पित्ताशयातील खडे होण्याची कारणे व उपचार
पित्ताशय हा मानवी शरीरातील एक अविभाज्य घटक आहे.पित्ताशय हे लिवरच्या खाली असते.लिव्हर पित्ताशय यांच्या मध्ये एक छोटीशी नलिका असते तिला बाईल डकट असे म्हणतात यातून पित्ताशया तील रस स्रवतो व तो अन्न पचण्यासाठी छोट्या आतड्यात आल्यानंतर त्यावर शिंपडला जातो व अन्न पचनाची क्रिया सुरु होते .शरीरात हा स्राव योग्य प्रमाणात तयार होऊन शरीराची गरज या मार्फत पूर्ण केली जाते .व अन्न पचन योग्य पद्धतीने होते .अन्न पचनासाठी पित्त रस तयार करण्याचे काम पित्ताशयात केले जाते परंतु काही कारणास्तव या पित्त रसाचा पूर्ण निचरा होऊ शकला नाही तर तो पिताश्यात साठून राहतो व त्याचे रुपांतर छोट्या छोट्या खड्यान मध्ये होते व हळू हळू या खड्यांनी पित्ताशय भरून येते
पित्ताशयात खडे होण्याची कारणे :-
पित्ताशयात खडे होण्याची कारणे काय आहेत हे अजून माहित नाही ,याबद्दल संशोधन सुरु आहे परंतु जे काही निष्कर्ष आहेत त्याचा विचार केला तर खालील काही प्रमुख कारण समोर येतात
१)मधुमेह
पित्ताशयात खडे होण्याचे प्रमाण मधुमेही रुग्णान मध्ये जास्त असल्याचे दिसून आले आहे .याचे प्रमुख कारण म्हणजे इन्सुलिनची असमानता .इन्सुलिन शरीरात असमतोलीत प्रमाणात वितरीत होते व त्याचा परिणाम पचन शक्तीवर होतो .भूक मंदावते किवा वाढते त्यामुळे पित्त रस कमी अधिक प्रमाणात वितरीत होतो त्याचे संतुलन बिघडते व परिणामी खडे तयार होतात
२)वाढते वजन :
वाढते वजन ही देखील अनेक आजारासाठी कारणीभूत आहे .वाढत्या वजना मुळे अनेक आजारानला आपोआप निमंत्रण मिळते .या मध्ये पचना बाबत समस्या निर्माण होतात व त्याचा परिणाम पित्ताशया तून निर्माण होणार्या रसावर होतो व त्याचे पर्यावसन पुढे चालून खडे होण्यात होते .
3)केमिकल युक्त गोळ्याचे सेवन:-
तुम्ही जर एखाद्या आजारानी त्रस्त असाल व तुम्हाला काही गोळ्या वगरे चालू असतील तर त्याचा दुष्परिणाम होऊन देखील तुम्हाला पिताश्यात खडे होण्याची समस्या निर्माण होऊ शकते .
४)व्यसनाधीनता :-
कुठल्याही गोष्टीची अति व्यसनाधीनता ही घातक असते त्यामुळे अति गोड खाणे ,अति अल्कोहोल सेवन ,अति शीत पेय पिणे ही देखील खडे होण्यास कारणीभूत घटकान पैकी आहेत.
खडे होण्याची लक्षण :-
१)अपचन
2)उलट्या
३)पोट फुगणे
४)पोटात वायू होणे
५)खूप घाम येणे
६)वारंवार पित्त होणे
७)कधी कधी पोटात आग झाल्या सारखी वाटणे
पिताश्यात झालेल्या खड्यावर उपचार :
तसे पाहू गेले तर याचे निदान लवकर होत नाही ,म्हणजे आपल्याला होणाऱ्या त्रासाच्या मुळाशी पित्ताश्यातील खडे आहेत हे समजे पर्यंत बराच वेळ गेलेला असतो व जेव्हा समजते तेव्हा शस्त्रक्रिया करण्याशिवाय काही मार्ग शिल्लक राहत नाही.काही वेळा तर पित्ताशय देखील काढून टाकण्याची वेळ येते .याचे निदान करण्यासाठी सिटी स्कॅन,एक्स रे या तपासणी तून या खड्यांचे निदान होते .
वारंवार खडे होणाऱ्या व्यक्तीचा आहार कसा असावा ?:-
फायबर युक्त आहार घ्यावा .आहारात फळे भाजीपाला यांचा समावेश असावा .मीठ युक्त पदार्थ आहारात कमी असावेत.आहारात विटामिन सी चा समावेश असावा या मुळे अन्न पचनास मदत होते.
आहारात तेलकट , मिठाई,चरबीयुक्त,गोड पदार्थ यांचा समावेश टाळावा.
होमिओपाथिक उपचार पद्धती ही सर्व आजारान साठी उपयुक्त समजली जाते .पिताश्यातील या खड्यान साठी लक्षणा नुसार पुढील औषधा चा वापर केला जातो या मध्ये प्रमुख्याने CALCARIA CARB (कॅल्कॅरिया कार्ब ),BARBERIS VOLGARIS (बार्बेरीस वोल्गरीस),BRYONIA ALBA(ब्रायोनिया अल्बा ),CHOLSTERINIUM(कोलेस्टेरीनियम),फेल टौरी(FEL TORI) यांचा समावेश होतो .