मुल वाढवताना लक्षात घ्यावायाच्या काही महत्वाच्या बाबी

Homoeopathyandmagic in marathi language
0

                                     



लहान मुल ही फुला सारखी असतात त्यांना जर व्यवस्थित जपल,त्यांच्यावर योग्य संस्कार केले तर ती सुगंधी फुलाप्रमाणे सर्वत्र दरवळतील.

आदरणीय साने गुरजी यांनी म्हटल्या प्रमाणे,"मुले ही देवा घरची फुले असतात.

मुल वाढवताना सर्वसाधारण काही  महत्वाच्या बाबी:-

१)मुलांकरिता उत्तम भेट म्हणजे पालकांची वेळ 


आजच्या काळात मुलांन बरोबर सुसंवाद साधने ही काळाची गरज आहे,मला वेळ नाही ,मी कामात आहे या सारखी कारणे देणे हे भावी  काळासाठी व मुलांच्या एकंदरीत वाटचालीसाठी धोकादायक ठरू शकते.

मुलांशी सहज संवाद साधा,मुलानला त्यांच्या लहानपना पासूनच सुसंवाद साधणे जमले पाहिजे.जेणे करून त्याला त्याच्या भावी काळात समाजात मिसळताना अडचण येणार नाही,यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांनला वेळ देणे

मुलांनला कुठल्याही प्रकारची शिकवणूक देताना मुलांनला मला वेळ नाही अशी सबब देताना आपण विजेचा शोध लावणाऱ्या एडिसन कडे जेवढा वेळ होता तेवढा तर अपल्या कडे नक्कीच असणार .

२ )आपल्या मुलाला समजून घ्या :-


       सकारात्मक शब्दाचे तरंग आपल्याला स्वास्थय प्रदान करतात ,त्या मुळे मुलांशी बोलताना नेहमी सकारात्मक बोलावे आणि आशावादी शब्दांचा वापर करावा .मुलांच्या शंका त्यांना पडणारे प्रश्न याकडे दुर्लक्ष न करता ते समजून त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करावा .सुरवातीला माणूस सवयी बनवतो नंतर तो त्या सवयीचा गुलाम बनतो ,त्यामुळे मुलानला चांगल्या सवयी लावा कारण याच सवयी पुढे चालून त्यांचे भविष्य घडवणार आहेत .

३)इतर मुलांशी आपल्या मुलाची तुलना करू नका :-                 

      आपण या ठिकाणी एक एक बाब विचारत घेतली पाहिजे कि,आपल्या हाताची पाचही बोटे सारखी नसतात तसेच प्रत्येक मुल हे वेगळ असत त्याच्या सवयी वेगळया असतात ,त्यामुळे आपण आपल्या मुलाची तुलना इतर मुलांन सोबत करणे टाळले पाहिजे.केवळ शालीय प्रगती म्हणजे जीवन नाही याचा प्रत्येक पालकांनी विचार केला पाहिजे.तसेच मुलांच्या इतर कला गुणांना वाव दिला पाहिजे,व मुलांना उत्तेजन दिले पाहिजे
४)मुलांना अपयशाचा अर्थ शिकवा :


सर्वप्रथम प्रत्यक मुलास हे सांगा कि.अपयश अशी काही बाब नसतेच ते म्हणजे  प्रयत्न करताना ज्या प्रमाणे अडथळे येतात त्या प्रमाणे अपयश म्हणजे अडथळयाची शर्यत असते ती ज्या समर्थ पणे आपण पार करू तेवढे आपण सक्षम होतो.अपयश म्हणजे निरंतर शिकण्याची प्रक्रिया असते,त्यामुळे जरी अपयश आले तरी न खचता पुन्हा नव्यानी सुरवात कारणे बंद करयाचे नसते हे शिकवा आणि हे सांगा कि,अपयश हि काही शेवटची संधी नसते ,जीवनात संधी येतात जातात पण त्या काही शेवटच्या नसतात .
५ )मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्याची संधी दया:

   मुलांचा आत्मविश्वास  वाढविण्यासाठी साठी त्यांच्या आवडी निवडी जोपासल्या पाहिजेत तरच मुल त्याच्या भावी जीवनात सुखी व समाधानी राहील यात तीळ  मात्र शंका नाही ,यासाठी मुलांन मधील सुप्त गुणांची पालक या नात्यांनी जाणीव होणे गरजेचे आहे
                          




                                                                               

                                                               

               


                         

                                                                                                                         

































'

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)