पुण्यातील भाजपचा आधार वड हरपला ...

Homoeopathyandmagic in marathi language
0

 पुण्यातील भाजप  खासदार गिरीश बापट यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले.



 शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी जगाचा निरोप  घेतला. ते ७२ वर्षांचे होते. खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून बापट आजारी होते. दरम्यान गिरीष बापट यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा आणि पत्नी आहेत. (GIRISH BAPAT PASS AWAY)गिरीश बापट यांच्या पार्थिवावर अंत्यविधी ७ वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहेत.


गिरीश बापट यांच्या पार्थिवावर सायंकाळी  ७ वाजता वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.या वेळी अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे
राजकीय जीवन प्रवास :-

गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट यांनी 1995 मध्ये आमदारकीची पहिल्यांदा निवडणूक लढविली अन्‌ पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले.यानंतर 1996 साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. पण बापट यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 मध्ये योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)