चेहऱ्यावर वांग येण्याची काय कारणे आहेत? उपाय व मिमांसा

Homoeopathyandmagic in marathi language
0


 चेहऱ्यावर वांग येण्याची काय कारणे आहेत? उपाय व मिमांसा


आजकाल च्या धावपळीच्या काळात वाढत्या प्रदूषणामुळे त्वचा बाबत अनेक विकार निर्माण होत आहेत.याचा सर्वाधिक परिणाम आपल्या चेहर्यावर दिसुन येतो.यामध्ये एक समस्या म्हणजे चेहर्यावर वांग येणे होय.या वांगाची समस्या पुरुषान पेक्षा स्ञियान मध्ये जास्त प्रमाणात दिसुन येते.

अनेक जणींच्या गालावर किंवा नाकावर काळे डाग येतात. सुरुवातीला तिळासारखा असणारा हा डाग वाढत जातो आणि हळूहळू नाक, गाल असं सगळंच डागाळून जातं. चेहऱ्यावरचे हे वांग कमी असतानाच त्यावर उपाय करावा. अन्यथा हे डाग वाढत जाऊन सगळा चेहराच काळवंडून टाकतात.ही एक अशी परिस्थिती आहे ज्यामुळे त्वचेच्या रंगात असमानता दिसू लागते. आपल्या त्वचेत रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशींमुळे आपल्याला रंग प्राप्त होत असतो. ज्याला मेलानोसाईट्स असं म्हणतात. .ज्यामुळे त्वचेला रंग मिळतो. जेव्हा मेलानोसाईट्स प्रभावित होतात तेव्हा त्वचेतील काही भाग जास्त प्रमाणात मेलनिन निर्माण होतं. ज्यामुळे त्वचेच्या काही भागाचा रंग हा इतर भागाच्या तुलनेत जास्त गडद दिसू लागतो.त्वचेवर काळे डाग किंवा चट्टे येतात.
सुंदर आणि डागविरहित चेहरा कुणाला नको वाटतो? पण अनेक वेळा चेहऱ्यावर डाग-व्रण वा वांग होण्याच्या समस्या आढळत असतात. मेडिकल प्रोफेशनल याच समस्येला हायपर पिग्मेंटेशन (Hyperpigmentation) किंवा वांग म्हणत असतात.
हायपरपिग्मेंटेशन किंवा वांग त्वचेवर पडणाऱ्या त्या पॅचला म्हणतात ज्या मध्ये त्वचा आपल्या आसपासच्या भागापेक्षा जास्त गडद रंगाची होत असते. हायपरपिग्मेंटेशन / वांग हे अनेक प्रकारचे होऊ शकते, ज्यामध्ये एज स्पॉट्स (Age Spots), मेलाज्मा (Melasma) आणि स्किन प्रॉब्लेम्स झाल्यानंतर होणारे हायपरपिग्मेंटेशन (Post-Inflammatory Hyperpigmentation) यांचा समावेश आहे.
यापैकी प्रत्येकाची अनेक कारणे, ट्रीटमेंट आणि उपचार आहेत
हायपर पिग्मेंटेशन वा वांग अशा वेळी होत असते जेव्हा त्वचा जास्त प्रमाणात मेलानिनचे (Melanin) उत्पादन करणे सुरू करत असते. मेलानिन एक असा पिग्मेंट (Pigment) आहे ज्यामुळै त्वचेला आपला रंग मिळत असतो. मेलानिनच्या जास्त निर्मितीमुळे त्वचेवर स्पॉट, पॅच वा डाग-व्रण तयार होत असतात, ज्यांचा रंग आजूबाजूसच्या त्वचेपेक्षा गडद असू शकतो.
हायपर पिग्मेंटेशन वा वांग त्वचेवरील एक सामान्य समस्या आहे. ही प्रत्येक स्किन टाइपच्या लोकांना प्रभावित करत असते. हायपर पिग्मेंटेशनच्या काही सामान्य प्रकारांमध्ये मेलाज्मा आणि सन स्पॉट्स यांचा समावेश आहे. जे शरीराच्या अशा भागांना प्रभावित करत असतात ज्यांच्यावर थेट ऊन पडत असते. या भागांमध्ये चेहरा, हात आणि पायांचा समावेश आहे.
इतर प्रकारच्या हायपर पिग्मेंटेशनमध्ये जखम झाल्यानंतर, स्किनमध्ये काही समस्या उदा. कापणे, जळणे, ऍक्ने वा लूपस (Lupus) सारख्या ऑटो इम्यून डिसीजमुळे पडणाऱ्या खुणा यांचा समावेश आहे. या खुणा शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतात. त्वचेच्या काही भागांचा रंग जर जास्त गडद असेल तर साधारणपणे हे नुकसानकारक नसतात. पण अनेक वेळा हे एखाद्या दुसऱ्याच आजाराकडे इशारा करतात.
हायपर पिग्मेंटेशनची कारणे (Causes Of Hyperpigmentation) :
हायपर पिग्मेंटेशन / वांग होण्याची कारणे प्रकारावर अवलंबून असतात. हायपर पिग्मेंटेशनचे सर्वात सामान्य कारण म्हणजे :
कडक उन्हात जाणे (Sun Exposure) :
उन्हात गेल्याने आपली त्वचा मेलानिनची जास्त निर्मिती करत असते. यामुळे त्वचेत डार्क स्पॉट अथवा पॅचची समस्या होऊ शकते. याला वैद्यकीय भाषेत एज स्पॉट्स वा सनस्पॉट्स म्हटले जाते.
मेलानिनची जास्त निर्मिती खरेतर त्वचेची आपली संरक्षणाची एक पद्धत आहे. जेव्हाही ऊन आणि यूव्ही किरणे चेहऱ्यावर जास्त पडतात तेव्हा आपली त्वचा स्वत:च्या रक्षणासाठी मेलानिनची निर्मिती करत असते. गडद रंगाच्या त्वचेवर यूव्ही किरणे अथवा अतिनील किरणांचा जास्त प्रभाव पडत नाही. पण जर त्वचेचा रंग थोडा हलका असेल तर चेहऱ्यावर वांग वा काळ्या डागांची समस्या होऊ शकते.
त्वचेवर जळजळ (Skin inflammation) :
त्वचेवर नेहमी आढळणाऱ्या समस्या उदा. सोरायसिस (Psoriasis), एक्झिमा (Eczema), जखमी होणे इत्यादी कारणांमुळे आपल्या त्वचेचा रंग गडद होऊन जातो. गडद रंगाच्या लोकांमध्ये त्वचा विकार झाल्यानंतर होणारे हायपर पिग्मेंटेशन जास्त असते.
मेलाज्मा (Melasma) :
अनेक वेळा पुरुषांमध्ये किशोरवयात असताना हार्मोन्स मध्ये बदल झाल्यामुळे त्वचेवर गडद रंगाचे डाग वा पॅच बनत असतात. महिलांमध्येही हीच समस्या गर्भावस्थेत असताना होऊ शकते.
औषधांच्या रिऍक्शनमुळे (Reactions To Drug Use)
काही खा औषधे उदा. अँटी मलेरिया ड्रग आणि ट्रायसायकिलिक अँटिडिप्रेसेंट्स यांच्या सेवनामुळे हायपर पिग्मेंटेशन अथवा वांग होण्याची समस्या होऊ शकते. अशा स्थितीत त्वचेवरील पॅच अनेक वेळा भुरकट होऊ शकतात. अनेक वेळा त्वचेवर लावल्या जाणाऱ्या औषधांमधील केमिकलची रिअ‍ॅक्शन झाल्यावरही वांग होण्याची समस्या होऊ शकते.
मेडिकल कंडिशन (Medical Conditions)
हायपर पिग्मेंटेशनच्या सर्वात गंभीर कारणांमध्ये अ‍ॅडिसन विकार (Addison's Disease) आणि हेमोक्रोमाटोसिस (Hemochromatosis) यांचा समावेश आहे.
1. ऍडिसन विकार (Addison's Disease)
ऍडिसन विकार शरीरात ऍड्रेनल ग्रंथींना प्रभावत करत असतो. याच्या मुळे शरीराच्या अनेक भागांमध्ये हायपर पिग्मेंटेशनची समस्या होऊ शकते. उदा.
1. त्वचेच्या वळणांवर
2. ओठांवर
3. कोपरे आणि गुडघ्यांवर
4. पोर
5. अंगठ्यांवर
6. गालाच्या आत
ऍडिसन विकाराच्या इतर लक्षणांमध्ये 
1. लवकर थकवा येणे
2. स्नायू दुबळे होणे
3. अस्वस्थ वाटणे
4. उलटी आणि डायरिया होणे
5. वेगाने वजन कमी होणे
6. पोटदुखी होणे
7. चक्कर येणे
यापैकी कोणतेही लक्षण दिसल्यास संबंधित व्यक्तीने ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे.
2. हेमोक्रोमाटोसिस (Hemochromatosis)
हेमोक्रोमाटोसिस पिढ्यानुपिढ्या उद्भवणारी समस्या आहे. या समस्येचे कारण शरीरातील लोह प्रमाणाच्या बाहेर वाढणे आहे. याच्या मुळेही हायपर पिग्मेंटेशनची समस्या होऊ शकते. हेमोक्रोमाटोसिस झाल्यावर त्वचेचा रंग गडद आणि टॅन होऊन जातो.
हेमोक्रोमाटोसिसचे खाली उल्लेख केलेल्यांपैकी कोणतेही लक्षण दिसल्यावर ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे. उदा. 
थकवा
पोटदुखी
सांधेदुखी
झपाट्याने वजन कमी होणे
हायपर पिग्मेंटेशन आणि मेलाझ्मा (Hyperpigmentation And Melasma)
मेलाझ्मा, हायपर पिग्मेंटेशनचाच एक प्रकार आहे. मेलाझ्मामध्ये इतर हायपर पिग्मेंटेशनच्या तुलनेत त्वचेचा बहुतांश भाग व्यापला जातो. आणि हे जास्त करून चेहऱ्यावरच होत असते. तसे पाहिले तर मेलाझ्माची समस्या जास्त प्रमाणात महिलांना होते, पण 10 टक्के प्रमाण अशा पुरुषांचेही आहे, ज्यांना मेलाझ्माचा त्रास उद्भवू शकतो.
इतर प्रकारच्या मेलाझ्मा महिला आणि पुरुषांना समान रीतीने प्रभावित करत असतात. मेलाझ्माची समस्या बहुतांश करून गडद रंग असणाऱ्या पुरुषांनाच होते. ही समस्या पिढ्यानपिढ्या चालत राहते. आतापर्यंत डॉक्टरही याचे कारण जाणून घेऊ शकलेले नाहीत की मेलाझ्मा नेमका होतो कशामुळे? पण हार्मोनमध्ये चेंज झाल्यानेही अनेक वेळा ही समस्या होऊ शकते.
हायपर पिग्मेंटेशन / वांगपासून कशी मिळवावी सुटका? (How To Get Rid Of Hyperpigmentation
तसे तर हायपर पिग्मेंटेशन नुकसानकारक नसते, पण हे चंद्रासारख्या चेहऱ्यावर डाग असल्यासारखे दिसत राहते. यामुळे यापासून सुटका करून घेणे केव्हाही चांगलेच आहे. वांगपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट आणि घरगुती उपाय उपलब्ध आहे, ज्यांचा अवलंब करून या समस्येपासून सुटका मिळवली जाऊ शकते.
हायपर पिग्मेंटेशनपासून सुटका मिळवणे वा ते वाढण्यापासून रोखण्यासाठी
1. कडक उन्हाला टाळा (Avoid Exposure To The Sun)
वांगेपासून सुरक्षेचे सर्वात पहिले पाऊल कोणते असेल तर ते म्हणजे कडक उन्हात बाहेर न निघणे आहे. घरातून निघण्याच्या आधी कमीत कमी एसपीएफ 30 वा त्यापेक्षा जास्त एसपीएफची सनस्क्रीन क्रीम जरूर लावली पाहिजे. याच्या शिवाय हायपर पिग्मेंटेशनचा रंग आणखी जास्त गडद होऊ देऊ नका.
2. त्वचेवर खाजवणे टाळा (Avoid Picking At The Skin)
एखाद्या जखमेनंतर होणाऱ्या हायपर पिग्मेंटेशनला रोखण्यासाठी, तुम्ही त्वचेवर होणाऱ्या कोणत्याही स्पॉट, पपडी (Scabs) वा ऍक्ने / पिंपल्स/ मुरूम यांना स्पर्श करू नका, शिवाय त्यांना खाजवण्याचा प्रयत्नही करू नका. यामुळे त्रास कमी होण्याऐवजी अनेक वेळा तो वाढत असतो.
हायपर पिग्मेंटेशनचे उपचार (Treatments For Hyperpigmentation)
तुम्ही त्वचेच्या डार्क पॅचचा रंग हलका करण्यासाठी आणि हायपर पिग्मेंटेशनपासून सुटका मिळवण्यासाठी खाली उल्लेख केलेल्या उपचारांचाही अवलंब करू शकता.
1. टॉपिकल क्रीम (Topical Creams)
बहुतांश व्यक्ती हायपर पिग्मेंटेशन वा वांग यांच्यावर उपचार करण्यासाठी टॉपिकल ट्रीटमेंटचा वापर करत असतात. टॉपिकल ट्रीटमेंटमध्ये ते कंटेंटही जरूर असले पाहिजेत जे त्वचेचा रंग हलका करण्यात मदत करतात. उदा.
1. ऍझेलाइक ऍसिड (Azelaic Acid)
2. कोर्टिकॉस्टेरॉइड्स (Corticosteroids)
3. हायड्रोक्विनन (Hydroquinone)
4. कोजिक ऍसिड (Kojic Acid)
5. रेटिनॉएड्स, उदा. ट्रेटिनॉइन (Retinoids, Tretinoin)
6. व्हिटॅमिन सी (Vitamin C)
कॉस्मेटिक प्रक्रिया (Cosmetic Procedures)
काही कॉस्मेटिक प्रक्रियांमुळेही त्वचेचा रंग हल्का केला जाऊ शकतो. हा हायपर पिग्मेंटेशन वा वांग टाळण्याचा परिणामकारक उपायही आहे.
हायपर पिग्मेंटेशन वा वांग यांना दूर करण्यासाठी कॉस्मेटिक प्रक्रिया खालीलप्रमाणे आहेत.
1. लेझर थेरपी (Laser Therapy)
2. इंटेन्स पल्स्ड लाइट (Intense Pulsed Light)
3. केमिकल पील्स (Chemical Peels)
4. मायक्रोडर्माब्रेजन (Microdermabrasion)
जर तुम्हीसुद्धा हायपर पिग्मेंटेशनच्या उपचारांसाठी यापैकी कोणतीही एक प्रक्रिया अवलंबण्याचा विचार करत असाल तर, ती प्रक्रिया आणि संभाव्य साइड इफेक्ट्सबाबत आपल्या स्किन केअर तज्ज्ञ अथवा डर्मेटोलॉजिस्ट (Dermatologist)  यांच्याशी जरूर संवाद साधा.
हायपर पिग्मेंटेशनवर घरगुती उपाय (Home Remedies For Hyperpigmentation)
हायपर पिग्मेंटेशन वा वांग यांना घरगुती वा नैसर्गिक उपायांनीही ठीक केले जाऊ शकते. तथापि, आतापर्यंत मोठ्या प्रमाणावरप माणसांवर करण्यात आलेली अशी कोणतीही स्टडी अस्तित्वात नाही, ज्यावरून हे उपाय प्रभावी असल्याचा दावा करता येऊ शकेल.
परंतु जर एखादी व्यक्ती नैसर्गिक आणि घरगुती उपायांना आजमावून पाहू इच्छित असेल तर त्यापूर्वी नेहमी त्वचेच्या छोट्या भागाला लावून परीक्षण केले पाहिजे. जर त्वचेवर लाल डाग पडणे वा खाज सुटण्यासारखा त्रास झाला तर या उपायांचा वापर ताबडतोब बंद करून टाकला पाहिजे.

तथापि, सन 2018 मध्ये करण्यात आलेल्या रिव्ह्यू स्टडीच्या नुसार, खाली उल्लेख केलेले नैसर्गिक आणि घरगुती उपाय हायपर पिग्मेंटेशन / वांग यांना परिणामकारक पणे दूर करण्यास सक्षम आहेत. उदा.

1. कोरफडीचा रस (Aloe vera Juice)
कोरफड वा ऍलोव्हेराचा रस हायपर पिग्मेंटेशनच्या उपचारांमध्ये मदत करू शकतो. कोरफडीमध्ये एलोसिन (Aloesin) नावाचे संयुग आढळते जे हायपर पिग्मेंटेशन / वांग यांना हलके करण्यात मदत करत असते. एलोसिन त्वचेमधील मेलानिनची निर्मिती कमी करण्यात मदत करू शकते.
एका अभ्यासानुसार, कोरफडीच्या कॅप्सूलच्या नियमित सेवनामुळे मेलाझ्माची समस्याही ठीक होण्यात मदत मिळू शकते. याच्या शिवाय थेट रोपापासून कोरफडीची जेल / जूस काढून ती थेट त्वचेवरही लावली जाऊ शकते.
तथापि, कोणत्याही रिसर्चमध्ये थेट पणे सांगितलेले नाही की, कोरफडीमुळे हायपर पिग्मेंटेशनने प्रभावित भागातील त्वचेला फायदा मिळाला आहे. यामुळे शास्त्रज्ञांमध्ये हा उपाय प्रभावी असण्यावरून एकमत नाही आहे.
2. ज्येष्ठमध (Licorice)
ज्येष्ठमधाचे सत्त्व हायपर पिग्मेंटेशन / वांग यांचारंग हलका करू शकते
एका रिसर्चनुसार, ज्येष्ठमधाच्या सत्त्वामध्ये (glabridin) अँटी-इंफ्लेमेट्री अँटी ऑक्सिडेंट आढळतात. हे त्वचेचा रंग स्वच्छ करण्यातही मदत करू शकते. लोक ज्येष्ठमधाचे सत्त्व असणाऱ्या क्रीमचा वापर हायपर पिग्मेंटेशन वा वांग असणाऱ्या भागावरही करू शकतात. हे प्रॉडक्ट मार्केटच्या शिवाय ऑनलाइनही उपलब्ध आहे.
3. ग्रीन टी (Green Tea)
ग्रीन टीचे सत्त्व हायपर पिग्मेंटेशन / वांग यांना दूर करू शकते. संशोधकांना दीर्घ अभ्यासानंतर आढळले आहे की, ग्रीन टीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट आणि अँटी इंफ्लेमेट्री गुण आढळतात.
हायपर पिग्मेंटेशन वा वांग यांच्यावर ग्रीन टीचा प्रभाव या दृष्टीने खूप कमी रिसर्च झालेली आहे. याचेही मर्यादित पुरावे आहेत की, ग्रीन टीचे सत्त्व मेलाझ्मा आणि सनबर्नच्या प्रभावांपासून दिलासा देऊ शकते.
या विषयावर शास्त्रज्ञ अद्यापही संशोधन करत आहे की, ग्रीन टी खरंच वांगच्या लक्षणांपासून दिलासा देऊ शकते की नाही?

उपचार (Diagnosis)
हायपर पिग्मेंटेशनमुळे प्रभावित लोक अशा डॉक्टरांना दाखवू शकतात, जे त्यांना याचा प्रकार आणि कारण सांगू शकतील. बहुतांश प्रकरणांमध्ये डॉक्टर त्वचेचा छोटा तुकडा नमुना म्हणून घेऊन त्याची बायोप्सी करून घेत असतात. यामुळे हायपर पिग्मेंटेशनचे कारण समजून येते.
बहुतांश अनुभवी डॉक्टर फक्त त्वचा पाहूनच मेलाझ्मा आणि इतर प्रकारच्या हायपर पिग्मेंटेशनला ओळखू शकतात. बहुतांश प्रकरणांत डॉक्टर एका खास पद्धतीच्या उजेडाचा (Wood's Light) वापर करून त्वचेचे परीक्षण करत असतात.

हायपर पिग्मेंटेशन त्वचेवरील एक सामान्य समस्या आहे जी बहुतांश लोकांना वेगवेगळ्या कारणांमुळे होण्याची शक्यता असते. हायपर पिग्मेंटेशनच्या प्रकारांमध्ये एज स्पॉट्स, मेलाझ्मा आणि पोस्ट इंफ्लेमेट्री हायपर पिग्मेंटेशन यांचा समावेश आहे.
हायपर पिग्मेंटेशन वास्तवात गंभीर नुकसान न करणारा त्वचेचा एक विकार आहे. या समस्येने ग्रस्त असलेले रुग्ण कॉस्मेटिक उपचार, क्रीम आणि घरगुती उपायांच्या मदतीने सुटका मिळवू शकतात. जर एखादी व्यक्ती हायपर पिग्मेंटेशनच्या शिवाय इतरही लक्षणे अनुभवत असेल, तर तिने ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
बहुतांश लोक त्वचेच्या समस्यांना क्षुल्लक मानून सुरुवातीच्या स्टेजमध्येच डॉक्टरांकडे जाणे टाळतात. वास्तवात ही खूप मोठी चूक आहे. त्वचा आपल्या शरीराचे सर्वात मोठे अंग आहे.
याच्याशिवाय, त्वचेवर होणारी कोणतीही समस्या सहजरीत्या बरी होत नाही. त्वचेवरील समस्यांना बरे होण्यात साधारणपणे दीर्घकाळ जाऊ द्यावा लागतो. यामुळे समस्येची सुरुवात होताच जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर डॉक्टरांना जाऊन भेटले पाहिजे.
जर एखादी व्यक्ती कॉस्मेटिक कारणांमुळे वा सुंदर दिसण्यासाठी हायपर पिग्मेंटेशनचे उपचार घेऊ इच्छित असेल तर तिने डर्मेटोलॉजिस्टचा सल्ला घेतला पाहिजे. ते त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने सल्ला देऊ शकतील, त्यांनी हायपर पिग्मेंटेशनवर उपचार कसे करावेत!    








टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)