गजांत लक्ष्मिचे देवघरातील महत्व

Homoeopathyandmagic in marathi language
0

गजांत लक्ष्मि देव घरात का असावी :- 

 प्राचीन धार्मिक हिंदू परंपरेनुसार हत्तीला स्थिर संपत्तीचे व वैभवा चे प्रतिक समजले जाते.आजही आपल्याकडे  दक्षिण भारतात मंदिरात हत्ती पाळण्याची परंपरा प्राचीन काळा पासून जोपासली जात आहे.आपल्या कडे विशेषतःकेरळ राज्यात घरातील संपत्ती स्थिर राहावी म्हणून हत्तीची जोडी पाळण्याची परंपरा कायम आहे.आजही आपल्यला बहुतेक देव घरात मंदिरात गजांत लक्ष्मि ची मूर्तीबघायला मिळते .आज आपण या माघे असणारी धार्मिक परंपरा जाणून घेण्याचा प्रयत्न करू यात.

गजांत लक्ष्मि आख्यायिका:-

गजांत लक्ष्मिची स्थापना का करावी या मागे एक आख्यायिका सांगितली जाते कि, दुर्योधनाने जेव्हा पांडवांचं राज्य हडप करून त्यांना वनवासाला पाठवलं होते , तेव्हा हे राज्य परत कसं मिळवायचं, याबद्दल भीमाने कृष्णाला विचारलं. तेव्हा कृष्ण म्हणाला, ‘जी व्यक्तीआपल्या घरात गजांत लक्ष्मीची स्थापना करेल त्याच्या घरीसंपत्ती कायम टिकूनराहील. तेव्हा तू गजांत लक्ष्मीला तुझ्याघरी स्थापन कर. गेलेलं राज्य तुला परत मिळेलआणि ते टिकूनही राहिल.’या उप्पर भीमानेकृष्णालागजांतलक्ष्मीकुठेमिळेल, असा प्रश्न केला त्यावर कृष्ण म्हणाला इंद्राचे वाहन असणारे हत्ती हाच मूळ गजांत लक्ष्मि आहे.त्याला प्राप्त करून जर तु तुझ्या दारात आणले तर 
तुला तुझं राज्य परतमिळेलआणि ते टिकूनहीराहिल.’ भीमानेइंद्राकडेजाऊनऐरावताचीमागणीकेली असता इंद्राने ऐरावत घेऊन जाण्यासाठी एक अट घातली की, 'जर तु याला उचलून घेऊन जाऊ शकला तर हा तुझा .भिमाने त्याची पूर्ण शक्ती पणाला लाऊन ऐरावत उचलून आपल्या दारात नेला.ज्यामुळे पांडव महाभारतातील युद्ध जिंकले 

गजांत लक्ष्मिवर शुभ चिन्ह कसे असावे:-

गजांत लक्ष्मीम्हणजे हत्तीची मूर्ती. ही मूर्ती सर्व शुभ चिन्हांनी परिपूर्णअसली पाहिजे . तिचा पुढचा उजवा पाय म्हणजे प्रगतीचं लक्षण, आत वळलेली सोंड म्हणजे संपत्ती राखणारी. यामूर्ती वर सोन्याचा वर्ख असावा. गंडस्थळावर गोमुखअसावं. तसंच कमलपुष्प, गणेश, हरिणआणिमोरा च्या प्रतिमा या लक्ष्मी वर कोरलेल्याअसाव्यात. अशा सर्व शुभचिन्हांनी परिपूर्णअसलेल्या गजांत लक्ष्मीच्या मूर्तीचं मुख उत्तराभिमुख असावं.

गजांत लक्ष्मिची स्थापना कधी करावी :-


गजांत लक्ष्मिची मूर्ती ही गुरु पुष्य मृत योगाच्या मुहार्तावर आपल्या घरातील देवघरात प्रतिषठीत  करावी जेणे करून आपलाल्या शुभ फळाची प्राप्ती होईल .आपल्या समस्याचे समाधान होईल .गजांत लक्ष्मिची पूजा करताना हा मंत्र पूजा करताना नित्य म्हणावा .

ॐ गृहलक्ष्म्यै नम:

ॐ श्रीं ह्रीं क्लीं।। 


या प्रमाणे नित्य पूजा पाठ केल्याने आपल्या समस्याचे निराकरण होऊन आपल्या जीवनातील अडथळे कमी होण्यास नक्कीच मदत होईल यात शंका नसावी .



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)