अन्नपूर्णा देवी देवघरात असणे किती आवश्यक आहे .

Homoeopathyandmagic in marathi language
0

अन्नपूर्णा देवी
अन्नपूर्णा देवी
अन्नपूर्णा देवी ही साक्षात पर्वतीचे रूप समजली जाते .आपल्या देवघरात अन्नपूर्णा असते. या अन्नपूर्णेला मान दिल्यास ती चांगले फळ देते. ज्यावेळी पृथ्वीवर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली, त्यावेळी पृथ्वीवर माता पार्वतीने अन्नपूर्णा देवीचे रूप घेऊन या संकटाचे निवारण केले.अन्नपूर्णा म्हणजे अन्न आणि पाणी यांची देवता. हिंदू परंपरे नुसार,मुलींचे कन्यादान करताना माहेरची माणसे आपल्या मुलीला अन्नपूर्णा देवीची मूर्ती भेट म्हणून कन्यादान करताना दिली जाते .नववधू सासरी प्रवेश करताना अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेऊन प्रवेश करते. त्यामुळे बहुतेक घरांमध्ये अशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते.

मूर्तीची देवघरात प्रतिष्ठापना कशी करावी;-


 आपल्या  घरामध्ये अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजा करण्याची विधी समजून घेवूया. अन्नपूर्णेला मान दिल्यास ती चांगले फळ देते. अन्नपूर्णा देवी ही साक्षात माता पार्वतीचे रूप आहे. ज्यावेळी पृथ्वीवर ज्यावेळी अन्नधान्याचा तुटवडा  निर्माण झाला त्यावेळी पृथ्वीवर माता पार्वतीने अन्नपूर्णा देवीचा अवतार घेऊन यावर मात केली होती.

देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही केवळ  अंथरलेल्या वस्त्रावर ठेवून देऊ नये.तर ती नेहमी  पितळाच्या  किंवा तांब्याच्या पात्रामध्ये किंवा वाटीमध्ये ठेवावी. सर्वात आधी ही प्लेट किंवा वाटी स्वच्छ करून घ्यावी आणि त्या पात्रामध्ये गहू किंवा तांदूळ किंवा कोणतेही एक धान्य घ्यावे.

पारंपारिक समजानुसार तांदूळ या धान्याला अन्नपूर्णा असे मानले जाते  तर तांदूळ हे पात्रामध्ये भरून घ्यावेत. त्या तांदळावर हळदी कुंकू अर्पण करावे. आणि मग माता अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला त्या तांदळावर बसवावे. अन्नपूर्णा माता ही स्वतः अन्नपूर्णा धान्याची माता आहे. त्यामुळे अशाप्रकारे धान्यामध्ये देवीची स्थापना करायला विशेष महत्व आहे.

प्रतिष्ठापनेनंतर करण्याचे विधी:-


देवीच्या पात्रातील धान्य हे दर आठवड्याला बदलावे. यातील काही धान्याचा भाग आपल्या घरामधल्या धान्यात मिसळावा, तर काही भाग पक्ष्यांना खाऊ घालावा. अशा या देवघरात ठेवलेल्या अन्नपूर्णा देवीची दररोज पुजाअर्चा, उपासना केली पाहीजे. देवीची पूजा करताना, अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र ही म्हणावे.

देवी स्तोत्र:-      दृश्याऽदृश्य-प्रभूतवाहनकरी ब्रह्माण्डभाण्डोदरी।

लीलानाटकसूत्रभेदनकरी विज्ञानदीपांकुरी।
श्री विश्वेशमन प्रसादनकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।

उर्वी सर्वजनेश्वरी भगवती माताऽन्नपूर्णेश्वरी।
वेणीनील-समान-कुन्तलहरी नित्यान्नदानेश्वरी।
सर्वानन्दकरी दृशां शुभकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।

आदिक्षान्त-समस्तवर्णनकरी शम्भोस्त्रिभावाकरी।
काश्मीरा त्रिजलेश्वरी त्रिलहरी नित्यांकुरा शर्वरी।
कामाकांक्षकरी जनोदयकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।

देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुंदरी।
वामस्वादु पयोधर-प्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी।
भक्ताऽभीष्टकरी दशाशुभकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।

चर्न्द्रार्कानल कोटिकोटिसदृशा चन्द्रांशुबिम्बाधरी।
चन्द्रार्काग्नि समान-कुन्तलहरी चन्द्रार्कवर्णेश्वरी।
माला पुस्तक-पाश-सांगकुशधरी काशीपुराधीश्वरी।
शिक्षां देहि कृपावलम्बनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।

क्षत्रत्राणकरी महाऽभयकरी माता कृपासागरी।
साक्षान्मोक्षरी सदा शिवंकरी विश्वेश्वरी श्रीधरी।
दक्षाक्रन्दकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी।
भिक्षां देहि कृपावलंबनकरी माताऽन्नपूर्णेश्वरी।।

अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरप्राणवल्लभे !
ज्ञान वैराग्य-सिद्ध्‌यर्थं भिक्षां देहिं च पार्वति।।

माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः।
बान्धवाः शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्‌!!

तर अशाप्रकारे देवीची पूजाअर्चा केल्यास, अन्नपूर्णा देवीची अखंड कृपादृष्टी  राहते. संसार सुखाचा, आनंदाचा, भरभराटीचा होतो. घरात सुखसमृद्धी नांदते. त्याचबरोबर त्या घरातील कर्त्या स्त्रीच्या डोक्यावर अन्नपूर्णा मातेचा वरदहस्त असल्याने तिच्या हाताने केलेल्या अन्नाला चवही खूप छान येते.असे म्हटले जाते की, ज्या घरावर अन्नपूर्णा देवीची कृपा किंवा अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते, त्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. त्या घरात सर्वजण निरोगी राहतात. अशाप्रकारे तुम्हीदेखील अन्नपूर्णा देवीची स्थापना आणि पूजा करावी

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)