पैशाची बचत व अर्थिक साक्षरता (Money planing )

Homoeopathyandmagic in marathi language
0

 

पैशाच झाड असत तर किती बर झाल असत अशी कल्पना आपण प्रत्यकाने आपल्या जीवनात कधीना -कधी केली असणार पण कल्पना ही केवळ कल्पनाच असते.प्रत्यक्ष जीवनात पैसा कमवून तो टीकव्याचा असेल तर अर्थिक नियोजन फार गरजेच आहे.या बाबत काय उपाय योजना करता  येणे शक्य आहे.याचा मागोवा घ्यान्याचा प्रयत्न करू या.

१)उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ ठेवणे आवश्यक :-

आज कालच्या धावपळीच्या काळात माणूस भौतिक सुखाच्या आहारी मोठया प्रमाणात गेलेला दिसून येत आहे . मानवाच्या अन्न ,वस्त्र ,निवारा या प्रमुख गरजांची पूर्तता करण्यापलीकडे तो जाऊन पोहचला आहे. मानवाची सुखाची कल्पना पूर्णपने बदललेली दिसून येत आहे .20 वर्षा पूर्वी असलेल्या सुखाच्या कल्पना आज मोडीत निघलेल्या आहेत . तो केवळ मृग जाळा माघे धावण्यात समाधान मानत आहे . अनावश्यक गोष्टीवर भारमसाठ प्रमाणात खर्च केला जातो. त्यामुळे अर्थकारण पूर्ण पणे कोलमडून कर्ज बाजारी व दिवाळखोरीत जाण्याचे प्रमाण वाढताना दिसून येते. आपल्या मराठीत एक म्हण आहे अंथरून पाहून पाय पसरावे याचा विसर समाज मनाला पडत असलेचे एकंदरीत चित्र समोर येत आहे . या साठी आपण उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ ठेवणे आवश्यक

आहे . खर्च हा उत्तपन्नाच्या प्रमानत केला पाहिजे . कर्ज आवश्यकता नसताना घेतला नाही पाहिजे . नियमित बचतीची सवय लावली पाहिजे

2)बचतीची गरज का आहे  :-


ही गोष्ट अत्यंत बरोबर आणि महत्त्वाची आहे की, श्रीमंत व अतिश्रीमंत समाजातील लोक सोडून इतर सर्वांनीच वर्तमानातून मिळालेल्या उत्पन्नातून पैशाची काही बचत करणे आवश्यक आहे. अर्थात ही बचत करण्यासाठी नियोजनबद्घ आणि हेतूपुरस्सर प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसा प्रयत्न जर झाला नाही, तर वर्तमानकाळात त्या व्यक्तीस आणि अनुषंगाने त्या कुटुंबास मिळणारे सर्वच्या सर्व उत्पन्न खर्च होऊन पैशाची बचत होणार नाही. कुटुंबाला कोणत्या कोणत्या मार्गांनी आणि किती उत्पन्न महिन्याला आणि अनुषंगाने वर्षाला मिळते याचा अंदाज बांधायला पाहिजे. त्यानंतर कुटुंबांच्या गरजांच्या अत्यावश्यक गरजा, आवश्यक गरजा, आणि कमी महत्वाच्या गरजा असे वर्गीकरण करायला पाहिजे. कुटुंबाला मिळणाऱ्या उत्पन्नातील अत्यावश्यक व आवश्यक गरजांवर खर्च करावा लागणारे उत्पन्न खर्च करावे आणि इतर उत्पन्नाची बचत करावी. अशाप्रकारे, कुटुंबांच्या गरजांची तीव्रतेनुसार क्रमवारी लावून वर्तमानकाळात उत्पन्नातील काही ना काही हिस्सा किमान ३० टक्के उत्पन्न बचत करायलाच पाहिजे. ही ३० टक्के रक्कम दर महिन्यास बचत करण्यात आली, तर वर्षभरात निश्चितपणे चांगली रक्कम बचत करणे शक्य आहे.आपण एकदा गरजांची क्रमवारी लावून आणि काटकसरीचा आश्रय घेवून, अनावश्यक खर्च टाळून व कपात करून बचत निर्माण केल्यानंतर ही बचत नेमकी कोठे गुंतवायला पाहिजे याचा विचार करावा लागतो. ही पैशाची बचत करताना पैशाच्या रोखतेचा व लाभतेचा एकाचवेळेस विचार करायला पाहिजे. कारण भविष्यकाळात अनपेक्षित व अचानक उद्भवणाऱ्या गरजा व संकटांना तोंड देण्यासाठी आवश्यक पैसाही उपलब्ध व्हायला पाहिजे. याबरोबरच काही परतावाही मिळवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणती बचत गुंतवणुकीची साधने उपलब्ध आहेत आणि कोणत्या दक्षता घ्यायला पाहिजेत याचाही साकल्याने व विवेकाने विचार करायला पाहिजे.

3)गुंतवणुक कोठे करावी :-

मध्यम वर्गी  कुटुंबांची व लोकांची बचत छोटीच असणार याचाही आपण विचार करायला पाहिजे. हा पैसा शक्यतो सरकारी बचत साधनांमध्ये गुंतवायला पहिजे. त्यासाठी कोणती अल्पबचत साधने उपलब्ध आहे, आणि ते कोणते फायदे मिळवून देतात याचाही विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारी बँका, वित्तीय संस्था, पोस्ट कार्यालय, विमा संस्था यांचाच अग्रक्रमाने विचार करावा. हा अल्पबचतीतील पैसा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये बचत ठेव, मुदतबंद ठेव, विमा आवर्ती ठेव यात प्रामुख्याने ठेवणे अत्यंत सुरक्षित आणि हमखास परतावा मिळवून देणारे आहे. याबरोबरच पोस्ट कार्यालयात बचत ठेव, आवर्ती ठेव, मुदत ठेव, राष्ट्रीय बचतपत्रे, पोस्टल विमा या साधनांमध्ये गुंतवणूक करावी व आपला पैसा सुरक्षित ठेवून कांही हमखास परतावा त्या बचतीवर मिळविता येतो. त्यानंतर आयुर्विमा, सर्वसाधारण विमा आणि इतर विमा कार्यालयातही विमा पॉलिसीच्या स्वरूपात बचत करून पैसा सुरक्षितता व परतावा असा सुवर्णमध्य साधता येतो. यातूनही आपणास असे वाटले की आपली बचत अधिक आहे. तर या स्थितीत सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील भाग, समभाग, ऋणपत्रे, कर्ज रोखे, म्युचुअल फंड यात गुंवणूक करावी. यातून हमखास पैशाच्या सुरक्षिततेबरोबरच निश्चित असा परतावा मिळेलच यात शंका नाही.



आपल्या बचतीतून आयुर्विमा, आरोग्य विमा, अपघात विमा या स्वरूपातही काही पैशाची बचत करणे आवश्यक आहे. यातून आपणास काही कर सवलतीचाही लाभ मिळ शकेल. कारण त्यातून आपला पैसा सुरक्षित राहण्याबरोबरच निवारा, आरोग्य, आजारपण अशा गरजांसाठीही पैसा आवश्यक त्यावेळी उपलब्ध करणे शक्य होणार आहे. कारण, आज तरी खासगी क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध करणे कठीण आहे. त्याच्याही पुढे पैशाच्या सुरक्षितेबाबत आणि परताव्याबाबत कमालीची अनिश्चितता आहे. या मितीस सुरुवातीला सार्वजनिक क्षेत्र आणि सरकारी साधने यावर अवलंबून राहावे, त्यामुळे पैसा सुरक्षितता व हमखास परतावा मिळणे शक्य आहे. येथे गरज आहे ती पैशाच्या योग्य वापर करून बचतीची आणि तिच्या योग्य गुंतवणुकीची. म्हणून असे म्हणता येईल, आणि ते बरोबरच आहे ‘पैशाची बचत, म्हणजे पैशाची मिळकतच.’
शेवटी आर्थिक साक्षरता म्हणजे तरी काय तर डोळस पणाने खर्च करून संकट काळी उपयोगी पडेल इतकी बचत करणे होय .






टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)