एरंड शेतीचे फायदे(Benifits of castor farming)

Homoeopathyandmagic in marathi language
0

 एरंड शेतीचे फायदे(Benifits of castor farming)


 एरंड हे नाव ऐकलं की आपल्या समोर केवळ बांधावर वाढणार,उकीरडयावर वाढणार एरंड येत.आपण ह्या झाडाकडे केवळ निरूपयोगी बिन कामाच असंच म्हणुन पाहात आलो आहोत.याचा व्यवसायीक कारणासाठी काही वापर होऊ शकतो व त्यातून उत्पन्न मिळवले जाऊ शकते असा विचार आपण कधी केला आहे का तर नाही.
पूर्वी पेक्षा आज कालच्या काळात पारंपरिक पद्धतीने शेती करणे कठीण होतं चालले आहे.शेतीचे आधुनिकीकरण होत आहे परंतु या आधुनिकीकरणात खर्च व उत्पन्नाचा मेळ घालणं कठीण होतं चाललं आहे.कधी निसर्गाच्या अवकृपेमुळे,तर कधी भावाची शाश्वती नसल्यामुळे शेती दिवसेंदिवस खर्चीक होत चालली आहे, परिणामी शेती तोट्याचा व्यवसाय बनत चालली आहे.आजच्या काळात शेती फायद्यात आणण्यासाठी खर्च कमी करून उत्पन्न वाढीवर भर देण गरजेचे बनले आहे . यासाठी पारंपरिक पिक पद्धतीत बदल करून नवीन कमी खर्चात येणाऱ्या पिकांना वर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
याच अनुषंगाने आपण आज एरंड पिका विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जमीन;-
एरंडाच्या पिकासाठी कुठलीही जमीन चालते.मूरमाड,काळी.खडकाळ,हलकी,अशा कुठल्याही जमीनीत हे पिक पाय रोवून उभे राहाते.त्याला केवळ रुजण्याची गरज असते.
पाणी:-
हे पिक रूजल्यानंतर कमी पाण्यात देखील येते.याला पाण्याची गरज जास्त पडत नाही.फूल धारणा करताना पाणी दिले तर उत्तम त्यामुळे होणारी फूल गळ थांबण्यास मदत होते.तसेच लागवड केल्यानंतर एक पाणी देणे गरजेचे आहे त्यामुळे उगवण क्षमता चांगली राहाण्यास मदत होते.
बियाणे/लागवड:-या पिकाची जर सरी काढुनी टोकण लागवड केली तर एकरी केवळ ३ते३.५किलो बियाणे लागते.याची लागवड खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात करण्यात येते.याला कुठलंही हवामान अनुकूल असते.
खते:-तसे या पिकाला खतांची आवश्यकता तितकीशी भासत नाही परंतु फुलं लागण्याच्या वेळी युरीया एकरी ५० किलो टाकला तरी चालते.
फवारणी:-यावर तशी काही रोगराई दिसुन येत नाही परंतु सुरूवातीला उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो.त्यासाठी यावर निमार्क ५ मिली प्रती पंप फवारणी करावी
उत्पन्न:-या पिकाच एकरी १० क्विंटल जिरायती व १५-२०क्विंटल बागायती जमीनीत निघते.या पिकाला ३०-३५ रुपये किलोला भाव मिळतो.
उपयोग:-एरंड हे तसे बहुगुणी व औषधी वनस्पती आहे.याचा वापर औद्योगिक क्षेत्रात वंगण बनविण्यासाठी व पोटाच्या समस्या वर पोटात घेण्यासाठी केला जातो यामुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.तसेच प्राचीन काळापासून याचा वापर ताप,खोकला,मुळव्याध, खोकला या आजारांमध्ये करण्यात येत आहे.याच बरोबर जेट्रोफा जातीच्या एरंडा पासून बायोडिझेल निर्माण करण्यात आले आहे.
काढणी:-या पिकाची काढणी ५-६ महीन्यात केली जाते .हे तसे पाहिले तर बहुवार्षिक पिक आहे.व्यवस्थीत निगा राखली तर हे पिक लागवडी नंतर दोन वेळा उत्पन्न देऊ शकते
आंतरपीक:-आपण या मध्ये योग्य अंतरावर लागवड करुन आंतरपीक घेऊन शकतो .यात सोयाबीन,कपाशी,मुग,मका यासारख्या पिकांचा समावेश होतो.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)