केसर शेती करा आणि ३ लाख रुपये महिना कमवा

Homoeopathyandmagic in marathi language
0

 आजच्या काळात पारंपरिक शेती व पिक पद्धती एकंदरीतच खर्चीक व लहरी हवामानाच्या विळख्यात अडकलेली दिसून येते .त्यामुळे पारंपारिक शेतीला पर्याय शोधणे ही काळाची एक प्रकारे निकड बनली  आहे .शेतीला  पारंपारिकते बरोबर आधुनिकतेची जोड दिली तर शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते.अलीकडील काळात शेतीतीत नव नवीन प्रयोग होताना दिसून येतात त्या पैकी एक म्हणजे केसर (saffron)लागवड होय .

                           

      
केसर म्हटले कि आपल्याला आठवतो तो काश्मीर .काश्मीर शिवाय आपण केशर ची कल्पनाच करू शकत नाही .भारतात जवळ-जवळ  ९५ %केशर च उत्पन्न काश्मीर मध्ये घेतले जाते.सर्वसाधरण पणे केशर लागवड ही जून ऑगस्ट या कालावधीत केली जाते यासाठी समुद सपाटी पासून २००० ते २५०० कि .मी.उंची व थंड हवामान गरजेचे आहे.महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग महाबळेश्वर या ठिकाणी करण्यात आला होता व तो बऱ्यापैकी यशस्वी झाला असे म्हणावे लागेल हा प्रयोग कृषी विभाग च्या मध्यमातून राबविण्यात आला .या साठी काश्मीर मधील कीरत वाड या ठिकाणा हून २४०० रु किलो या दराने कंद आणण्यात आले होते.या केशराची परिपक्वते नंतर चाचणी घेतली असता ती काश्मिरी केशरा प्रमाणे असल्याचे दिसून आले आहे .यामुळे महाबळेश्वर च्या अर्थकारणाला  नवीन दिशा मिळण्याची अशा निर्माण झाली आहे.परंतु इतर ठिकाणची भोगोलिक परिस्थिती ही महाबळेश्वर प्रमाणे नाही त्यामुळे इतर ठिकाणी हे शक्य नाही .यासाठी एक नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे.ते म्हणजे 
ऐरोपोनिक(AIROPONIC FARMING )होय .

ऐरोपोनिक(AIROPONIC FARMING) काय आहे :-
एरोपोनिक्स ही वनस्पती वाढवण्याची एक पद्धत आहे ज्यामध्ये हवेत झाडे वाढवली जातात.यामध्ये हवेत वनस्पती वाढवून सघन शेतीला चालना दिली जाते.कमी जागेत व कमी पाण्यात या प्रकारात शेती केली जाते .ही पद्धत वापरून केशर लागवड करणे कुठे ही शक्य आहे .या साठी आपल्यला नियंत्रित तापमानाची गरज असते या साठी जर  रेफ्रीजीरेटेड कन्टेनर मिळाला तर उत्तम या प्रकारचा कन्टेनर जुना जर मिळाला तर तो ५ लाखांन पर्यंत मिळू शकतो या मुळे -१७ c पर्यंत तापमान नियंत्रित ठेवू शकतो .प्रकाश संस्लेश्नासाठी निळा,हिरवा ,पांढरा प्रकाश गरजेचा असतो या साठी led light चा वापर करता यतो .या पद्धती सोबतच आपण बंद खोलीचा देखील या साठी वापर करू शकतो .या प्रकारा मुळे अपाण तापमान 
-१६ c पर्यंत  नियंत्रित ठेवून तीन महिन्यात उत्पन्न मिळू शकतो.इनडोर शेती मुळे श्रम,खर्च ,रोग राइ यापासून सुरक्षा होते .त्यामुळे खर्चात बचत होते सर्वसाधारण एक किलो केशर १५००००-२०००००रु किलो दराने विकले जाते. त्यामुळे हा व्यवसाय नक्कीच फायदेशीर ठरू शकतो .त्यामुळे हा प्रयोग करून बघायाला हरकत नसावी .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)