अर्ध शिशी कारणे व उपाय(HALF VAIL RESON AND SOLUTION)

Homoeopathyandmagic in marathi language
0

       अर्ध शिशी कारणे व उपाय(HAIF VAIL REASON AND SOLUTION )

आजकालच्या धावपळीच्या जीवन शैलीत प्रत्येक माणूस हा व्यस्त झाला आहे व या व्यस्त जीवन च्या राहाटगाडग्यात फिरत राहातो त्याचे अनेक चांगले वाईट परिणाम त्याला सोसावे लागतात .याचा विपरीत परिणाम त्याच्या जीवन चक्रावर होतो.माणसाच्या शरीराला याची झळ नाही म्हटले तरी बसतेच .यामुळे अनेक व्याधी माणूस स्वता मागे लावून घेतो .यामध्ये कायम  जाणवणारी समस्या म्हणजे डोके दुखी होय.या डोकेदुखी बरोबरच अर्ध शिशी सारखी समस्या काही लोकांच्या माघे विशेष करून लागते .आज आपण या लेखाच्या माध्येमातून अर्धशिशी  व या माघील कारणे व उपाय यांची चर्चा करणार आहोत.

अर्धे शिशीची कारणे:-

       नाकाशी संबंधित संसर्ग होणे

       झोपेच्या अनियमित वेळा,वेळेत झोप न येणे

       अतिरिक्त वजन

     मानेच्या स्नायूंमध्ये ताण येणे /मणक्याला इजा पोहचणे

       अति काळजी / चिंता करणे

       जास्त डोकेदुखीची औषधे घेणे

       कॅफिनयुक्त पदार्थांचा अति प्रमाणात सेवन

       नैराश्‍य

       एका वेळचे जेवण न घेणे

            जेवणाच्या वेळा अनियमित असणे 

.           डोक्याला अपघात होऊन मार लागणे 

 

लक्षण :

- ह्या आजारात तीव्र स्वरूपाची डोकेदुखी.
-
डोक्याच्या  अर्ध्या भागातच डोकेदुखी असते.
-
वेदना हळूहळू वाढत जातात, हालचालीने वेदना वाढतात.
-
काही लोकांना डोकेदुखीसोबतच मळमळ होणे, उलटी होणे, आवाज सहन न होणे, प्रकाश सहन न होणे. ही लक्षणे आढळतात.
-
हा  त्रास साधारणत: २४ ते ७२ तासांपर्यंत टिकून राहतो.
-
स्त्रियांना  मासिक पाळीच्या वेळी किंवा हार्मोन्स प्रमाण कमी - जास्त होण्याने हा त्रास होतो.
-
काही  रुग्णांमध्ये डोकेदुखी होण्याच्या पूर्वी स्वत:ला होणार्‍या ठराविक लक्षणावरून माहित पडते की त्यांना मायग्रेनचा अटॅक येणार आहे

उपाय :

  • .सकाळी लवकर उठून अनोशा पोटी जिलेबी 2 वेडे व दूध पिऊन झोप घ्यावी. ह्याने डोकेदुखी बंद होते.
  •  या प्रमाणेच दुधमलई व साखर घेतल्याने फायदा होतो.
  • किमान ६-८ तास झोप  घ्यावी.
  •  vit. b complex घ्यावे.
  •  रात्री शक्यतो जागरण टाळावे.
  •  खोबर्‍याच्या तेलाने हळूवार मालिश करावी.
  •  पत्ताकोबीच्या पानाने मानेला व डोक्याला बांधून ठेवल्यानेही हा त्रास कमी होतो.
  •  जेवण वेळेवर घ्यावे.
  •  झोपताना टी. व्ही. बघू नये, शिवाय ह्या रुग्णांनी नेहमी अंधारमय खोलीतच झोपावे.
  •  मानेची स्ट्रेचिंग व्यायाम.
  •  बर्फाने शेकल्यावर मायग्रेन कमी होतो.
  •  आद्रक किंवा सुंट खाल्यास अजीर्णजन्य मायग्रेन बरा होतो.
  •  धन्याचे पाणी प्याल्यानेही मायग्रेनचा त्रास कमी होतो.
  •  ध्यानधारणा, दीर्घश्वसन केल्यानेही ह्यात आराम मिळतो.

आयुर्वेदिक उपचार :

आयुर्वेदात या आजारावर उपचार सांगितला आहे याचे नीट पालन केले तर आपण या विकारातून नक्कीच बरे होऊ शकतो.

आयुर्वेद शास्त्रानुसार आम्लपित्त - अजीर्ण ह्याची जी कारणे व लक्षणे सांगितलेली आहेत, तीच कारणे व लक्षणे ह्या आजारात पाहायला मिळतात. या आजारात शरीरातील दोष व लक्षणे बघून नाडी परीक्षा करून विशिष्ट प्रकारची शोधन चिकित्सा केली तर हा आजार आटोक्यात येऊ शकतो. मायग्रेनमध्ये दोषानुसार, वमन, विरेचन, रक्तमोक्षण, ह्यापैकी एका शोधन चिकित्सेचा उपयोग केल्यास फायदा होतो. ह्या आजारापासून सुटकाही होऊ शकते. काही दिवस आयुर्वेदातील पथ्यादी काठा, प्रवाळ इत्यादीसारखी औषधीसुद्धा घेतल्याने हा त्रास बरा होतो.

होमिओपथिक उपचार पद्धती ही एक प्रसिद्ध पद्धती आहे या उपचार पद्धतीच्या माध्यमातून आपण यावर कायम स्वरूपी इलाज करू शकतो.यात प्रामुख्याने BELADONA(बेलाडोना)GELSIUM(गेल्सिम),NUX VOMICA(नुक्स ओमिका)IGNITIA(इग्नीशिया) या औषधाचा वापर केला जातो.

होमिओपथिक औषधांचा जरी काही दुष्परिणाम नसला तरी याचा वापर करण्यापूर्वी होमिओपथिक तज्ञाचा सल्ला घेणे कधीही चांगले.

 

 


  
            

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)