मंदिर व मंदिर परिसरात तसेच देव घरातील कासवाचे काय महत्व आहे ?(WHT IS SIGNIFICANCE OF THE TURTLE IN THE TEMPLE AND TEMPLE AREA AS WELL AS IN THE HOUSE OF GOD?

Homoeopathyandmagic in marathi language
0

 मंदिर व मंदिर परिसरात तसेच देव घरातील कासवाचे काय महत्व आहे ?(WHT IS SIGNIFICANCE OF THE TURTLE IN THE TEMPLE AND TEMPLE AREA AS WELL AS IN THE HOUSE OF GOD?)





भारतात प्रत्येक गावा गावात आपल्याला विविध प्रकारची मंदिरे दिसून येतात .ही मंदीरे केवळ गावातच नाही तर शहरी भागात देखील दिसून येतात .आपण रोज जरी शक्य नाही झाले तरी आठवड्यातून एकदा तरी मंदिरात जातोच .याच बरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरी देवघर असते त्यांची आपण नित्यनियमाने पूजा करतो .या सर्व बाबत आपण एक महत्वाची बाब लक्षात घेतली आहे का या सर्व ठिकाणी आपल्याला कासव दिसून येते .मंदिरात परिसरात व मंदिराच्या दारात आपल्याला मूर्तीकडे तोंड करून कासव स्थितीप्रदने अवस्थेत असल्याचे दिसून येते .परंतु आपण कधी हा विचार केला आहे का ?कि हे कासव अशा अवस्थेत का मंदिराकडे तोंड करून स्थापित केले असेल ,या मागची पार्श्वभूमी या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू यात .

कासवाचे महत्व :-
कसव हा प्राणी स्थितीप्रज्ञ व सात्विक असा समजला जातो .कासव हा मुळात श्री विष्णूचा भक्त आहे श्री विष्णू च्या ठायी असणार्या असीम भक्ती च्या प्रभावामुळे श्री विष्णूने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत केली व त्याला वरदान दिले त्यामुळे मंदिराच्या बाहेर आपल्याला काही ठिकाणी कासवाची मान ही खाली झुकलेल्या स्थितीत दिसते याचा अर्थ कासवाचे लक्ष नेहमी देवाच्या पायाकडे असते.याच बरोबर काही मंदिरात कासवाची मान ही वर उंचावलेलीझाले दिसून येते . कासवाची ही वर उचावलेली मान हे कुंडलिनी जागृत झाल्याचे लक्षण आहे .कासवाची मान वर आहे म्हणजे त्याची कुंडलिनी जागृत आहे असा त्याचा अर्थ होतो .
कासवाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्टे म्हणजे ते संकट आल्यानंतर आपला बचाव करण्यासाठी आपली मान कावच्यात ओढून घेते .व स्वताचे संरक्षण करते .कासव हे काम, क्रोध,माया  ,वासना,या षड रिपू पासून मुक्त आहे .
तसेच ते पृथ्वी तलावरील सर्वात दीर्घ आयुष्य असणाऱ्या जीवन पैकी एक जीव आहे .
कासवाचे पिल्ल ज्या वेळी जन्म घेतात त्या वेळी त्यांची आई त्यांना काही खाऊ पिऊ घालत नाही.कासवाच्या मादीने केवळ पिल्ला कडे पहिले तरी त्यांची वाढ होते अशी वदंता आहे .
म्हणजेच कासव हा सर्व गुण संपन्न असा प्राणी असल्याचे एकंदर दिसून येते ,व त्याच्या या गुणामुळेच मंदिरात त्याची प्राण प्रतिष्ठापणा केल्याचे दिसून येते.

माणसाने कासवा पासून काय शिकावे ?
आपण मंदिरात प्रवेश करताना आपल्या नजरेस सर्व प्रथम कासव पडते ,त्याला नमस्कार करूनच आपण मंदिरात प्रवेश करतो .कासव ज्या प्रमाणे आपले अष्टांग अंग जमिनीवर टेकून देवा समोर नतमस्तक होते त्याच प्रमाणे माणसाने देखील पूर्ण समर्पण भावनेने देवा समोर नतमस्तक व्हाव हा त्या माघील मूळ हेतू आहे.कासव आपली नजर ज्या प्रमाणे परमेश्वर चरणी  लावून असते त्याच प्रमाणे आपण देखील आपले सर्व भाव परमेश्वर चरणी बहाल करावा हा त्या माघील मतीतार्थ आहे.संकट काळी ज्याप्रमाणे कासव स्वताचे रक्षण करण्यासाठी कवच वापरते त्याच प्रमाणे आपण देखील संकट काळात स्वताच्या रक्षणाची तयारी केली पाहिजे .
कासव हे एक प्रकारे इंद्रिया वर ताबा मिळवून स्वताच्या  सर्व गुण दोषा वर ताबा मिळवण्यात यशस्वी झाले आहे तशीच कृती मानवाकडून अपेक्षित आहे.
देव घरातील कासव :

कासव हा मंदिरा बरोबरच देव घरात देखील देवा सोबत प्रतिष्ठापीत केला जातो .या मध्ये प्रामुख्याने कासवाची मादी देवघरात ठेवली जाते या माघील महत्वाचे कारण म्हणजे कासवाची मादी ही केवळ आपल्या डोळ्यांनी बघूनच आपल्या पिल्लांचे पोट भरत असते त्या प्रमाणेच त्यांची प्रेमळ कृपा दृष्टी ही पूर्ण घरावर राहावी ही त्या मागील खरी भावना आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)