अवकाळी पाऊस व इतर मिमांसा

Homoeopathyandmagic in marathi language
0

                 

                      पुढील तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 5 ते 8 मार्च दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 7  मार्च रोजी मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होईल. शिवाय आज देखील नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगावात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी आज पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भात अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.   

            महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये आपल्या हवामान अंदाजासाठी पंजाबराव डख हे विशेष लोकप्रिय आहेत. शेतकऱ्यांच्या मते त्यांचा अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याने त्यांना याचा मोठा फायदा होत आहे. विशेष म्हणजे पंजाबरावांनी नुकताच 28 फेब्रुवारी रोजी एक हवामान अंदाज सार्वजनिक केला होता.त्यांच्या मते या कालावधीमध्ये उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच नंदुरबार , धुळे, जळगाव, अहमदनगर, नासिक पट्ट्यात मोठा पाऊस पडेल. दरम्यान त्यांनी हा वर्तवलेला अंदाज सत्यात उतरला आहे. 04 मार्च रोजी रात्री नासिक जिल्ह्यातील कळवण, मालेगाव, सटाणा, देवळा या भागात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पाऊस पडला आहे. अहमदनगर मध्ये देखील पावसाची हजेरी राहिली आहे. खानदेशात देखील काही ठिकाणी पाऊस आणि ढगाळ हवामान पाहायला मिळाले आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांचा सविस्तर अंदाज जाणून घेण्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आज आपण पंजाब रावांनी वर्तवलेला सविस्तर हवामान अंदाज आपल्या वाचक मित्रांसाठी घेऊन आलो आहोत. पंजाबरावांच्या मते 10 मार्चपर्यंत राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नासिक, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, शिर्डी, माजलगाव, शिरूर या भागात पाऊस पडणार आहे.

तसेच यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना होळीच्या सणाला पाऊस हमखास पडतो असे देखील सांगितलं. त्यांच्या मते होळी सण होऊन दोन दिवसांनी कायमच पाऊस पाहायला मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नेहमी ही गोष्ट ध्यानात ठेवून आपल्या शेती कामांचे नियोजन आखले पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलं. निश्चितच, पंजाबरावांचा अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला असल्याने त्यांनी वर्तवलेला हवामान अंदाज म्हणजेच काळ्या दगडावरची पांढरी रेष अस मत शेतकरी व्यक्त करत आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)