यूरिक एॅसिड वाढण्याची कारणे व उपाय

Homoeopathyandmagic in marathi language
0

 यूरिक आम्ल वाढण्याची कारणे व उपाय(Reson of uric acid growing and solution)


युरिक एॅसिड हे एक रसायनआहे आहे जे प्यूरीनच्या विघटनाने तयार होते.आपल्या शरीरातील मुत्रपिंड हा एक महत्त्वाचा घटक आहे.याच्या मार्फत  शरीर शुध्दीकरण करण्याचे महत्त्वाचे कार्य पार पाडले जाते.यातुनच प्यूरीनचे देखील शुध्दीकरण केले जाते.परंतु प्यूरीनचे प्रमाण जर वाढले तर किडनी फिल्टर प्रक्रीया पुर्ण करण्यास अयशस्वी ठरते व त्यांचे क्रीस्टल तुटुन ते हाडांच्या सांध्यात साठत जातात व यांच्या परिणामी अनेक दुष्परिणाम सुरु होतात नवनवीन रोगांना आमंत्रण मिळते.
युरिक एॅसिड तयार होण्याची कारणे:-
१)चुकीची जीवनशैली:-
आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक व्यक्तीच जीवन व्यस्त होत आहे त्याचे बरेवाईट परिणाम मानवाच्या शरीरावर होतात.यात खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा, झोपण्याची चुकीची वेळ, आहारात फास्ट फूड च वाढत प्रमाण.या काही बाबींचा परिणाम होतो.
) व्यसनाधीनता:-
आपण नीट समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला दिसुन येईल की,अलीकडील काळात पैसा वाढला पण  सोबत व्यसन देखील सोबत घेऊन आला.आजच्या काळात समाजात अनेक प्रकारची व्यसन केली जातात यात प्रामुख्याने अल्कोहोल सेवन धुम्रपान, वेगवेगळ्या ड्रगस चे सेवन याचा मुख्यतः वापर केला जातो.यामुळे शरीरात अनेक विषारी घटकांचे प्रमाण वाढीस लागते व त्यामुळे प्युरीन वाढते व त्याचा परिणाम किडनी वर होऊन तिची कार्य क्षमता मंदावते.व शरीरातील युरीक एॅसिडचे प्रमाण वाढते
३) जुनाट आजार:-
तुम्ही जर एखाद्या जुनाट व्याधीने ग्रसत असाल व त्यांचे उपचार सुरू असतील  तर त्याच्या औषधांचा परिणाम तुमच्या शरीरावर नक्कीच होतो व तुमच्या शरीरातील यूरीक एॅसिडचे प्रमाण वाढीस लागते.
४) पाण्याची कमतरता:-
जर पाणी पिण्याचे प्रमाण कमी असेल तर शरिरात मुत्र निर्मीती कमी प्रमाणात होते व विषारी घटक शरिरात साठत जातात व त्याच्या परिणामी युरीक एॅसिड ची निर्मिती होते.
५) अनुवंशिकता:-
अनुवंशिकता हा घटक देखील यात मोलाची भुमिका बजावत असतो आपल्या मागच्या पिढीत जर ही युरीक एॅसिड ची समस्या असेल तर त्याचा पुढील पिढीस त्रास होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
युरीक एॅसिड वाढीची लक्षण:-
युरीक एॅसिड ची लक्षण ही व्यक्तीपरत्वे बदलतात .काही लोकांना याचा भयंकर त्रास होतो तर काही लोकांना सौम्य त्रास होतो .यात प्रामुख्याने खालील लक्षण दिसुण येतात
१) सांधेदुखी
या स्थीतीत सांधे प्रचंड प्रमाणात ठणकतात.व सांधे सुजतात.हालचाल करणं देखील कठीण होऊन बसते.असह्य वेदना होतात.
२) लघवीचे प्रमाण वाढते:-जे
लघवी चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते.वारंवार लघवी ला जाण्याची समस्या निर्माण होते.यामुळे युरीनरी डिसीज निर्माण होतात.
३) हातापायांना सुज येणे:-
वाढत्या युरीक एॅसिड मुळे हातापाया वर हळूहळू सुज येऊ लागते व ते सुजतात यामुळे चालन देखील कधी कधी कठीण होऊन बसते.
४) किडनी विकार:-
वाढत्या युरीक एॅसिड चा परिणाम किडनी च्या कामावर होतो व किडनी हळूहळू काम करायचं बंद करते त्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो.त्याचबरोबर किडनीत स्टोन तयार व्हायला सुरुवात होते व ही समस्या वारंवार उदभवायला सुरुवात होते.
५) हलचाली ला मर्यादा पडतात . हालचाल करणं कठीण होऊन बसतं.
उपाय:-
वाढत्या युरीक एॅसिड च्या समस्येवर खालील उपाय केले जातात
१)पाणी पिण्याची सवय बदला:-
कमी पाणी पिणं हे बहुतेक आजाराचे मुळ आहे यासाठी भरपुर पाणी प्या.
२) आहारात बदल:-
योग्य वेळी व योग्य स्वरुपाच्या आहाराचा आपल्या रोजच्या आहारात. भावेश करा.शक्यतो बाहेरच तेलकट तुपकट खाण टाळा.योग्य प्रथिनयुक आहार घ्या.प्यूरीनचा समावेश असणार्या घटकाचे सेवन टाळा.
३)व्यायम:-
शरीराला योग्य व्यायामाची सवय असेल तर शरीर सुदृढ राहाण्यास मदत होते , त्यामुळे नियमित व्यायामाची सवय लावा.
होमिओपॅथिक उपचार पद्धती ही आरोग्यदायी उपचार पद्धती आहे.याच्या वापराने आजार हा मुळापासून नष्ट होण्यास मदत होते.वाढत्या युरिक एॅसिड वर COLCHICUM(कोल्चीकम),NITRIC ACID(नायट्रिक एॅसिड),THUJA(थुजा), LYCOPODIUM(लायकोपोडीयम) या औषधांचा वापर केला जातो.याच्या वापारानी. ही समस्या मुळा. पासून नष्ट होण्यास मदत होते.
होमिओपॅथिक औषधांचा जरी काही दुष्परिणाम नसला तरी याचा वापर करण्यापूर्वी होमिओपॅथिक तज्ञाचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)