पैसे टिकत नाही मग करा हे उपाय (MONEY PREVENTION)

Homoeopathyandmagic in marathi language
1

 आज कालच्या महागाई च्या  काळात पैसे टिकत नाही ही ओरड आपल्या सतत कानावर येत असते.यावर आपण जर खालील काही उपाय करून बघितले तर आपणास याचा नक्कीच फायदा होऊ शकतो 

वास्तुशासत्रात या बाबीवर चांगल्या  प्रकारे  प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.त्याचा आपण थोडक्यात मागोवा घेण्याचा प्रयत्न करू या .

                                                      

१)घरात कुबेर यंत्र ठेवा :-          

भगवान कुबेर समृद्धी आणि संपन्नतेचे प्रतीक आहेत.  ते आपल्या घराच्या ईशान्य कोपर्यावर राज्य करतात. येथेच कुबेर यंत्र ठेवावे. तुम्ही  घराच्या ईशान्य भागातून नकारात्मक ऊर्जा जमा करणाऱ्या सर्व गोष्टी काढून टाका. या गोष्टींमध्ये टॉयलेट, जड फर्निचर आणि शू रॅक यांचा समावेश होतो
२)घरात  वाद विवाद टाळा :-

वास्तू आपल्या वर्तना प्रमाणे तथास्तु म्हणत असते त्या मुळे आपले  वर्तन जसे असेल त्याचा प्रभाव वास्तूवर व पर्यायाने आपल्यावर व आपण करत असलेल्या सर्व बाबींवर पडत असतो .आपली वस्तू जर नेहमी शांत राहिली तर तिच्यातून देखिल एक सकारात्मक उर्जा निर्माण होते व ती आपल्या सर्व कार्यात आपल्यला नक्कीच मदत करते.
३) घराचा मुख्य दरवाजा :-

घराचे प्रवेश द्वार हे नेहमी  साफ असावे.अंगण हा घराचा आरसा असतो असे म्हणतात ,आजकालच्या काळात अंगण हि संकल्पना जागे अभावी लोप पावत चालली आहे.परंतु जे आहे ते साफ ठेवले पाहिजे.प्रवेश द्वारा समोर केर  -कचरा राहणार नाही ,बिनकामाचे सामान बंद पडलेल्या वस्तू या राहणार नाही याची दक्षता घ्यावी
४)जर घरात तिजोरी वापरत असाल तर ती  नैऋत्य कोपर्यात ठेवा:-

                                                      

        
जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी हवी असेल तर तुमचे लॉकर किंवा तिजोरी तुमच्या घराच्या नैऋत्य कोपर्यात ठेवा. हे क्षेत्र पृथ्वीचे घटक दर्शवते, स्थिरता सुनिश्चित करते. शिवाय, तुमच्या घरातील लॉकर कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला उघडू नये. याकडे दुर्लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणावर पैशांची  हानी  होऊ शकते                                                              .
                                                                                            
५)पाणी गळती होत असेल तर ती थांबवा :-    



   स्नानगृह, स्वयंपाकघर किंवा इतर भागातून पाणी गळतीच्या घटनांचे त्वरित निराकरण केले पाहिजे. पाण्याच्या गळतीकडे दुर्लक्ष केल्याने, अगदी लहान, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते.

६)शक्य असल्यास मनी प्लांट लावा :-

मनी प्लांट हे घरात लावणे हे एक शुभ लक्षण समजले जाते.मनी प्लांट हे चार पाच प्रकारात उपलब्ध आहेय.त्या पैकी आपल्यला जे योग्य वाटेल ते निवडून लावावे. त्याची योग्य निगा ठेवल्यास थोडया कालावधीत ते चांगल्या प्रकारे वाढते .यांनी देखिल सकारात्मक वाढून पैसा टिकून राहण्यास मदत होते.



टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा