थायराॅइड का होते? कारणे व उपाय

Homoeopathyandmagic in marathi language
0

                                  थायराॅइड का होते? कारणे व उपाय


थायरॉईडग्रंथी:-

थायरॉईड ही एक लहान ग्रंथी मानेच्या खालच्या बाजूला असते. तिचे काम शरीराची चयापचय क्रिया नियंत्रणात ठेवणे हे असते

चयापचय क्रिया नियंत्रणात ठेवण्यासाठी थायरॉईड संप्रेरकांचे उत्सर्जन करत असते जे शरीरातील पेशींना उर्जेचा वापर कसा करायचा ते सांगते. संप्रेरकांचे उत्सर्जन झाल्यानंतर त्याचा वापर शरीर करते. ही प्रक्रिया सतत सुरु राहते. जर ही प्रक्रिया बिघडली तर थायरॉईडचा त्रास बळावतो. म्हणजेच शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त संप्रेरके तयार करते आणि उर्जेत रुपांतर झालेल्या संप्रेरकांचा अधिक वापर केला जातो त्यावेळी तुमचा थायरॉईड हा आजार बळावतो.

ज्यावेळी थायरॉईड ही अधिक प्रमाणात संप्रेरक तयार करते, तेव्हा शरीर हे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात ऊर्जेचा वापर करते. या स्थितीला हायपरथायरॉईडीझम म्हणतात. सर्व प्रकारच्या वयोगटातील लोकांना थायरॉईड रोग होऊ शकतो. तथापि, महिलांना पुरुषांच्या तुलनेत ५ ते ८ पट अधिक प्रमाणात थायरॉईड समस्या होऊ शकते.

थायरॉइड दोन प्रकारचा असतो -

1.       हायपोथायरॉईडीझम

2.       हायपरथायरॉईडीझम


थायरॉइड होण्याची कारणे:-

खालील स्थितींमुळं हायपोथायरॉईडीझम होऊ शकतो

·         थायरॉयडीटीस म्हणजे थायरॉईड ग्रंथीचा दाह. यामुळं, तयार होणा-या संप्रेरकांचे प्रमाण कमी होते.

·         हाशिमोटोज् थायरॉयडीटीस हा एक प्रतिकार यंत्रणेचा वेदनाविरहित रोग असून तो अनुवांशिक आहे.

·         प्रसवोत्तर थायरॉयडीटीस हा रोग प्रसुतिनंतर ५ ते ९ टक्के स्त्रियांमधे होतो. ही सामान्यतः एक तात्पुरती स्थिती असते.

·         आयोडीनची कमतरता ही समस्या जगातील अंदाजे १०० दशलक्ष लोकांना आहे. थायरॉईड संप्रेरकांची निर्मिती करण्यासाठी आयोडीनचा वापर करते.

·         कार्य न करणारी थायरॉईड ग्रंथी ही समस्या प्रत्येक नवजात ४००० बालकांमधे एकाला होते. ही समस्या ठीक न केल्यास, ते मूल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विकलांग होऊ शकते.

खालील स्थितींमुळं हायपरथायरॉईडीझम होतो:-

·         ग्रेव्हज् रोगामुळं, संपूर्ण थायरॉईड ग्रंथी ही अतिक्रियाशील होऊ शकते आणि अति प्रमाणात संप्रेरक उत्पादित करते.

·         थायरॉईडच्या अंतर्गत नोड्यूल्स अतिकार्यशील होतात.

·         थायरॉयडीटीस, ही समस्या वेदनामय किंवा वेदनारहित असू शकते, थायरॉईडमधे साठवून ठेवलेले संप्रेरक मुक्त केले जातात, त्यामुळं काही आठवडे किंवा महिने हायपरथायरॉईडीझम होऊ शकतो. वेदनारहित प्रकार हा अधिक प्रमाणात महिलांमधे प्रसुतिनंतर होतो.

·    अतिरीक्त आयोडीन हे अनेक प्रकारच्या औषधांमधे आढळते आणि त्यामुळं थायरॉईड ही काही व्यक्तींमधे अति प्रमाणात किंवा कमी प्रमाणात संप्रेरक निर्माण करते.

हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझमची लक्षणे:-

हायपोथायरॉईडीझमची लक्षणे:-

·         थकवा येणे

·         वारंवार, मोठ्या प्रमाणात मासिक स्त्राव होणे

·         विसरभोळेपणा

·         वजन वाढणे

·         कोरडी, खरखरीत त्वचा आणि केस

·         घोगरा आवाज

·         थंडी सहन न होणे

हायपरथायरॉईडीझमची लक्षणे:-

  •       चिडचिडेपणा / अस्वस्थता
  • ·         स्नायू कमकुवत होणे / थरथरणे
  • ·         अनियमितकमी प्रमाणात मासिक स्त्राव
  • ·         वजन कमी होणे
  • ·         झोप नीट न लागणे
  • ·         वाढलेली थायरॉईड ग्रंथी
  • ·         दृष्टीदोष किंवा डोळ्यांची जळजळ होणे

·                   उष्णता सहन न होणे

ज्यावेळी थायरॉईड रोगाचे लवकर निदान होते, तेव्हा लक्षणे दिसायला लागायच्या आधी ही समस्या नियंत्रणात ठेवता येते. थायरॉईड रोग ही आयुष्यभराची स्थिती असते. काळजीपूर्वक नियोजन केल्यास, थायरॉईड रोग असलेले लोक आरोग्यदायी, सामान्य जीवन जगू शकतात

थायरॉईड नियंत्रित ठेवण्यासाठी उपचार :-

थायरॉइडचे विकार होण्याची कारणे गुंतागुंतीची असू शकतात. परंतु, काही पथ्य पाळल्यास होऊ घातलेले थायरॉइड विकार टाळता येतात. त्यासाठी आहार, व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला ही त्रिसूत्री आहे.

चौरस आहारः थायरॉईड समस्येची कुठलीही पार्श्वभूमी नसलेले चौरस आहाराच्या माध्यमातून या विकारांपासून दूर राहू शकतात. आयोडिन, लोह, अ जीवनसत्त्व यांचा समावेश असलेल्या पदार्थांचे सेवन हॉर्मोन्सच्या उत्पादनाला चालना देते. ज्याला थायरॉइडची समस्या आहे त्याने आहारात दही आणि दूध जास्त प्रमाणात घ्यायला हवं. कॅल्शियम, मिनरल्स आणि व्हिटॅमिनमुळे स्वस्थ उत्तम राहतं.

साखर आणि पिष्टमय पदार्थांचे मर्यादित सेवनः या दोन्ही पदार्थांमुळे चौरस आहारात बाधा येऊ शकते. तसेच वजन वाढवण्यासाठीही हे कारणीभूत ठरतात. ज्यामुळे थायरॉइडच्या उत्पादनावर आणि अभिसरणावर परिणाम होतो.

मर्यादित तेल-तूप-चरबी वाढवाणाऱ्या पदार्थांपासून दूर राहिल्याने हृदयविकार, डायबेटिससह हॉर्मोन्सच्या विकारांवर नियंत्रण मिळवता येते.

आलं ज्याला हिंदीमध्ये अदरक म्हणतात. आल्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम हे त्तत्व थायरॉइड कमी करण्यास लाभदायक ठरतात. आल्यातील एंटी-इन्फ्लीमेंट्री हे गुण थायरॉइड वाढण्यापासून रोखतात.

व्यायामः दररोज ३० मिनिटे व्यायाम केल्याने रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे रक्तातील थायरॉइड शरीराच्या सर्व पेशींपर्यंत पोहोचते.

थायरॉइड ग्रस्तांना थकवा जास्त जाणवतो. अशात ज्येष्ठमधाच्या सेवनाने त्यांना चांगला फायदा होतो. ज्येष्ठमधातील गुणकारी तत्व थायरॉइड ग्रंथीचं संतुलन बिघडू देत नाही. ज्येष्ठमधात कन्सर रोखण्याचेही गुण आहेत.

थायरॉइड ग्रंथी वाढण्यापासून रोखण्यासाठी गहू आणि ज्वारीचं तुम्ही सेवन करायला हवं. थायरॉइडची समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदात हा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय सांगितला आहे. याशिवाय सायनस, उच्च रक्तदाब आणि रक्ताची कमी अशा विविध समस्यांवरही हा प्रभावी उपाय आहे.

थायरॉइडग्रस्तांनी जितक्या जास्त फळ आणि भाज्या सेवन केल्या तितका त्यांना लाभ होतो. फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये एंटीआक्सिडेंट असतं. जे थायरॉइडला वाढण्यापासून रोखतं.

वैद्यकीय सल्लाः थायरॉइड विकाराशी संबंधित कुठलीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वजन वाढणे-कमी होणे, केस गळणे अशा विकारांसाठी स्वतःच्या मर्जीने औषधोपचार न करता वैद्यकीय तपासणी करावी. टीएसएच चाचणी थायरॉइड विकाराची अचूक माहिती देते.

प्रत्येक वर्षाला थायरॉइडची तपासणी ही सर्वांनाच लाभकारक ठरू शकते. अनेक हॉस्पिटल्स आणि लॅबरोटरीजमध्ये या चाचण्या उपलब्ध आहेत. परंतु, कोणत्या चाचण्या कराव्यात, याचा नेमका सल्ला डॉक्टरांकडूनच घ्यावा. शरीराच्या जवळपास सर्व कामगिरीवर परिणाम करणारी थायरॉइड ग्रंथी कार्यक्षम राहणे अतिशय महत्त्वाचे असते. योग्य माहिती, शरीराचे बारकाईने निरीक्षण, वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि डॉक्टरांचा सल्ला यातून आपण थायरॉईड विकार टाळू शकतो.

होमिओपॅथीक उपचार पद्धती ही एक जगमान्य उपचार पद्धती आहे ,या उपचार पद्धतीच्या मदतीने आपण अनेक असाध्य आजारांवर मात करू शकतो.या मध्ये थायरॉइड साठी प्रामुख्याने iodine(आयोडाइन),ब्रोमीयम(bromium),कॅल्कॅरीया फॉस(calcaria phos),लायकोपस(LYCOPUS), या औषधांचा वापर केला जातो .याच्या नियमित वापराने आपण या आजारावर मात करू शकतो.

होमिओपथिक औषधा चा जरी काही दुष्परिणाम नसला तरी याचा वापर करण्यापूर्वी निष्णात डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही चांगले.

 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)