवश्यक पोषक घटकांचा पुरवठा जर शरीराला झाला नाही तर शरीर कमजोर बनते व त्याचा परिणाम आपल्या केसावर देखील होतो व त्याचे पर्यावसन कोंडा व केस गळती होण्यात होते .
2)प्रदूषण :
आजकालच्या काळात प्रदूषणाची वाढलेली पातळी ही देखील केस गळती व कोंड्यासाठी कारणीभूत होते .प्रदुषणा मुळे केस गळती होऊन केसाच्या इतर समस्या सोबत कोंड्याची निर्मिती होते.हा कोंडा ओला व कोरडा असतो .कोरडा कोंडा हा अंगावर पडतो व सर्व ठिकाणी विखारतो .ओल्या कोंड्या मुळे डोक्यात जखमा होतात व पुंजक्यात केस गळतात व याचे पर्यावसन त्वचा रोगात होते.
३)केमिकल युक्त शाम्पू व साबण ;-
केमिकल युक्त शाम्पू व साबणाचा वापर केल्याने त्याचा परिणाम केसावर होतो .त्यामुळे केस गळती व कोंड्याची समस्या निर्माण होते .
४)ताण तणाव:-
ताण तणाव हा शरीरासाठी नेहमीच घातक असतो .तणावामुळे शरीराच्या इतर भागा बरोबरच केसावर देखील परिणाम होतो .यामुळे केसाचे आरोग्य बिघडते .केस गळती व कोंड्या सारख्या समस्या कितीही स्वच्छता बाळगली तरी निर्माण होतात .
५)थंड वातावरणाचा परिणाम :-
थंडीचा प्रभाव जस जस वाढत जातो तस तस केसात खाज येण्याचे प्रमाण वाढायला सुरुवात होते.संवेदनशील त्वचा असणारी व्यक्ती या काळात कोंड्यास लवकर बळी पडते .
कोंड्याच्या समस्येवर उपाय :-
केस धुणे :
केस नियमित धुणे ही केसाच्या आरोग्यासाठी महत्वाची गोष्ट आहे .केस जर नियमित धुतले गेले तर ते फंगस ला बळी पडण्यापासून वाचतात .केस धुताना क्षार युक्त पाणी असेल तर त्याचा वापर टाळावा.यासाठी कमी शारता असणारे पाणी वापरावे .कारण शार युक्त पाण्यामुळे केस फंगस ला बळी पडून ते तुटण्यास सुरुवात होते व कोंड्यास बळी पडण्याचा धोका वाढतो .
शाम्पूचा वापर :-
केमिकल युक्त शाम्पूचा अलीकडील काळात केस धुण्यासाठी सरास वापर होत असल्याचे दिसून येत आहे .या शाम्पू मुळे केस कोरडे होतात .केसाच्या मुळाशी असणारे तेलाचे प्रमाण कमी कमी होत जाते .केसाचे मुळे कमजोर होतात व केस गळतीचे प्रमाण वाढीस लागते व केसाच्या मुळाशी बुरशी युक्त पांढरा थर जमा होण्यास सुरुवात होते याचे पर्यावसन पुढे कोंड्यात होते.त्यामुळे केस धुण्यासाठी केमिकल युक्त शाम्पू चा वापर ण करता शिकेकाई,रिठा ,यासारख्या आयुर्वेदिक घटकांचा वापर करणे हितावह होईल .
पुरेशी झोप :-
शरीरासाठी पुरेशी झोप ही देखील गरजेची आहे .पुरेशा झोपेच्या अभावी शरीराला अंतर्गत क्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही व त्याचा परिणाम सर्व अवयवान केसावर देखील होतो व कोंड्यासारख्या समस्या उद्भवत्तात .यामुळे नियमित झोप ही आरोग्याचा जननी आहे याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे .
लिंबाचा वापर :-
लिंबा मध्ये सायट्रिक असिड चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते .ते केसाच्या पोषण साठी महत्वाची भूमिका बजावते त्यामुळे केस धुण्यासाठी अधून मधून लिंबाचा वापर करणे फायदेशीर ठरते .याच बरोबर दही व लिंबू यांचे मिश्रण देखील केसासाठी लाभदायक ठरते .
नियमित तेलाचा वापर करणे :
केसाच्या पोषणासाठी नियमित पने चांगल्या तेलाचा वापर करणे हितकारक आहे .यासाठी चांगल्या नारियल तेलाचा नियमित वापर करावा व केस विंचरताना धसमुसळे पणा ण करता केस विंचरणे गरजेचे आहे .त्यामुळे केस तुटण्याचे प्रमाण कमी होऊन ते कोंड्यास बळी पडण्याचे प्रमाण कमी होते
होमिओपथिक उपचार पद्धती ही सर्व बाबतीत उत्तम मानली जाते या पद्धती मुळे रोगाचे निर्मुलन होऊन रोग मुळा पासून बरा होण्यास मदत होते .यासाठी पुढील औषधांचा वापर केला जातो यामध्ये सल्फर (SULPHAR),थुजा (THUJA),अर्सेनिक आल्बम (ARSENIC ALBUMB ),लायकोपोडीयम (LYCOPODIUM)यासोबतच जबरन्डी तेलाचा वापर केस गळती व इतर समस्यात केला जातो .
होमिओपथिक औषधांचा जरी काही दुष्परिणाम नसला तरी यांचा वापर करण्यापूर्वी निष्णात डॉक्टर चा सल्ला घेणे कधी ही चांगले.