पोट दुखी कारणे व उपाय (stomach infection cause and solution)

Homoeopathyandmagic in marathi language
0

 पोट दुखी कारणे व उपाय (stomach infection cause and solution)

 
विविध शरीरिक व्याधीचा रस्ता हा पोटाच्या मार्फत जात असतो .पोट म्हणजे आपल्या शरीरात उर्जा निर्माण करणारा एक प्रकारचा टर्बाईन आहे.हा टरबाईन जर व्यवस्थित चालला तर शरीर व्यवस्थित काम करते परंतु यात जर काही बिघाड निर्माण झाला तर मग मात्र ते कुरकुरायला लागते ,याच्या कुरकुरण्याकडे जर वेळीच लक्ष दिले नाही  तर मग मात्र गंभीर परिणामास सामोरे जावे लागते .त्यामुळे या समस्या कडे लक्ष देणे आवश्यक आहे.आज आपण या लेखाच्या माध्यमातून पोट दुखी ची कारणे व उपाय याचा उहापोह करण्याचा प्रयत्न करणार आहोत .
पोट दुखीची कारणे :-
१)जेवणाच्या  अनियमित वेळा :-
जर जेवणाच्या वेळा अनियमित  असतील तर अपचना सारख्या व्याधींना निमंत्रण आपसूकच मिळते .आपले शरीर देखील एक प्रकारचे वेळापत्रक पाहून चालत असते जर या वेळा पत्रकात काही कमी जास्त झाले तर पोट बिघडण्याचीसमस्या निर्माण होते .
२)शिळे अन्न :
आहारात शिळ्या अन्नाचे प्रमाण असेल किवा वारंवार शिळे अन्न खावे लागले तर त्याचा परिणाम पचन व्यवस्थेवर होऊन पोट बिघडते .
3)मांसाहार:
आहारात कायम मांसाहाराचा समावेश असेल तर पचन व्यवस्थेवर त्याचा ताण येतो व परिणामी कधी कधी पोट दुखीस समोरे जावे लागते .
४)पाणी कमी पिणे :
आहारात जेवणा सोबत पाणी देखील खूप गरजेचे असते हे दोन्ही घटक योग्य प्रमाणत असतील तर अन्न पचनास अडथळा निर्माण होत नाही परंतु काही लोक पाणी खूप कमी प्रमाणात पितात त्यामुळे अन्न अर्धवट पचते व पोटात वायू तयार होतो .अशी क्रिया नियमित होत राहिली तर त्याचा परिणाम पचन संस्थेवर होते व त्याचे पर्यावसन आतड्याचे इतर आजार होण्यात होते .
५)मुतखडा :-
मुतखडा जर पोटात तयार झाला तर त्याच्या परिणामी पोटात तीव्र वेदना सुरु होतात .व याचा इलाज केल्याशिवाय  ह्या वेदना कमी होत नाहीत 
६)अस्वच्छता :
आपण खात असलेले अन्न जर स्वच्छ नसेल तर त्याच्या परिणामी पोटात जंत सहज प्रवेश करतात याचा जास्त परिणाम लहान मुलांन वर होतो व ती सहजा सहजी आजारी पडतात कारण या मुलांच्या आहारात गोड पदार्थाचे प्रमाण देखील मोठे असते ,गोड पदार्था मुळे जंत निर्मिती लगेच होते .
७)आहारात तिखटाचे प्रमाण :
काही लोक मोठ्या प्रमाणात तिखट खातात किंबहुना ती त्यांची सवय होऊन जाते .या तिखटा मुळे पचन संस्था कमजोर होते व परिणामी पोट दुखीला आपसूकच निमंत्रण मिळते.
पोट दुखीवर उपाय :-
१)जिभेवर ताबा : 
जिभेवर जर ताबा ठेवला तर बर्याच आजारावर नियंत्रन येऊ शकते .आहार हा नियमित व साधा असावा तो आपल्या रोजच्या जीवन शैलीशी मिळता जुळता असेल तर पचना बाबत विकार निर्माण होत नाहीत व पोट दुखीची समस्या निर्माण होत नाही 
२)ताजे अन्न :
आहारात ताज्या अन्नाच प्रमाण राहील या कडे लक्ष देणे आवश्यक आहे .त्यामुळे पोटात इतर विकार अथवा बक्टेरिया निर्माण होत नाही .
३)घरगुती उपचार :
आल्यात  अनेक औषधी गुणधर्म असतातआल्याचा रस हा गुणकारी म्हणून ओळखला जातो आल्याच्या रसाचे सेवन केल्याने पोट दुखीस आराम मिळतो.
लिंबू देखील पचन व्यवस्था सुरळीत करण्यास मदत करते .लिंबाचा रस नियमित कोमट पाण्यात टाकून घेतल्याने पोटाच्या व्याधी बर्या होण्यास मदत होते.
लवंग देखील सर्व गुण संपन्न आहे पोटात निर्माण होनाऱ्या बद्धकोष्टता सारख्या समस्या वर लवंग गुणकारी आहे .
यासोबत पुदिना व केळी यांचा समावेश आहारात असेल तर आहार सर्व गुण संपन्न बनतो यात शंका नाही .
याबरोबर होमिओपॅथिक औषध पद्धती देखील उपचार करण्यासाठी योग्य आहे यामध्ये पोटाच्या समस्या वर कार्बो वेज (CARBOVEG),नायट्रीक असिड (NITRIC ACID).अर्सेनिक अल्बम (ARSENIC ALBUM),लायकोपोडीयम (LYCOPODIUM) या सारख्या औषधांचा वापर केला जातो .यामुळे पोटाच्या इतर समस्यान सोबतच बद्धकोष्टते सारख्या इतर समस्यांना पासून देखील सुटका होते .
होमिओपथिक औषध पद्धतीचा जरी काही दुष्परिणाम नसला तरी याचा वापर करण्यापूर्वी डॉक्टर चा सल्ला घेणे उत्तम.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)