टाचेला भेगा पडणे कारणे व उपाय?

Homoeopathyandmagic in marathi language
0

 टाचेला भेगा पडणे कारणे व उपाय?




तळपायाला भेगा पडणे ही तशी सर्व सामान्य क्रिया आहे याचा त्रास तसं पाहू गेल तर कोणालाही होऊ शकतो यात ना वयाचे बंधन आहे ना स्त्री पुरुष असा भेद आहे.तसेच कुठल्याही हंगामात ही समस्या निर्माण होऊ शकते.आज या लेखाच्या माध्यमातून आपण यामागील कारणे व त्यावरील उपाय यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करु यात.
भेगा पडण्याची कारणे:-
१)पाण्याची कमतरता:-
आपल्या शरीरास पाणी हा खुप गरजेचा घटक आहे.शरीरात जर पाणी कमी पडले तर त्याच्या परिणामी अनेक दुष्परिणाम होतात व त्याचा सामना आपल्या शरीरास करावा लागतो त्याचाच एक परिणाम म्हणजे पायास भेगा पडणे हा होय.
२) अनुवंशिकता:-
अनुवंशिकता हा एक महत्त्वाचा घटक आहे ,जो आपल्या संपूर्ण जीवनावर प्रभाव टाकत असतो,त्याच्या परिणामी आपल्याला जीवनात अनेक चांगल्या वाईट गोष्टी चा सामना करावा लागतो यात टाचेला भेगा पडणे ही समस्या देखील याची जननी आहे.परंतु ही शक्यता तशी फार कमी आहे.
३)ऋतु बदल:-
बदलाचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असतो यात वेगवेगळ्या ऋतुचा वेगळा प्रभाव पडतो.काही लोकांना टाचेला भेगा पडण्याच्या त्रास हा हिवाळ्यात होतो तर काही लोकांना उन्हाळ्यात व काहींना पावसाळ्यात ह्या  समस्येला सामोरे जावे लागते.
४) संवेदनशील त्वचा:-
काही लोकांची त्वचा ही फार संवेदनशील असते त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो व अनेक त्वचाविषयक समस्या निर्माण होतात यात टाचेला भेगा पडणे या समस्या तयार होतात
५)कायम उभं राहाणे:-
उभं राहून कायम काम केल्याने त्याचा परिणाम पायावर होतो व वजन जर जास्त असेल तर त्याच्या परिणामी टाचाला भेगा पडतात.
६)कायम मातीत व पाण्यात काम करणे:-
सतत माती किंवा पाणी यांच्या संपर्कात काम केले तर पायाच्या त्वचेवर त्याचा परिणाम होऊन ती फुटते व तिला भेगा पडतात.
७)व्हीटामिनची कमतरता:-
शरीरास  आवश्यक  असणारी पोषक  घटकांची कमतरता निर्माण झाल्यावर देखील टाचेस भेगा पडतात.
८)शरीर ग्रंथी नीट काम न करणे:-
शरीरातील घर्म ग्रंथी, थायरॉईड ग्रंथी नीट काम करत नसतील तरी देखील टाचेला भेगा पडण्याची समस्या निर्माण होते.
उपाय:-
१) भरपुर पाणी पिणे:-
पाण्याच्या कमतरतेमुळे शरिरात अनेक समस्या निर्माण होतात.पाणी भरपुर प्रमाणात पिले तर या समस्या मिटतात.
२)त्वचेची काळजी:-
टाचेची ची योग्य काळजी घेतली ती कोरडी ठेवली मातीचा संपर्कात येण्यापासून बचाव केला तर भेगावर नियंत्रण मिळवता येते
3) घरगुती उपाय:-
पायाच्या भेगेच्या समस्येवर घरगुती उपाय आहेत यामध्ये पायाला हळद लावणे,मध लावणे, कोरफड लावणे, कडुनिंबाचा रस लावणे,पाय कोमट पाण्यात धुणे ,पायाला चांगली माईशचर क्रिम लावणे या पैकी जो शक्य आहे तो उपाय करून पाहावा.या उपायांनी टाचेच्या आरोग्यात चांगली सुधारणा होण्यास मदत होते.
होमिओपॅथिक उपचार पद्धती ही आरोग्यदायी उपचार पध्दती आहे यामुळे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत.तसेच आजार मुळापासून नष्ट होतात.टाचेला भेगा पडणे या विकारावर खालील औषधांचा वापर केला जातो यात Arnica(अर्नीका),Rhus tox(रूस टाक्स), Lycopodium(लायकोपोडीयम) या औषधांचा वापर केला जातो.याच्या नियमित वापराने पायाच्या भेगा हळूहळू भरून येतात व बर्या होतात.
 होमिओपॅथिक औषधांचा जरी काही दुष्परिणाम नसला तरी याचा वापर करण्यापूर्वी होमिओपॅथिक तज्ञाचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)