नायटा का होतो? कारणे व उपचार(Ring worm cause and treatment)
नायटे निरनिराळ्या प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर, जांघेत, कमरेवर दगडफूलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यात त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य करणे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, एकमेकांचे कपडे वापरणे इ. अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपड्याखाली नीट स्वच्छता राहत नाही. याठिकाणी खरुज, नायटा वाढतात. कडा असलेल्या गोलाकार स्वरुपात त्वचेवर उठणारा नायटा हा एक प्रकारच्या बुरशी, आळब्यासारख्या सुक्ष्म शेवाळामुळे होणारा रोग आहे. चामडीच्या कोणत्याही भागावर गोलाकार चट्टे उठतात. पण विशेषतः काखा, जांघा, बोटांच्या मधील भाग इ. नेहमी ओलसर राहणाऱ्या जागांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. आपल्याकडे डोक्यामध्ये होणाऱ्या नायटाचे प्रमाण त्यामानाने कमीच आहे. कंबर व जननेन्द्रियाजवळील भागाला सुद्धा नायटा होतो. हे चट्टे गोलाकार असल्यामुळे त्यांना रिंग वर्म म्हणतात. त्यांना कमालीची खाज सुटते. जर हा चट्टा केसात झाला तर केस जावून तेवढया ठिकाणी टक्कल पडते आणि नखांवर झाला ते नखे वर उचलली जाऊन खरखरीत व वाकडी होता.
कारणे:-
याचे मुख्य कारणे म्हणजे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई,एकमेकांचे कपडे वापरणे, इत्यादी. नायटयाची वाढ वेगाने होते, पण कातडीवर बधिरता मात्र नसते. यावरून कुष्ठरोगापासून हे आजार वेगळे ओळखता येतात. बुरशीजन्य त्वचेचे संक्रमण आपल्या शरीरावर कोठेही होऊ शकते. बुरशी हवा, माती, पाणी आणि वनस्पतींमध्ये राहू शकते. अशाही काही बुरशी आहेत जी मानवी शरीरात नैसर्गिकरित्या जगतात. नायटा / गजकर्ण निरनिराळया प्रकारचे असू शकतात. ह्यामध्ये नेहमीच आणि वारंवार दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर,जांघेत कमरेवर पसरणारा नायटा. यांत त्वचा काळवंडते आणि त्या भागात खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो.
लक्षण:-
त्वचेवर लालसरपणा
अंगाला खाज सुटणे
अंगावर सूज येणे
अंगाला फोड येणे
हा आजार कंबर, पोट, मांड्या, जांघा इ. भागात जास्त करून होतात.खूप खाज सुटते व नायटाची वाढ वेगाने होते.
पण कातडीवर बधीरता मात्र नसते.
संपूर्ण जगात गजकर्ण ह्या रोगाचे संक्रमण सामान्य आहे. मानवांमध्ये, जेव्हा एखादी आक्रमण करणारी बुरशी शरीरातील एखाद्या भागाचा ताबा घेते आणि रोगप्रतिकारक शक्तीचे नियंत्रण करण्यास सुरुवात करते तेव्हा बुरशीजन्य संक्रमण अधिक उद्भवते.
उपाय:-
नखे कापावीत.
नायटा झालेला भाग साबण व स्वच्छ पाण्याने रोज धुतला तर हा रोग बरा होतो.
हेक्झाक्लेरोफिन असलेल्या साबणाचा जास्त उपयोग होतो.
घामाने भिजलेले सगळे कपडे नेहमी बदलावेत व स्वच्छ धुवून कोरडे असतांना वापरावे.
नायटा झालेली जागा नेहमी स्वच्छ ठेवून ती सुर्यप्रकाशात राहील असा प्रयत्न करावा. १ भाग सल्फर व १० भाग तेल यांचे मिश्रण करून नायटा झालेल्या जागी लावावे.
बाजारात मिळणारी नायटा, गजकर्ण विरोधी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.
डोक्यात खवडे झाले असल्यास बाजारात मिळणारी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावीत.
डोक्यातील नायटा पाण्याचा शेक देऊन तेथील केस उपटून वरील औषधांचा उपयोग करावा.
डोक्यात नायटा झाला असल्यास बाजारात मिळणारी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावीत.
हळदीची पूड खोबरेल तेल किवा पाण्यात मिसळून लावावे
त असते आणि जाड असते.
नायटा मुळापासून दूर करण्यासाठी घरगुती उपचार
१)त्रिफळा
ते बारीक करून त्याची पावडर करा. या पावडरमध्ये मोहरीचे तेल, देसी तूप, थोडी फिटकरी, आणि पाणी घालून मलम तयार करा. हे मलम नायट्यासाठी रामबाण औषध आहे.
२)हळद
हळदीमध्ये दाहक आणि अँटी – बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जी आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच बुरशीजन्य संसर्ग रोखणारे अँटी फंगल आहे, यासाठी हळदीत पाणी घालून पेस्ट तयार करा. त्यानंतर नायटा असलेल्या ठिकाणी ते लावा आणि सुकू द्या. अंतर्गत फायदे घेण्यासाठी आपण हळद पाणी किंवा हळदीचा चहा देखील पिऊ शकता.
३)सफरचंद व्हिनेगर
सफरचंद व्हिनेगर हा नायट्यावर अतिशय प्रभावी उपाय आहे, त्यात खूप मजबूत अँटीफंगल गुणधर्म आहेत, ते प्रभावित क्षेत्रावर फार लवकर परिणाम करते.नायटा बरा करण्यासाठी सफरचंद व्हिनेगरमध्ये कापूस भिजवून आपल्या त्वचेवर लावा, आपल्याला नायट्यापासून आराम मिळेल, आपल्याला हे दिवसातून तीन वेळा करावे लागेल.
४)कडुलिंबाच्या झाडाची पाने
क्वचितच असे कोणीही असेल की त्याला कडुलिंबाच्या फायद्यांबद्दल आणि उपचारात त्याच्या वापराबद्दल माहिती नसेल. त्याचा प्रत्येक कण मानवी शरीरासाठी एक ना एक प्रकारे उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे कडुलिंबाची पाने नायट्याच्या उपचारातही उपयुक्त ठरतात. त्याच्या वापरासाठी कडुनिंबाची पाने पाण्यात उकळवून आणि रोज आंघोळ केल्याने नायट्यावर आराम मिळतो.
५) लिंबू
आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे हे खूप प्रसिद्ध आहे, म्हणून दिवसातून सुमारे 4 वेळा नायटा खाजवा आणि त्यावर लिंबाचा रस लावा, या उपायामुळे थोडी जळजळ होईल, परंतु हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे आणि तो नायटा पूर्णपणे नष्ट करतो.
६)बथुआ
त्वचेच्या रोगाच्या बाबतीत, बथुआचा वापर करावा, याचा वापर करण्यासाठी प्रथम ते वेगळे करा व रस वेगळा करा आणि नंतर त्याचा रस दररोज प्यावा आणि बथुआची भाजी देखील खावी.
कच्चा बटाटा नायट्याच्या उपचारात खूप उपयुक्त ठरतो. कच्च्या बटाट्याचा रस पिल्याने नायट्यावर चांगला आराम मिळतो आणि त्वचा सुधारण्यासही मदत होते.
७)ओवा
नायट्याच्या उपचारात ओव्याचा वापर खूप उपयुक्त आहे. ओव्याला पाण्यात मिसळा आणि या पाण्याने नायटा धुवा. कोमट पाणी घ्या आणि त्यात ओवा बारीक करून पेस्ट तयार करा आणि नंतर सुमारे एक आठवडा ती पेस्ट नायट्यावर लावा.
८)आवळा
आवळ्याचे साल काढून टाकल्यानंतर आणि त्याच्या गुठळ्या जाळल्यानंतर त्याच्या भस्मात नारळ तेल मिसळून खाज सुटणाऱ्या जागेवर लावल्याने खाजेची समस्या दूर होते. शरीराच्या ज्या ठिकाणी नायटा आहे, तेथे लावा.
९)कोरफड
कोरफडचा अर्क सर्व प्रकारचे बुरशीजन्य संसर्ग बरे करतो. तो तोडून थेट नायट्यावर लावा. शक्य असल्यास रात्रभर ठेवा. कोरफडीचे नियमित सेवन आणि प्रभावित भागावर लावल्याने नायट्यापासून आराम मिळतो.
नायटा टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?
नायटा व त्यासारखे चामडीचे बुरशीजन्य इतर विकार सांसर्गिक असल्यामुळे एकाकडून दुसऱ्याला चटकन होतात, ते टाळण्यासाठी पुढील गोष्टी कराव्यात.
नायटा झालेल्या रुग्णाला वेगळे झोपवावे.
एकच फणी व एकमेकांचे कपडे ( स्वच्छ धुऊन वाळविल्याशिवाय) वापरू नयेत.
नायटा झालेल्या रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर उपचार करावेत.
बाह्य उपचारांबरोबरच पोट सुद्धा साफ असणे गरजेचे आहे. त्वचा नेहमी कोरडी राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.
होमिओपॅथीक उपचार पद्धती:-
प्रत्येक आजारात होमिओपॅथीक उपचार पद्धती ही अत्यंत अप युक्त आहे या उपचार पद्धती मुळे आजार मुळा पासुन नष्ट होतो व तो पुन्हा होण्याची शक्यता कमी होते. होमिओपॅथी मध्ये नायट्यासाठी पुढील औषधांचा वापर केला जातो
Arsenic album, Sulphur, Thuja, Dulmar Sepia, Rustox या औषधांचा प्रामुख्याने वापर केला जातो.