मानसिक आजाराची कोणती कारणे आहेत?उपाय व मिमांसा (REASON OF PSYCOLOGICL DISORDER?)
सध्याच्या धावपळीच्या जगण्यात मानसिक
आजार हा वरचेवर ऐकायला मिळणारा विषय झाला आहे. पण मानसिक आजार म्हणजे नक्की काय
आणि हा आजार का आणि कसा होतो. हा आजार आपल्याला झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं
याबद्दल अजूनही जागरूकता नाही. बरेच लोक आपल्याला मानसिक आजार आहे हे स्वीकारायलाच
तयार होत नाहीत. पण खरं तर मानसिक आजार हा असा आजार आहे जो तुम्ही वेळेवर
स्वीकारलात तर तुम्ही त्यावर उपचार करून तुमचं पुढचं आयुष्य अतिशय चांगल्या रितीने
जगू शकाल. अगदी तुम्ही बऱ्याच मोठ्या सेलिब्रिटीजच पाहिलंत तरी बरेच सेलिब्रिटी या
गोष्टीसाठी पुढे येत आहेत. दीपिका पादुकोणसारख्या अभिनेत्रीनेही याबद्दल जागरूकता
वाढवण्यासाठी बरीच पावलं उचलली आहेत. ती स्वतः या आजारातून बाहेर आली आहे. पण
याबद्दल बोलून त्यावर पाऊल उचलणं हाच एक योग्य तोडगा आहे. त्यामुळे तुम्हाला जर
अशी लक्षणं दिसत असतील आणि तुमच्यामध्ये काही बदल लोकांनाही जाणवत असतील तर तुम्ही
वेळेवर स्वतःकडे लक्ष द्यायला हवं.
कफ, वात,पित्त या त्रिदोषांवर
प्रकतीमान अवलंबून असते असे आयुर्वेद सांगतो. सर्व प्रकृती जोवर संतुलित अवस्थेत
असते तेव्हा आरोग्यपूर्ण असते. तसेच मनोबलाचे असते. विवेक,विचार,भावना,विकार,मन,बुद्धी,अहंकार ह्या सर्वांचा
समतोल असेल तोवर मानसिक स्वास्थ्य असते. जेव्हा यातील एखादा घटकही कमी पडतो,त्याचा तोल ढळतो
तेव्हा मानसिक आजार सुरु होतो,बळावतो.
अतिउदासीनता, अत्यंत तीव्र चिंता,कमालीचे वैफल्य,टोकाची निराशा,भयावह एकाकीपण अशी एक
वा अनेक लक्षणे व्यक्तीला मानसिक आजाराने ग्रस्त करतात.
लक्षणे पाहून
मानसोपचार तज्ञ ,मनोविकारतज्ञ,पाश्र्चात्य वैद्यकीय
शास्र शिकलेले सायकायट्रिस्ट औषधोपचारांच्या वापराने लक्षणांवर ताबा मिळवून ती कमी
करतात.दुसर्या बाजूने मानसोपचार तज्ञ समुपदेशनातून परिस्थिती मागील कारणे शोधत
त्यातून रोग्याला बाहेर काढतात. व रोग्याला स्थिर करतात.
मानसिक आजार म्हणजे काय (What
is Mental Illness):-
सर्वात
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक आजार नक्की काय असतो? मेंदूचं काम जेव्हा
बिघडतं तेव्हा भावनिक आणि बौद्धिक पातळीवर परिणाम होत असतो. या परिणामालाच मानसिक
आजार असं म्हटलं जातं. मेंदूमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांमुळे मानसिक आजार होतो.
सहसा हे सुरुवातीला दिसून येत नाही. पण त्यासाठी मेंदूचं काम दर्शवण्यासाठी आणि
रक्तपुरवठा दाखवणाऱ्या आणि पेशींमध्ये विशिष्ट बदल असणाऱ्या तपासण्या कराव्या
लागतात. आजाराचं कारण कळतं कशावरून ते म्हणजे लक्षणांवरूनच. त्यामुळे सर्वात
पहिल्यांदा याची नक्की लक्षणं काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे.
मानसिक आजाराची लक्षणं (Symptoms of Mental Illness):-
मानसिक आजार आपल्याला आहे किंवा
अन्य कोणालाही हा आजार असल्याची शक्यता आहे हे सांगण्यासाठी काही लक्षणं दिसून
येतात. त्यापैकी काय महत्त्वाची लक्षणं आहेत ते जाणून घेऊ -
·
अचानक रडू
येणं
·
दुखः वाटणं
अथवा रिकामेपणाची भावना सतत वाटणं
·
झोप न लागणं
अथवा अधिक झोप लावणं
·
सतत थकल्यासारखं
वाटणं
·
पचन नीट न
होणं
·
आत्महत्येचे
सतत विचार येणं
·
आशावादाचा
अभाव
·
सतत अस्वस्थता
वाटणं
·
एकलकोंडेपणा
मानसिक आजाराचे प्रकार (Types of
Mental Illness):-
मानसिक आजाराचेही अनेक प्रकार
आहेत. खरं तर मानसिक आजार उद्भवण्याची कारणं अनेक असतात. प्रत्येक व्यक्तीसाठी ती
निरनिराळी असतात. पण मानसिक आजाराचेही प्रकार असतात. ते आपण जाणून घेऊ. नक्की या
प्रकारांमध्ये काय काय घडतं हे प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे. जाणून घेऊया
नक्की काय आहेत याचे प्रकार -
1. अस्वस्थता (Depression)
अस्वस्थता अर्थात डिप्रेशन हा
शब्द नेहमीच आपल्या कानावर येत असतो. पण नक्की डिप्रेशन येणं म्हणजे काय याची
चर्चा मात्र होत नाही. तर सतत करिअर, पैसा आणि जीवनातील आपली
परिस्थिती याबद्दल विचार करत राहणं, निद्रानाश होणं, सतत डोकं दुखत
राहणं, चक्कर येणं अशी लक्षणं सतत दिसायला लागल्यावर
तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं घडत आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायला हवं. बऱ्याचदा
अतिविचाराने हा आजार उद्भवतो. पण त्यावरचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे
व्यवस्थित झोप येणं. कारण जितका जास्त विचार करून तितकी तुमची झोप उडते आणि
त्यामुळे डोकेदुखी आणि अंगदुखी उद्भवते त्यामुळे ही एक साखळीच आहे. यावर सर्वात
महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नक्की काय विचार करत आहात हे तुम्ही तुमच्या जवळच्या
व्यक्तींबरोबर शेअर करणं गरजेचं आहे. मग ती कोणीतही तुम्हाला समजून घेणारी व्यक्ती
हवी. डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातील ताण आणि असह्य
होणाऱ्या गोष्टी नेहमीच बाहेर काढून टाकणं गरेजचं आहे. तर तुम्ही या मानसिक
आजारातून बरे होऊ शकता अन्यथा तुम्ही अधिकाधिक यामध्ये गुंतत जाऊन स्वतःचं आयुष्य
खराब करून घेऊ शकता. वेळेवर आपल्याला नक्की काय होत आहे याचा अंदाज घेत डॉक्टरांची
अथवा आपल्या जवळच्या माणसांची मदत घेण्याची गरज आहे.
2. स्क्रिझोफ्रेनिया (Schizophrenia):-
स्क्रिझोफ्रेनियाची लक्षणं ही
व्यक्तीनुसार बदलतात. किशोरवयीन आणि प्रौढ व्यक्ती यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी
दिसून येतात. किशोरवयीन मुलांमध्ये झोप कमी येणं, अभ्यासातील गती मंदावणं, उत्साह नसणं
आणि एकलकोंडेपणा वाढणं ही लक्षणं असून प्रौढ व्यक्तींमध्ये हेल्युसिनेशन
(अस्तित्वात नसलेल्या गोष्टी जाणवणं), विश्वास न ठेवणं, अपूर्ण संवाद, रागाचे झटके, समाजापासून
दूर राहण्याचा प्रयत्न ही सगळी लक्षणं दिसतात. या सगळ्या गोष्टी अतिताणामुळे
सुचायला लागतात. त्यामुळे वेळीच तुमच्या लहान मुलांमध्ये या गोष्टी जाणवायला
लागल्या तर तुम्ही त्यावर उपचार करायला हवेत कारण त्यावर त्याचं संपूर्ण आयुष्य
अवलंबून असतं. शिवाय या आजारातून वेळेवर उपचार घेतल्यास बरं होता येतं.
3. ऑटिझम (Austism):-
ऑटिझम हा असा मानसिक आजार आहे जो
दोन वर्षाच्या मुलापासूनही होऊ शकतो. दोन वर्षांच्या मुलांमध्ये एकमेकांशी न
मिसळणं आणि एकलकोंडेपणाने राहण्याबरोबरच ऑटिझम सुरु होतं आणि मग त्याचा परिणाम
बोबडेपणामध्ये होतो. अशी मुलं आपल्याच कामात आनंदी असतात आणि एकच काम बराच वेळ करत
बसणं त्यांना खूपच आवडतं. पण हे ऑटिझमच लक्षण आहे हे वेळेतच पालकांनी ओळखायला हवं.
वेळोवेळी आपल्या डॉक्टरांकडून योग्य वयात मुलं बोलत नसल्यास, त्यांची
तपासणी करून घ्यायला हवी. यामधून मुलं बाहेर नक्की पडतात पण पुन्हा ऑटिझमच्या
आहारी जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे अशा मुलांकडे व्यवस्थित लक्ष देत राहायला
हवं. याची लक्षणं बऱ्याच अंशी वेगळी असतात. नक्की ती काय असतात ते जाणून घेऊया -
·
उशीरा बोलायला
सुरुवात अथवा बोबडेपणाने सतत बोलणे
·
वयाला साजेसे
नसलेले व्यवहार करणं
·
बुद्ध्यांक
कमी असणं
·
स्मरणशक्ती
कमी असणं
·
सतत हट्टीपणा
आणि निराशा
·
समाजातील
लोकांमध्ये न मिसळणं
·
हे महत्त्वाचे
प्रकार असून मानसिक आजाराने अन्यही काही प्रकार आहेत -
1. राग (Anger):-
बऱ्याच व्यक्तींना आपल्या रागावर
नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे वेळेवर आपल्याला कोणत्याही प्रकारचा मानसिक
आजार नाही ना याची खात्री करून घ्या. कारण राग हा एका मर्यादेपर्यंत ठीक असतो. पण
सतत प्रत्येक गोष्टीवरून चिडचिड करून राग येणं हे योग्य नाही.
2. तीव्र झटका (Panic Attack):-
अचानक शांत असताना विनाकारण
अचानक एखादी व्यक्ती चिडत असेल तर त्याला पॅनिक अटॅक म्हटलं जातं आणि हा मानसिक
आजाराचा एक भाग आहे. यातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याची आणि
तुमच्या जवळच्या माणसांच्या पाठिंब्याची गरज असते.
3. जास्त खाणं (Emotional Eating):-
बऱ्याचदा काही परिस्थितीमध्ये
नक्की काय करायचं हे न कळून बऱ्याच जणांना सतत खायची सवय असते. पण हादेखील एक
मानसिक आजाराच आहे. तुम्हाला स्वतःला हे सर्वात पहिल्यांदा जाणवतं. त्यामुळे असं
काही झालं तर वेळीच तुम्ही आपल्या जवळच्या माणसांची मदत घेऊन यातून बाहेर यायचा
प्रयत्न करा. अन्यथा तुमच्या शरीरावर तर याचा परिणाम होतोच पण त्याहीपेक्षा जास्त
मनावर या गोष्टीचा जास्त परिणाम होतो.
4. एकटेपणा (Loneliness):-
आजूबाजूला कितीही माणसं असली
तरीही तुम्हाला सतत एकटेपणा वाटणं हादेखील मानसिक आजारच आहे. आपल्यावर कोणीही
प्रेम करत नाही आणि आपण एकटे आहोत हे सतत वाटत राहणं योग्य नाही. त्यासाठी तुम्ही
तुमचे विचार तुमच्या जवळच्या व्यक्तींंबरोबर शेअर करायला हवेत. अन्यथा याचा शेवट
आत्महत्येचे विचार मनात निर्माण होईपर्यंत होतात.
5. आत्महत्येचे विचार (Suicidal Feeling):-
कोणत्याही गोष्टीसाठी सतत
मनामध्ये आत्महत्येचे विचार येणं हादेखील मानसिक आजाराचा एक भाग आहे. कोणत्याही
परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तुम्ही डगमगत असाल आणि त्यावर उपाय म्हणून फक्त आणि
फक्त आत्महत्या इतकी एकच गोष्ट तुमच्या मनात येत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे.
त्यामुळे असं जर तुमच्याबरोबर सतत होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यायला
हवी.
मानसिक ताणातून बाहेर पडण्याचे
उपाय :-
१. मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर - Psychiatrist medical doctor
२. मानसशास्त्रज्ञ - Psychologist -
४:मानसिकतेत बदल :-
१. होऊन होऊन काय होणार आहे -
असा विचार करावा आणि त्याकरता मानसिक तयारी करावी. म्हणजे कितीही नुकसान झाले तरी
ते सोसण्याची तुमची मानसिक तयारी होईल.
२. मानसिक तणाव नेमका कोणामुळे
आणि कशामुळे येत आहे याचे उत्तर असेलच. मग सद्यपरिस्थितीत तुम्ही काय करू शकता, तुमच्या हाती
काय काय आहे याचा विचार करावा आणि ते प्रत्यक्षात आणावे.
३. प्राणायाम, ध्यान, सूर्यनमस्कार, योग हे मानसिक
आणि शारीरिक स्वास्थ्य देणारे व्यायाम जरूर करावेत.
४. छन्द ज़ोपासावेत, आवडते खेळ
खेळावेत. जे तुम्ही केले असेल किंवा जे छन्द आधी केले नसतील ते आतातरी करावेत.
फोनपेक्षा घरच्यांना, फक्त चांगल्या मित्रांना भेटावे आणि बोलावे.
·
या सोबत चांगल्या
निष्णात व अनुभवी होमिओपाथीक डॉक्टरचा सल्ला घ्यावा.होमिओपाथी मध्ये Argentum Nitricum, Arsenicum album, Calcarea carbonica, Kali phosphoricum, Lycopodium, Phosphorus, Pulsatilla.या औषधांचा प्रामुख्याने वापर केला
जातो.