आजचा दिन विशेष (दि ;६ एप्रिल)

Homoeopathyandmagic in marathi language
0

 आज आपण आज काय विशेष या सदरात आजच्या दिवशी घडलेल्या काही ठळक घटनाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज दिनांक ६ एप्रिल २०२३

६ एप्रिल २०२३ :-आज हनुमान जयंती .हनुमान जयंती ही हिंदू धर्मियान मध्ये पूर्ण उत्साहात सर्व जग भरात साजरी केली जात आहे .आपल्या भारत वर्षात व संपूर्ण जगतात आजरा अमर झालेली जे  काही महान अवतार आहेत ,त्यामध्ये  राम भक्त हनुमान हे अग्रस्तानी आहेत त्यांची आज जयंती 


६ एप्रिल १८१४ : फ्रान्सचा अनभिशक्त सम्राट नेपोलियन बोनापार्ट याला फ्रान्स च्या गाधीवरून पायउतार व्हवे लागले व त्याची रवानगी निर्मनुष्य आशा एल्बा बेटावर करण्यात आली .तिथून देखील त्यांनी पालायन करण्यचा प्रत्यन केला परंतू बंडाचा हा प्रयत्न देखील फारसा यशस्वी होऊ शकला नाही .एके काळी जगाचा नकाशा बदलण्याची ताकद असणारा सम्राट पण उतार वयात शेवटी तुरुंगवासच आला .

६ एप्रिल १९१७:-पहिल्या महायुद्धाची सुरवात झाल्यानंतर पंचाच्या भूमिकेत असणाऱ्या अमेरिकेने जर्मनी विरोधात प्रत्यक्ष  युद्धात सहभागी होण्याचा निर्णय घेतला ज्या मुळे युद्धाच पारड फिरलं व जर्मनीचा पराभव झाला .यातूनच या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हिटलर रुपी भस्मासुराचा जन्म झाला व त्याने सर्व जगला दुसऱ्या महायुद्धाच्या अंधकार मय खाईत लोटून दिले ज्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागल्रे .

६ एप्रिल १९१९:-महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात आल्यानंतर त्त्यांनी भारत भ्रमण करण्यास सुरुवात केली .या काळात त्यांनी लोकांन पर्यंत सत्याग्रह हा शब्द प्रयोग त्याची तत्व यांचे महत्व पोचविण्याचा प्रयत्न केला .यामध्ये चंपाअरण्या सारख्या छोट्या सत्याग्रहाचा समावेश होता .त्त्यांनी व्यापक स्वरुपात सत्याग्रह करण्यासाठी लोकांनला तयार करण्यास सुरुवात केली यातूनच असहकार चळवळ यासारख्या व्यापक चळवळीची पाया भरणी केली गेली.

 .


६ एप्रिल १९६६:भारतीय जलतरणा तील हा दिवस एक क्रांतिकारी दिवस होता भारतीय  जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली. इंग्लिश खाडीसह जगातील अनेक खाड्या पार करण्याचा भीमपराक्रम मिहीर सेन यांनी केला आहे.

६ एप्रिल १९८०: जगातील सर्वात मोठी पार्टी असा नावलवकिक मिळवणार्या भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले. यानंतर १९८४ मध्ये झालेल्या ८ व्या लोकसभा निवडणूकांमध्ये या पक्षाला दुसर्‍या क्रमांकाची मते मिळुनही फक्त दोनच जागा मिळाल्या.परंतु या पक्षाने जिदीने उभे राहत संघटन कौशाल्याचा खुबीने वापर करून २०१४ मध्ये सत्ता पालट करून पूर्ण बहुमतातील सरकार बनवले व नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान बनले .


६ एप्रिल १९९८: भारतापर्यंत सहज पोहोचू शकणार्‍या हवेतून जमिनीवर मारा करू करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.

६ एप्रिल २०००:रशियन स्पेस एजेन्सी ने मीर’ या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले ’सोयूझ’ हे अंतराळयान ’मीर’ला भेटले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)