नागिण कारणे व उपाय (Nagin disease cause and solution)

Homoeopathyandmagic in marathi language
0

 नागिण कारणे  व उपाय (Nagin disease cause and solution) 





हर्पस झोस्टर, ज्याला शिंगल्स देखील म्हणतात, हा एक विषाणू आहे ज्यामुळे त्वचेवर तीव्र पुरळ किंवा फोड येतात. हे व्हेरिसेला-झोस्टर विषाणूमुळे होते, जे चिकनपॉक्ससाठी देखील जबाबदार आहे. पुरळ सामान्यत: शरीराच्या एका भागात पुरळ किंवा फोडांच्या रिंगच्या रूपात प्रकट होते.

जेव्हा तुम्ही लहानपणी कांजिण्या अनुभवता तेव्हा तुमचे शरीर व्हेरिसेला-झोस्टर विषाणूशी लढते आणि शारीरिक व्याधी कमी होतात, पण संसर्ग तुमच्या शरीरात राहतो. कधीकधी व्हायरस परिपक्वतेमध्ये पुन्हा सक्रिय होतो. व्हॅरिसेला-झोस्टर संसर्गाची दुसरी सुरुवात या वेळी शिंगल्सच्या स्वरूपात होते.
नागीण हा जीवघेणा आजार नाही, परंतु तो अत्यंत वेदनादायक असू शकतो. नागीण या आजाराविषयी गैरसमज अधिक आहेत. नागिणीने विळखा मारला की, जिवाला धोका असतो, हा त्यापैकी मोठा गैरसमज. गैरसमज दूर करून योग्य काळजी घेतल्यास नागिणीचा प्रसार कमी करण्यात मदत होईल. उन्हाळा सुरू झाला की, वाढत्या तापमानाबरोबर विविध साथीचे आजार पसरायला सुरुवात होते. विविध विषाणूजन्य या ऋतूत जास्त प्रमाणात जाणवतात. लहान मुलांमध्ये होणाऱ्या कांजिण्या आणि त्याच विषाणूंमुळे होणारी नागीण हे आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्या विषयीचे गैरसमज दूर करून योग्य ती काळजी घेतल्यास त्याचा प्रसार कमी करण्यास मदत होऊ शकते
नागीण होण्याची कारणे
नागीण झालेल्या माणसाचा संपर्क, पित्त वाढवणाऱ्या गोष्टींचे अधिक प्रमाणात सेवन, जागरण, उन्हातान्हातून खूप काम करणे, एप्रिल-मे-ऑक्टोबर या महिन्यांत किंवा पावसाळ्याच्या मध्यावर होणारे अनेक प्रकारचे विषाणू संसर्ग नागीण होण्यास कारणीभूत असतात.
साधारण लक्षणे
१. सुरुवातील नागिणीच्या जागी फक्त वेदना किंवा आग होते. दोन-चार दिवसांत किंवा कधीकधी एका रात्रीतही भाजल्यावर येतात, तसे पाण्याचे बारीक बारीक फोड येतात. हे फोड एकत्र गुच्छाच्या स्वरूपात येतात आणि एका विशिष्ट दिशेने वाढत जातात.
२. नागिणीची प्रमुख तीन लक्षणे म्हणजे आग, वेदना किंवा खाज.
३. नागीण झाल्यावर तो भाग लालसर होतो, आतून दडदडीत होतो. अंगावर कपडे सहन होत नाहीत. त्या बाजूवर झोपताही येत नाही. जरासा धक्का लागला तरी डोळ्यांतून पाणी येते, संपूर्ण अंगाची आग होते, काही वेळा ताप येतो, झोप लागत नाही. काही दिवसांनंतर हे फोड मोठे होतात. शेजारचे छोटे छोटे फोड एकत्र होऊन मोठे फोड तयार होतात. नंतर ते फुटतात.
४. काही वेळा या फोडांमध्ये पूसुद्धा होतो. फुटल्यावर त्यातील पाणी निघून जाते आणि वरची त्वचा निघून जाऊन आतील मांस दिसू लागते. नंतर त्या मांसावर खपली येते, ती सुकून काळी पडते आणि आत नवीन त्वचा आल्यावर ती खपली गळून पडते.
नागिणीच्या विशिष्ट लक्षणे :
– पाठदुखी.
– नेहमीसारखी पाठ न दुखता थोडे टोचल्यासारखे, खुपल्यासारखे वाटत राहते.
– दोन-चार दिवसांत तिथे लाल रंगाचे पाणीदार फोड दिसायला लागतात
– त्यांची संख्या वाढून त्यांचा एका आडव्या पट्ट्यासारखा विस्तार होतो.
– त्या ठिकाणी अती प्रचंड खाज, आगआग आणि ठणका लागू शकतो.
– फ्लूमध्ये दिसणारी ताप, थकवा, अंगदुखी, डोकेदुखी अशीही लक्षणे यात असतातअसतात
1)नागीण रोगामुळे शरीरावर लाल पुरळ खुप मोठ्या प्रमाणात येतात.
नागीण रोगाचे सर्वात मोठे डोळ्याने दिसणारे लक्षण म्हणजे लाल पुरळ शरीरावर दिसतात. हिचं सुरवात आपल्याला नागीण रोगाची लाल पुरळ फोड दिसून येतं असतात. यांतून काही काळाने पाणी येऊ लागतात. शरीरावर लाल पुरळ येतं असतील तर नागीण रोगाचे लक्षणाला सुरवात होताना दिसतं असते.
2)नागीण रोगामुळे” तोंड “येण्याचे प्रमाणात वाढ होताना दिसते.
नागीण रोगाचे प्रमाण उष्णता वाढ होणे एक प्रकारे लक्षण आहे.नागीण आजारात तोंड येणें हे लक्षण मोठ्या प्रमाणात दिसून येते. तोंडात फोड येण्याचं प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येते. नागीण आजारात ताप येतो व त्या तापाच्या पोटी औषधं खाल्ली असतील तर उष्णता वाढताना दिसून येते. तसेच मोठ्या प्रमाणात रोग जो पर्यंत आहे तोपर्यंत फोड दिसून येतात. त्यामुळे तोंड येणें प्रमाण वाढते तसेच ते कमी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे.
3)नागीण रोगात मोठ्या प्रमाणात “ताप “येण्याची वाढ होताना दिसते.
नागीण रोगात मोठ्या प्रमाणात ताप येण्याची शक्यता असते. खुपचं मोठ्या प्रमाणात कणकणी येण्याचं प्रमाण वाढताना दिसून येते. ताप आल्यावर आपल्याला मुख्यता जी लक्षण दिसतात तोंडाची चव जाने. आहारात समावेश केलेला कोणताही पदार्थ खाण्याची इच्छा नसणे.
ताप आल्यावर खुप मोठ्या प्रमाणात पुरळ येऊन तोंड येण्याची दाट शक्यता असते. काही वेळेस नागीण रोग लक्षण दिसून येतात.
4) नागीण रोगात मोठ्या प्रामाणात “लघवीला त्रास “होण्याचं लक्षण.
नागीण रोगात ताप येण्याची शक्यता जास्त असते आणि खुप मोठ्या प्रमाणात उष्णता वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शारीरिक बदल खुप मोठ्या प्रमाणात दिसून येतांना दिसतात.हेचं बदल खुप असह्य होऊन शारीरिक बदल आपल्याला खुप मोठ्या प्रमाणात सामोरे जाताना पहायला मिळतात.लघवीला त्रास होताना दिसून येतांना पहायला मिळतो. तसेच खुप मोठ्या प्रमाणात लघवीची जागा दुखण्याचे प्रमाण वाढ होते. हे सर्व वेदना असह्य होताना दिसतात.
5)नागीण आजारात संपूर्ण शरीरावर खाज येण्याचं प्रमाणात वाढ दिसते.
नागिन झालेल्या आरोग्याच्या शरीरावर ती पूर्णपणे लाल प्रकारचे पुरळ येतात आणि हेच पूर्ण काही वेळानंतर पाणीदार होऊन ते फुटले जातात आणि हेच पुरळ काही वेळाने खूप आग निर्माण करतात आणि हेच शरीरावरती पूर्णपणे खाज येण्याचे प्रमाण वाढतं आणि त्यामुळे पूर्णपणे शरीरावरती एक प्रकारचं लाल पुरळ इन्फेक्शन वाढत राहतो आणि हेच लक्षण आपल्याला शरीरावरती खूप मोठ्या प्रमाणावर ती दिसत राहतात
नागीण रोग होताना कारणे कोणकोणती What are the causes of herpes?
1)नागीण रोगाचे कारण “पित्त” होणारे याकडे सतत दुर्लक्ष
पित्त होणे म्हणजे ऍसिडिटी तयार होणे. पोट बिघडणे यासारखे पोटाचे विकार तयार होताना पहायला मिळतात. नागीण रोगाचे कारण पित्त सुद्धा अशू शकते. तुम्ही सतत पित्त होणे याकडे कधीही दुर्लक्षित होऊ देऊ नका. सतत होणारा पित्त त्रास हा तुम्हांला कधी तरी नागीण रोगाकडे सुद्धा वाटचाल करू शकतो त्यामुळे त्रासदायक पित्त होऊ शकते.
2) नागीण रोगाचे मुख्य कारण कोणत्याही वेळी कधीही अवेळी आहार सेवन करणे.
आपल्याला जर आहार कधी घेणे हेचं माहिती नसेल तर तुम्ही नक्कीच आपल्या आरोग्याची काळजी घेतं नाही.तुम्ही वेळी अवेळी खाणे आहारात समावेश केला तर नक्कीच पोटाचे विकार तयार होऊन नागीण आजाराकडे वाटचालीस पाऊल टाकले जाते. अवेळी कधीचं खाऊ नका तुम्हांला वेळेच्या वेळी आहार करणे योग्य राहिलं आरोग्य एकदम बेस्ट राहिलं.
3)नागीण रोगाचे कारण” पित्त होणारे आहार सेवन” करणे.
आपण जर आहारात दररोज सकस आहारयुक्त सेवन करतं असताल तर मसालेदार झनझणीत पदार्थ खाणे शक्यतो टाळणे गरजेचं आहे. पित्त होणारे पदार्थ जर आहारात सेवन जास्त प्रमाणात करत असताल तर जरा जपून नागीण रोगाकडे वाटचाल करतं असताल हे नक्कीच काळजी करण्यासारखे आहे. तुम्ही शारीरिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचं आहे.
4)नागीण रोगाचे कारण” सतत होणारे जागरण” हे सुद्धा असू शकते.
आपल्या आरोग्याची काळजी म्हणजे पुरेशी शांत झोप घेणे खुप महत्वाचे असते. आपल्याला खुप मोठ्या प्रमाणात सध्या धकाधकीच्या जिवनात वेळ मिळणं शक्य नाही त्यामुळे झोप पण पुरेशी घेतं नाहीत. झोप जर पुरेशी घेतं नसताल तर तुम्ही नागीण रोगाकडे वाटचाल करू शकताल. झोप पुरेशी शांत घेणे गरजेचं आहे.
5)नागीण रोगाचे कारण “रोग प्रतिकार शक्ती कमी “असणे हे देखील असु शकते.
नागीण रोग तसेच इतर आजारापासून तुम्ही जर आरोग्य व्यवस्थित ठेवायला शिकायचं असेल तर तुमच्या आरोग्याची काळजी तुम्ही घेताय हे खुप महत्वाचं आहे. रोगप्रतिकार शक्ती जर कमी असेल तर असंख्य विकार आपल्याला तयार होताना दिसतील त्यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती कशी वाढली जाईल याकडे लक्ष दिले जाईल.
रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात योग्य आहार घेणे महत्वाचं आहे.
नागीण आजारावर घरगुती उपाय Naagin Disease Home Remedies In Marathi
1)नागीण आजारावर मात करण्यासाठी शारीरिक दाह कमी करण्यासाठी कॅमोमाईल आणि स्टार्च हे तेल वापरून दाह कमी करू शकतात.
2)नागीण रोगावर आराम मिळवायचा असेल तर नियमित थंड पाण्याची आंघोळ करणे गरजेचं
3) नागीण आजारावर मात करण्यासाठी सकस योग्य समतोल आहार खाण्याचे योग्य नियोजन आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे.
4) नागीण रोगावर लवकरच मात करण्यासाठी योग्य सकस आहारात जीवनसत्व घेणे गरजेचं आहे. तसेच योग्य प्रमाणात व्हिटॅमिन्स सप्लिमेंट घेणे गरजेचं आहे.
5)नागीण आजारावर एक उपाय म्हणजेचं आपली स्वतःची प्रतिकार शक्ती वाढविणे अतिशय गरजेचं आहे.
6) नागीण आजाराने त्रस्त असताल तर औषधांचे योग्य सेवन करणे गरजेचं आहे.
कोणकोणता आहार घेणे-
What is diet to eat-
पचनास हलका आहार घेणे अतिशय गरजेचे असते.सकस ताजा आहारात समावेश करणे गरजेचं आहे. हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, दुध, अंडी, मटण,चिकन, फळभाज्या, धान्य मोड आलेली कडधान्य असा समावेश आहारात नियमित करणे गरजेचं असतं. आहारात समावेश उत्तम सकस पालेभाजी, फळभाजी, धान्य,दुध यांचा दररोज नियमित केल्यास आजार लवकरच बरा होऊन लवकरात लवकर आजारी व्यक्ती मजबुत होऊन सदृड तयार होईल.
नागीण आजारात कोणता आहार टाळावा-What diet to avoid in herpes-
नागीण झालेल्या व्येक्तीने शक्यतो गोड साखर घातलेले पदार्थ वर्ज्य करावेत. साखरयुक्त पदार्थ टाळणे खुप गरजेचं आहे. तसेच ज्या आहारात चरबी वाढण्याचे पदार्थ जास्त असतील ते पदार्थ शक्यतो टाळणे गरजेचे आहे.गोड ज्यूस तसेच खुप तिखट मसाले वापरलेलं पदार्थ खाणे टाळावे. तेलकट तुपट पदार्थ टाळणे अतिशय गरजेचं आहे.
नागीण आजारात आरोग्याची घ्यावयाची काळजी Health care for herpes
1) स्वतः शरीराची स्वच्छता बाळगणे जरुरीचे असते.
2)स्वच्छ ताजा हलका आहार घेऊन आरोग्य सदृढ बनविण्यात यशस्वी व्हावे.
3)आजारी व्यक्तीने जास्त दगदग करणे शक्यतो टाळावे. आराम भरपूर प्रमाणात करणे गरजेचे असते.
4)नागीण झालेल्या व्यक्तीने स्वच्छ कपडे, साबण, अंथरून, पांघरून स्वतःचे वेगळे ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
5)नागीण ग्रस्त व्यक्तीने अंघोळ स्वच्छ पाण्याने करणे गरजेचं असते. अंघोळीची जागा शक्यतो वेगळी असावी अंघोळीची जागा टिपून घेणे गरजेची आहे.
होमिओपॅथी मध्ये यावर पुढील औषध उपलब्ध आहेत
Arsrnic album, Petroleum, Graphatis, Rus tox या औषधांचा प्रामुख्याने वापर केला जातो.
















टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)