मन शांती कशी प्राप्त करावी (PEACE OF MIND )

Homoeopathyandmagic in marathi language
0

 मन शांती  असणे ही जगातील सर्वात अमुल्य गोष्ट आहे जी कुठल्याही दुकानात विकत मिळत नाही .मन शांती आवश्यक असेल तर ती मिळवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागते .

  

परिस्थिती ला उघड्या डोळयांनी सामोरे जा :-

प्रत्येक मनुष्याच्या जीवनात चढ -उतार ,सुख-दुख यांचा पाठशिवणीचा खेळ हा सतत सुरु असतो .कधी दुख पुढे असते तर कधी सुख पुढे असते ह्या खेळात आपले मन हे पंचाच्या भूमिकेत असते .मन निकल कसा देते यावर आपल्या जीवन रुपी खेळाचा प्रवास अवलंबून असतो .मन जर तटस्थ राहिले तर परिस्थिती नियंत्रणात राहाते,मनाने जर दगाबाजी केली तर मग मात्र निकालत पक्ष पाती पणा होऊ शकतो व आपण जीवन रुपी सामना गमाउ शकतो यासाठी जीवना कडे उघड्या डोळ्यांनी बघणे गरजेचे आहे .जीवनातील सर्व प्रसंगाना धीराने समोरे जाऊन त्या वर धीराने मात करणे आवश्यक आहे .यासाठी खलील काही उपाय करणे आवश्यक आहे .

क्रिया -प्रतिक्रिया च्या चक्रात अडकू नका ;-

क्रिया प्रतिक्रिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत .थोडक्यात बोलायचे तर क्रिया प्रतिक्रिया या एकमेकाच्या सवती प्रमाणे आहेत .सवती मत्सर हा जसा वाईट तसेच क्रीयावर लगेच प्रतिक्रिया देणे हे देदेखील वाईटच .प्रतिक्रिया देणे पूर्वी अगोदर मनशांत ठेवने आवश्यक आहे .अशांत मानाने दिलेली प्रतिक्रिया ही नेहमीच घातक असते कधी -कधी याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतात ज्याची भरपाई खूप मोठी किमत चुकती करून देखील होत नाही .यामुळे आरे ला कारे व क्रियेला प्रतिक्रिया देणे नेहमी टाळावे.

मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करा :-

स्थिर मन व अति राग हे नेहमी विनाशास कारणीभूत असतात हे सांगण्यासाठी काही जोतीष्याची गरज नाही .आपल्या आचार विचारात असणारा तामसी पणा कमी करण्याचा प्रयत्न करा. यासाठी आपल्या आचरणात बदल करा .संगत गुण बदला .आहारात बदल करा ,नेहमी सत्विक आहार घ्यावा कारण जसा आहार तसा विहार तसाच आचार असतो .शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी असे जगत गुर तुकराम महाराज यांनी म्हटले आहे  त्याच प्रमाणे सात्विक व शांत मन हे शुद्ध आचरण व शुद्ध  विचारांचा पाया आहे ,त्यामुळे जर मन स्थिर असेल  भावना नियंत्रणात असतील तर सर्व  अशक्य वाटणार्यां गोष्टी सुलभ होऊ शकतात .

भोवतालची परीस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा :

आपल्या कृतीचा एकूण वर्तनाचा भोवतालच्या परिस्थितीवर आपण प्रभाव पाडू शकतो .यासाठी शांत मन ही फार महत्वाची बाब आहे .मन शांत असेल तर आपण निर्णय सक्षम पणे व योग्य प्रकारे घेऊ शकतो. जर आपण वाद झालेल्या जागेवर अथवा गुन्हा घड्लेल्या जागेवर गेलो तर आपली मानसिकता देखील त्या प्रमाणेच बनते याउपर आपण जर लहान मुल खेळत असताना त्याच्या जवळ बसलो  ते मुल आपल्याला पाहून हसले तर आपले मन देखील प्रसन्न होते .तसेच  आपण आपल्या मनावर जर नियंत्रण मिळवले तर आपण आपल्या सभोवती असणार्यां परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो .त्यामुळे मन स्थिर करा 

मन शांती साठी योगा हा योग्य पर्याय :-

दैनंदिन कामाच्या राम रगाड्यात  कौटुंबिक जबाबदाऱ्यातून  काही मिनिटे ध्यानासाठी कसे काढावे, असा यक्ष प्रश्न आपल्याला पडतो त्यामुळे  सकाळी लवकर उठणे हा यावर उत्तम  पर्याय आहे .सकाळी ध्यान करणे हे अशा साठी योग्य आहे की, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवसभर शांत रहाण्यास मदत मिळेल. जर तुम्हाला  दगदगीतून विश्रांती हवी असेल तर सायंकाळी चहापानाच्या वेळी देखील ध्यान करू शकता. ध्यानाचा कालावधी, ही एकच वेळ तुमची स्वतःसाठीची वेळ आहे जेंव्हा पंचेंद्रियांची सगळी कवाडे बंद करून, मनाची बकबक थांबवून स्वतः सोबत राहून गाढ विश्रांती मिळवू शकता.

ध्यान करण्यासाठी आवश्यक बाबी :-

  • शांत परिसर - शांत परिसरामध्ये ध्यान करणे योग्य. यामुळे अडथळे दूर होऊन, तुम्ही ध्यानामध्ये खोलवर जाऊ शकता.
  • नियमित ध्यान करा - दिवसातून दोनवेळा, सातत्याने ध्यान करणे उत्तम. यामुळेच प्रत्येक दिवसागणिक तुम्हाला ध्यानाचे सकारात्मक प्रभाव जाणवू लागतात.
  • साथीदारांसह ध्यान करा - आपल्या जवळच्या साथीदारांच्या सोबत समुहाने ध्यान करा, यामुळे तुमचे अनुभव सखोल बनतील, शिवाय तुम्हाला सातत्य ठेवणे मदतीचे होईल.
  • ध्यानापुर्वी हलके शारीरिक व्यायाम करा –यामुळे शरीरातील विविध अवयवांमधील ताण आणि तणाव निघून गेल्याने आरामदायी व्हाल आणि ध्यान आणखी आनंददायी बनेल.
  • विचारांचे निरीक्षण करा - विचारांना रोखण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना येऊ द्या. त्यामुळे ध्यान विनासायास बनेल.
  • घाई करू नका - दहा-पंधरा मिनिटांचे ध्यान होतेय नां पहा. डोळे उघडण्यासाठी घाई करू नका.
  • पोट भरलेले  नाही ना, याची खात्री करून घ्या. कारण पोट टच्च असल्यास झोप येते.

  • ध्यान करण्याचे फायदे :-
  • १. ध्यान आपल्याला मानसिक रित्या कणखर  बनवते, ज्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीतआनंदी राहू शकतो.

    २. आपल्याला मनसिक शांती प्राप्त होते त्यामुळे  भोवतालच्या  वातावरणावर आपला  सकारात्मक प्रभाव पडतो 

    ३. भावनिक लवचिकता वाढते.

    ४. प्रतिक्रिया व्यक्त करणे कमी होते. प्रतिसाद देण्याची क्षमता वाढते.

    ५. मनाला पडणारा  ताण-तणाव कमी  होऊन मन शांतीच्या दिशेने आपण वाटचाल करू लागतो . त्यामुळे निरोगी मन, निरोगी आयुष्य ,मन शांती यासाठी ध्यान नक्कीच लाभ दायक आहे .

     

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)