गुडघे दुखीवर उपाय (knee joint pain solution)
माणुस तरूणपणात ईकडुन तिकडे आरामात उडया मारतो. डोंगर चढतो उतरतो. त्याला काही अडचण येत नाही. या काळात तो शरीराने सक्षम असल्यामुळे तो कशाचाच विचार करीत नाही. या काळात माणुस शरीराकडे देखील दुर्लक्ष करतो. खाण्यापिण्याच्या सवयी कडे देखील तो बघत नाही. काहीही अबळ गबाळ खातो. त्यामुळे शरीराला गरजेचे असलेले घटक त्याला मिळत नाही. त्यामुळे जसे वय वाढेल तसे शरीर कुर करायला सुरुवात करते. एक एक समस्या निर्माण होते. पूर्वी च्या काळी माणुस वय वाढले तरी धड धाकट राहात होता. अगदी ८० वर्ष वयाची व्यक्ती सुध्दा अत्यंत सक्षमपणे जीवन जगत होती. त्याला कुठल्याही शारीरिक समस्यांना शक्यतो तोंड द्यावे लागत नव्हते. आज काल च्या काळात जग फार वेगाने बदलत आहे. माणुस यंत्रा प्रमाणे केवळ धावत आहे. त्याच्या धावण्यासाठी काही धार बंद राहीलेला नाही. आजकाल ५० शी ओलांडली की गुडघे कुरकुरायला सुरूवात करतात. कधी कधी एक पाऊल देखील पुढे टाकणे कठीण होउन बसते. आज आपण या लेखाच्या माध्यमातून गुडघे दुखी व त्याला एकंदरीत जबाबदार असणारे घटक यांची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गुडघे दुखी चे कारण:-
१) वाढते वजन:-
वाढते वजन हे गुडघे दुखी साठी एक महत्त्वाचे कारण आहे. वाढत्या वजनाचा मोठा परिणाम आपल्या सर्व शारीरिक क्रिया हालचालीवर होत असतो. याचा थेट प्रभाव आपल्या गुडघ्यावर होतो त्यामुळे आपले गुडघे वजन सहन करण्यास असमर्थ ठरतात व परिणामी ते दुखायला सुरुवात करतात.
२) मार लागणे:-
जर आपण पडल्यामुळे वा इतर कारणामुळे गुडघ्याला मार लागला तर त्याच्यामुळे गुडघ्याचे स्नायू कमकुवत होतात व त्याचे पर्यावसन गुडघे दुखीत होते.
३) मैदानी खेळ:-
जर तुम्ही मैदानी खेळ खेळत असाल तर त्यामुळे तुमचे स्नायु आपसुकच कमजोर होत जातात. व गुडघे दुखीस आमंत्रण देऊन जातात.
४)वयाचा परिणाम:-
तुमचे जसे वय वाढत जाते तसे शरीरातील पोषक घटक कमी होत जातात व सांधे खिळ खिळे होतात. त्याचे परिणाम गुडघ्यावर होतात व गुडघे दुखायला सुरूवात होते. ही गुडघे दुखी एकदा सुरू झाली की, ती एकतर थांबत नाही किंवा कायम चिटकुन राहाते
गुडघे दुखी लक्षण:-
यात सुरूवातीला गुडघे लचक भरल्यासारखे दुखायला सुरूवात होते . नंतर हळूहळू चालायला त्रास व्हायला सुरुवात होते. काही कालावधी नंतर चालणे अवघड बनते जाते. पुढील टप्प्यात सुज यायला सुरवात होते व गुडघा सुजतो. व चालन आधाराशिवाय कठीण होउन बसते व माणुस काठीवर येतो. यात तरूण अथवा वयस्कर असा फरक होत नाही. एकदा व्याधी चिकटली की ती कमी अधिक प्रमाणात थोड्या फरकाने येतच राहाते
उपाय:-
१) वजनावर नियंत्रण:-
सर्व प्रथम सुरुवातीपासून आपण आपल्या तोंडावर ताबा ठेवला तर वजन आटोक्यात राहाण्यास नक्कीच मदत होते. वाढत्या वजनाचा परिणाम गुडघे दुखी वर होत असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे.
व्यायाम:-
वेळ मिळेल तसा शारीरिक व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या शरीराच्या सर्व स्नायू ला नवसंजीवनी मिळण्यास मदत होते.
आहार:-
आहारात कॅल्शियम युक्त घटक व परिपुर्ण आहार असेल तर शारीरिक पोषण योग्य रितीने होते.
आराम:-
आराम करणे हा सर्व व्याधीवर योग्य इलाज आहे. कधी कधी आराम केल्याने मार लागलेल्या लिंगामेंट दुरुस्त होतात.
शेकणे:-
बर्फाचा वापर करून आइस पॅक तयार करून त्यानी गुडघा शिकवले तर वेदना कमी होण्यास मदत होते
यासोबतच जर दुखण्यस आराम पडत नसेल तर गुडघा प्रत्यारोपण हा पर्याय अलिकडील काळात वापरला जातो.
होमिओपॅथीक उपचार पद्धती ही एक प्रभावी उपचार पद्धती आहे. या पद्धतीने आपण चांगल्या प्रकारे उपचार करु शकतो. यात ब्रायोनिया अल्बा (BRYONIA ALBA), रूस टॅक्स(RUS TOX), कोल्चीकम(COLCHICUM), अर्नीका(ARNICA) या औषधांचा वापर केला जातो.याच्या वापरा ने गुडघ्यास आराम पडुन तो बरा होण्यास मदत होते.
होमियोपैथिक औषधांचा जरी काही दुष्परिणाम नसला तरी वापर करण्या अगोदर डॉक्टर चा सल्ला घेणे कधीही चांगले.