नाकातील हाड वाढणे कारणे व उपाय
साधारणत: ७५ टक्के सामान्य लोकांमध्ये नाकाचे हाड विविध प्रमाणात वाकडं असतं. बऱ्याच जणांना त्याची कल्पनाही नसते. म्हणजे थोडक्यात उरलेल्या २५ टक्के लोकांमध्येच हे हाड सरळ असतं. या वाकड्या हाडालाच सामान्यत: नाकाचं हाड वाढणं (DNS – Deviated Nasal Septum) असं संबोधलं जातं. ही वाढ कधी उजव्या, डाव्या किंवा दोन्ही बाजूला (Sinusoid) असते.
नाकाचं हाड वाढण्याच्या कारणात गर्भावस्थेत तसंच जन्माच्या वेळी नाकाच्या कूर्चामयी हाडावर दाब आल्यामुळे त्या थोडा बाक येतो. हाच पुढे वाढत जाऊन त्रासदायक रूप धारण करतो. तसंच नाकाला मार लागल्यामुळे नाकाचं हाड फ्रॅक्चर होऊन वाकणं आणि काही जन्मजात व्याधी (congenital) ही आणखी काही कारणं होत. जन्मजात व्याधी म्हणजे मार्फन्स सिंड्रोम, होमोसिस्टनि-युरिया ही होय.
नाकाचं हाड वाढलेल्या काही व्यक्तींमध्ये वारंवार नाक चोंदणं, रात्री त्याची तीव्रता वाढणं, वारंवार सर्दी होणं, ती पिकणं (rhino-sinusitis), शिंका येणं, नाकातून रक्त येणं, चेहरा/डोकं दुखी, घोरणं, नाकाला कोरड पडणं तसंच घाणेंद्रयिाच्या तक्रारी दिसून येतात. नाकाचं हाड तीव्र स्वरूपात वाढलेलं असल्यास ते बाकाच्या ठेवणीला बदलतात, त्यामुळे नाक विद्रुप दिसू शकतं.
नाकाचे हाड वाढण्याचे लक्षणे :
आपली चेहऱ्याची रचना ही नाक- कान -घसा या अवयव नी होते, जर नाकाला त्रास झाला, तर कानात, व कानाच्या पडद्यावर ही परिणाम होतो. तसेच घशाच्या टॉन्सिल्स वर ही परिणाम होतो, आपल्या त्याचे नाक -कान- घसा हे एकाच लाईनमध्ये असल्यामुळे, त्यांचा एकमेकांशी संबंध असतो. तर मग नाकाचे हाड वाढल्यास, त्यांची कारणे व लक्षणे कोणती येथे जाणून घेऊयात.
तुम्हाला सारखी-सारखी सर्दी होते,
श्वास घेताना अडथळा होतो,
नाकातून सारखे- सारखे पाणी येते,
डोकेदुखी होते,
कान दुखतात, घशामध्ये दुखते,
घोरण्याची समस्या वाढते,
नाकातून रक्त येतें,
नाकाचे हाड वाढते, त्या वेळी अंगात ताप येतो.
घशाचे व कानाचे विकार घडतात.
नाकाचे हाड वाढण्याची कारणे :
नाकातून हाड वाढण्याची, अनेक कारणे असू शकतात, ते आपण जाणून घेऊयात.
कारणे:-
१) लहानपणी जर तुम्ही नाकावर पडले असाल अशा, वेळी त्यांच्या नाकाचे हाड वाढते.
२) एखादा अपघात झाल्यावर, तुम्हाला चेहऱ्यावर जर मार लागला असेल, अशा लोकांना ही नाकाचे हाड वाढण्याची समस्या होऊ शकते.
३)जन्माच्या वेळी नाकाच्या कूर्चामयी हाडावर दाब येतो, तेव्हा नाकाचे हाड वाढू शकत
नाकाचे हाड वाढल्यास कोणते घरगुती उपचार करावे ?
आता वरील दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे, की नाकातले हाड वाढल्यामुळे कोणत्या या समस्या होतात, व त्याची कारणे नेमकी कोणकोणती, आता आपण नाकातले हाड वाढल्यास, कोणते घरगुती उपाय करायला हवे? ते बघूयात.
१) गाईचे शुद्ध तूप वापरून बघा :
हो, ज्या वेळी तुमचे नाकाचे हाड वाढते, अशावेळी तुम्ही घरचे गाईचे शुद्ध तूप वापरून बघायचे. त्याने तुम्हाला थोडा फायदा मिळेल. त्यासाठी तुम्ही रात्री झोपताना गाईच्या तुपाचे दोन थेंब उजव्या व डाव्या नाकात टाकावे. असे केल्यास तुमचे नाकाचे हाड वाढणे, ही समस्या हळू कमी होईल. शिवाय त्रास होणार नाही, कोरडेपणा येणार नाही, तुमच्या नाकातल्या आतील पडद्याला, ओलावा टिकून राहील.
२) सुंठ व रिठा चा वापर करून बघा :
ज्यावेळी तुमचे नाकाचे हाड वाढते, अशावेळी तुम्हाला सर्दी, डोकेदुखी, सायनस सारख्या समस्या भरपूर बघावयास मिळतात. अशा वेळी जर तुम्ही सुंठ आणि रिठा पावडर वापरली, तर तुम्हाला त्याने फायदा होईल. मग ते कसे तयार करावे, त्यासाठी तुम्हाला पाच ते सहा रिठा या तीन कप पाण्यात उकळून, त्यात पाव चमचा सुंठ पावडर उकळून घ्यावे, ते तीन कप पाणी हे तुम्हाला एक होई पर्यंत उकळायचे आहे, व त्याला एका सुती कपड्याने गाळून, ते एका बाटलीमध्ये भरवायचे आहे. त्यानंतर तुम्हाला रोज रात्री त्याची दोन ठेंब हे सात ते आठ दिवस, तुमच्या नाकात टाकायचे आहे. त्याने तुम्हाला फरक पडेल, करून बघा.
३) तुळशीचा रस वापरून बघा :
तुळशी अंती बॅक्टरियल, आंटी व्हायरल आणि ऑंटीसेप्टिक आहे. ज्यावेळी तुम्हाला सर्दी होऊन, नाकाला इन्फेक्शन होते, अशा वेळी जर तुम्ही तुळशीची पाने गरम पाण्यात उकळून, ते पाणी निम्मे होऊन, थंड करून एका बॉटलमध्ये भरून, त्याचा स्प्रे जर तुम्ही नाकाला मारला, तर तुमच्या नाकाच्या हाडाच्या शिवाय एलर्जीचे समस्या, तुम्हाला कमी होतील.
नाकाचे हाड वाढल्यास कोणता व्यायाम करावा ?
ज्यावेळी नाकाचे हाड वाढते, तेव्हा आपल्याला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. जसे की श्वास घ्यायला त्रास, धुळीची ॲलर्जी, शिंका येणे, नाकातून पाणी गळणे, रक्त येणे, यासारख्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. मग जर आपण एक साधा सोपा व्यायाम केला, तर त्याने आपल्याला हळू फरक पडू शकतो, तुमचे नाकाचे हाड वाढले असेल, अशावेळी जर तुम्ही अनुलोम-विलोम चा व्यायाम केला, तर त्याने तुम्हाला फरक पडेल, करून बघा.
ऑपरेशन करावे लागते का?
सहसा करून नाकाच्या हाडावर घरगुती उपाय हे जास्त प्रमाणात दिसत नाही, त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला हा नक्की घ्यावाच लागतो. अशावेळी तुम्ही होमिओपॅथी पण करू शकतात. तसेच जर तुमच्या नाकाचे हाड वाढले असेल, अशावेळी तुम्हाला डॉक्टर स्प्रे देतात, त्यावर गोळ्या देतात, आणि शिवाय ते आपल्याला ऑपरेशनचा सल्ला देतात. पण ऑपरेशन करूनही ही समस्या कायमची जात नाही, तिचा त्रास होतो त्याचा त्रास थोडा होतोच.
नाकाचे हाड वाढणे म्हणून नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी ?
अनेकांना प्रश्न पडतो, की नाकाचे हाड वाढले, तर किती दुष्परिणाम आपल्याला बघावयास मिळतात. मग जर नाकाचे हाड वाढले, तर मग त्यावेळी आपण नेमकी कोणती काळजी घ्यावी? चला तर मग जाणून घ्या.
१) नियमित नाकाला शुद्ध गाईचे तूप लावावे
२)रोज अनुलोम-विलोम व्यायाम करावा
३) रोज दूध हळद प्यावे,
४) तुळशी काळे मिरे आले दालचिनी यांचा काढा प्यावा,
५) जेवण झाल्यावर गुळ खावा,
६)रुमालाला निलगिरीचे तेल लावून, वास घ्यावे.
७)नियमित गरम पाणी प्यावे,
८) थंड पदार्थ खाऊ नका,
९) दही खाऊ नका,
१०)हिरव्या पालेभाज्या खा.
होमिओपॅथीक उपचार पद्धती:-
होमिओपॅथी ने ही समस्या हळू हळू मुळापासून नष्ट होण्यास मदत होते यात प्रामुख्याने calcaria carb, phosphorus, idom, thuja, calcaria phos या औषधांचा वापर केला जातो.