कान दुखीने त्रस्त आहात का?(Ear infection and solution)
कान दुखीचा अनुभव हा प्रत्येक व्यक्तीने कधीना कधी घेतला असेल व त्यामध्ये होणाऱ्या वेदना अनुभवल्या असतील .कान हा आपल्या पंचइंद्रियान पैकी एक महत्वाचा अवयव आहे.हा जर बाधित झाला तर त्याचा परिणाम आपल्या सर्व अवयवान वर होत असतो.कान दुखीमुळे डोके दुखी ,ताप,कानातून पु येणे यासारख्या समस्या निर्माण होतात .आज या लेखाच्या माध्यमातून आपण कान दुखी का होते व त्यावरील उपाय या वर चर्चा करण्याचा प्रयत्न करू यात.
कान दुखीची कारणे :-
१)हवेचा दाब:-
हवेच्या दाबाचा परिणाम कानाच्या बाह्य व अंतर्गत कानावर होतो .हा परिणाम हवाई उड्डाणा दरम्यान निर्माण होतो .या दाबा मुळे कानाच्या पडद्यावर दाब येऊन कान दुखतात .
2)कानातील मळ :
कानात वारंवार होणऱ्या मळामुळे कान दुखीची समस्या निर्माण होते.
3)घसादुखी :
घशात जर नियमित इन्फेक्शन होण्याची समस्या असेल तर त्याचा परिणाम कानावर होऊन कान दुखी सुरु होते
४)कायम सर्दी होणे :-
कायम सर्दी होण्याची समस्या असेल तर कान दुखी निर्माण होते
५)कानात पाणी जाणे:-
पोहण्याची सवय असेल व कानाची योग्य ती काळजी पोहताना घेतली नाही तर कानात पाणी जाऊ शकते व परिणामी कान दुखी सुरु होते.
६)दात दुखी :-
दात दुखी सुरु झाल्यानंतर त्याचा परिणाम कानावर होऊ शकतो व याच्या परिणामी कान दुखी सुरु होते .
७)कानातील एक्झिमा :
कानातील एक्झिमा कानासाठी घातक ठरतो व त्याच्या परिणामी ची सुरुवात कान दुखी पासून होते.
८)कान टोकारणे:
काही लोकांला कान टोकरण्याची सवय असते ,त्यामुळे कानाच्या आतील भागाला इजा होण्याचा धोका वाढतो ,व परिणामी कान दुखी सुरु होऊ शकते.
९)कान टोचणे :-
काही लोकांनल कान एका पेक्षा अनेक ठिकाणी टोचण्याची सवय असते .त्यामुळे ते अनेक ठिकाणी टोचतात त्यामुळे कानाला इजा होण्यचा धोका वाढतो व परिणामी कान दुखी सुरु होऊ शकते .
कान दुखीवर उपाय :
कान दुखित काही सामान्य घरगुती उपचार केले जातात यात प्रामुख्याने बर्फाने शेकणे .कानात पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.त्यामुळे पोहताना कानाचे पाण्यापासून संरक्षण करावे.कान टोकरण्याची सवय असेल तर ती बंद करावी कारण कधी कधी कानाला यामुळे गंभीर इजा होण्याचा धोका वाढतो व कानाचा पडदा निकामी होऊ शकतो .बेलाच तेल हे कानाच्या सर्व समस्यांवर एक रामबाण उपाय आहे.या तेलाच्या वापरा मुळे कान दुखी थांबून कान बरा होण्यास मदत होते .
होमिओपथिक उपचार पद्धती ही एक उपयोगी अशी औषध पद्धती आहे .या औषध पद्धती मुळे आजार नुसताच बरा होत नाही तर तो मुळा पासून बरा होतो .कान दुखीवर सर्वसाधारण पणे BELADONA (बेलाडोना ),PULSTILA (प्लस्टीला ),FERM PHOS (फेरम फॉस),CAPSICUM (कॅप्सिकम )या औषधींचा वापर लाभदायक ठरतो .
होमिओपथिक औषधांचा जरी काही दुष्परिणाम नसला तरी यांचा वापर करण्यापुवी निष्णात होमिओपथिक डॉक्टर चा सल्ला घेणे कधी ही लाभदायक.