पाठ दुखी का होते? कारणे व उपाय
पाठदुखीचा त्रास झाला नाही अशी व्यक्ती सापडणे दुर्मीळच. डोकेदुखीनंतर सर्वाधिक लोकांना होणारा त्रास म्हणजे पाठदुखीचा, तरीही आपण सर्वच पाठदुखीविषयी खूप बेफिकीर असतो. पाठदुखीची तीव्रता सौम्य असेल, तर आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र नंतर त्रास जास्त वाढतो. कधी एखादी वस्तू उचलताना पाठ भरते, तर कधी सकाळी झोपेतून उठतानाच पाठीने बंड पुकारल्याचे लक्षात येते. पाठीला आधार देणारे स्नायू, हाडे, सांधे यांना त्रास झाला की पाठीचा खालचा भाग दुखायला लागतो.
स्त्री असो किंवा पूरुष कोणत्या ही वयोगटातील व्यक्तीला पाठदुखीचा त्रास हा होऊ शकतो. अगदी शाळेत जाणारी मुलांची ही दप्तराच्या ओझ्याने पाठ दुखू शकते. महिलांची अनेक कामे ही शारीरिक हालचालींवर अवलंबून असतात, तसेच ऑफिस मध्ये तासंतास एकाच जागी बसून पाठ आखडते व नंतर पाठ दुखीचा त्रास होण्यास सुरुवात होते. कधी कधी या कडे आपण दुर्लक्ष करतो किंवा वाटेल तो घरगुती उपाय केला जातो. पण घरगुती उपाय करण्या आधी तुमच्या पाठ दुखीचे नेमके कारण काय आहे ते तुम्हाला स्वतःला माहीत असणे आवश्यक असते. मगच तुम्ही योग्य उपाय करू शकता. आपण सर्व प्रथम पाठदुखी होण्याच्या कारणांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करु यात.
कारणे:-
पठखीची कारणे:-
१) जड वस्तू उचलणे:-
काही काही वेळेस जड वस्तु उचलल्याने पाठीमध्ये चमक भरते आणि मग पाठ दुखायला सुरूवात होते.
२) वाकुन काम करणे:-
सारखे सारखे वाकून काम केल्याने किंवा सारखे वाकल्याने सुध्दा पाठीमधले स्नायु ताणले जातात आणि त्यामुळे मग पाठीचा त्रास होवुन पाठीचे दुखणे तोंडवर काढण्यास सुरूवात होते.
३) अपघात:-
पाठीमध्ये दुखणे कधीकधी अपघात झाल्यामुळे सुध्दा होते. पाठीमध्ये एखादयावेळेस अपघातामध्ये जखम होते आणि मग पाठ दुखते.
आपण विविध मैदानी खेळ खेळत असतो, जसे की क्रिकेट आणि कधी कधी असे खेळ खेळतांना देखील पाठीमध्ये चमक भरू शकते, किंवा पाठीचा कणा सरकला जावु शकतो, यामुळे देखील पाठीमध्ये दुखत राहते.
४) कसरत:-
आपण विविध मैदानी खेळ खेळत असतो, जसे की क्रिकेट आणि कधी कधी असे खेळ खेळतांना देखील पाठीमध्ये चमक भरू शकते, किंवा पाठीचा कणा सरकला जावु शकतो, यामुळे देखील पाठीमध्ये दुखत राहते.
५) .चुकीच्या पध्दतीनं बसणं- कुबड काढून बसण्याची सवय असल्यास त्याचा पाठीच्या कण्याच्या नैसर्गिक ठेवणीवर होतो. यामुळे पाठीच्या खालच्या बाजूवर भार पडतो आणि त्याचा परिणाम म्हणून पाठ दुखायला सुरुवात होते. म्हणूनच तज्ज्ञ म्हणतात की, आपण बसून काम करत असलो तरी दर अध्र्या तासानं आपण आपलं डोकं मान खाली वर , डावीकडे उजवीकडे फिरवायला हवी. यामुळे पाठीच्या कण्याला आराम मिळतो. पाठ दुखत असल्यास तिथे बर्फानं किंवा गरम पाण्याच्या पिशवीनं शेकावं. आणि दुखणं कमी वाटत नसल्यास आहे पाठदुखी असं न म्हणता डॉक्टरांना भेटावं
६) चुकीच्या गादीवर झोपणं- पाठीला आराम सर्वात जास्त रात्री आपण गादीवर पाठ टेकवतो तेव्हाच मिळतो. पण हल्ली गाद्याच पाठीच्या, मणक्याच्या दुखण्याचं कारण झालं आहे, गादीवर झोपल्यावर पाठ ही सरळ राहाण्यासाठी गादी कडक असायला हवी तसेच शरीराला आराम देण्याइतपत नरमही असायल हवी. एकदम कडक आणि अगदीच मऊ गादी पाठीसाठी चुकीची मानली जाते. चुकीच्या गादीवर झोपल्यामुळे पाठीचे स्नायू, हाडे हे चुकीच्या अवस्थेत राहातात त्याचाच परिणाम पाठ दुखी होण्यावर, पाठ दुखी गंभीर होण्यावर होतो.
७) एका जागी तासनतास बसून काम करणे- हल्ली बैठं काम करण्याची सवय वाढलेली आहे. तासनतास एकाच अवस्थेत खुर्चीत बसून राहिल्यानं पाठीचे स्नायू, मान आणि पाठीच्या कण्यावर ताण पडतो. त्यातच खुर्चीत बसून आणि वाकून काम केल्यानं पाठीवर आणखी वाईट परिणाम होतो. खुर्ची ही किती का आरामदायी असू देत पण खुर्चीत तास न तास बसून राहाणं ही चुकीची पध्दत आहे. एका जागी खूप वेळ बसल्यानं पाठीला आराम नाही तर थकवा येतो. म्हणून दर अर्धा तासानं खुर्चीतून काही मिनिटं फिरुन येणं हे आवश्यक आहे.
पाठदुखी च्या समस्यांवर उपाय:-
१) पाठीचा कणा ताठ ठेवा
चालताना किंवा बसताना, पाठ सरळ ठेवा, यामुळे तुमचा पाठीचा कणा ताठ राहतो. वाकून बसल्याने पाठदुखीची समस्या निर्माण होत असते. विशेषतः ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवत असलेल्या व्यक्तींनी बसताना पाठ नेहमी सरळ ठेवली पाहिजे. तसेच कार्यालयात काही वेळानंतर फेरी मारत पुन्हा कामाला सुरुवात केली पाहिजे
२) व्यायाम करताना वाकने टाळावे
अनेक लोक पाठीचे दुखणे जाण्यासाठी तसेच शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करतात. परंतु ज्याना पाठीचे दुखणे आहे अशा लोकांनी काही व्यायाम टाळायला हवे, वाकून व्यायाम करणे तुमची पाठदुखी अजूनच वाढवू शकते. त्यामुळे असे व्यायाम न केलेले बरे असतात.
३) सलग काम करु नका
काहींना कामाचा इतका ताण असतो की, त्यामुळे ते संपूर्ण वेळ फक्त कामच करीत असतात. काही क्षणाचीही उसंत घेत नाही. त्यामुळे सतत बसून असल्यामुळे पाठीचे दुखणे लागू शकते. त्यामुळे कामात काही वेळाची विश्रांती आवश्यक असते. कामांत किमान एक तासाच्या अंतराने ब्रेक घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही कुठे बाहेर जाऊ शकत नसाल तर तुमच्या ऑफिसमध्येच एक फेरी मारा व पुन्हा कामाला लागा.
४) जड वस्तू उचलू नका
कोणतीही जड वस्तू उचलू नका. जर एखादी जड वस्तू उचलायची असेल तर आधी गुडघे वाकवून मग ती वस्तू उचलावी. असे केल्याने सर्व भार कंबरेवर जाण्याऐवजी गुडघ्यावर येईल, तसेच अवजड कामे करताना कुणाचीतरी मदत नक्की घ्या, यातून सर्वच भार तुमच्यावर येणार नाही.
५) सकस आहाराचा समावेश करा
पाठदुखीसह अन्य दुखणे मुळापासून नष्ट करण्यासाठी आपल्या रोजच्या जेवणात सकस आहाराचा समावशे करणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन डी 3, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम, फॉस्फरस, हिरव्या भाज्या खाल्ल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो. जर तुम्ही मांसाहार करू शकत असाल तर आहारात माशांचा नक्कीच समावेश करा. यातून आपली हाडे मजबूत होत असतात
६) वळून एखादी वस्तू घेणे : जवळपासची एखादी वस्तू घ्यायची असेल तर कमरेला पीळ न देता पायांचा वापर करून वळावे.
७) चालणे : चालताना मान वर व ताठ हवी. डोके उंच व ताठ, हनुवटी आत ओढून आणि पायाचे अंगठे सरळ पुढच्या दिशेला ठेवून चालायला हवे.
होमिओपॅथीक उपचार पद्धतीने आजार मुळापासून नष्ट होतात व आपल्याला कायमस्वरूपी आराम मिळतो. होमिओपॅथी मध्ये पाठ दुखी साठी पुढील औषधांचा वापर केला जातो. Arnica, calcaria carb, Nux vomica, calcaria phos ही औषध गुणकारी ठरतात.