अकाली केस पांढरे होतायत का? जाणून घ्या कारणे व उपाय:-
आज कालच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या आजुबाजूला नजर टाकली तर आपल्याला दिसून येते की,पाच-सहा वर्षाच्या मुलाची देखील केस पिकलेले आढळून येतात तेव्हा आपण अचंबित होतो.आपल्या धारणेनुसार केस पिकण्यास सुरुवात झाली म्हणजे ती व्यक्ती वृद्धत्वा कडे वाटचाल करण्यास सुरु झाली असे समजले जाते परंतु आपल्या भोवताली तर लहान मुलांचे देखील केस पांढरे दिसतात त्यामुळे असा संभ्रम निर्माण होतो कि नक्की वृद्ध कोणास समजावे.ही अकाली केस पांढरे होण्याची समस्या नक्की कशामुळे उद्भवली व याच्यावर उपाय काय याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. अकाली केस पांढरे होण्याची करणे :-
१)केसाची निगा न राखणे
आज कालच्या काळात मानव हा कधी नाही इतका स्वता बद्दल व स्वताच्या बाह्य स्वरूपा बद्दल चोखंदळ झाला आहे .त्यात भर म्हणजे इलेक्ट्रॉनिक मिडिया व सोशल मिडियातून ज्या बद्दल आपणास कुठल्या ही प्रकारची माहिती नाही आशा उत्पादनाचा प्रचार व प्रसार झपाट्याने होत आहे व आपण त्याला सहजासहजी बळी पडत आहोत .यात रासयनिक मिश्रण असणारी शाम्पू ,कंडीशनर.साबण,हेअर कलर याचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो.यामुळे आपल्या केसाचा रूट म्हणजे केसाचे जे मूळ आहे त्यास धोका पोहचतो .त्यामुळे केसांना आवश्यक असणारी पोषक तत्व केसान पर्यंत पोहचत नाही .त्यामुळे केसाच्या पोषणात आडथळा निर्माण होतो .एकदा केसाचे रूट खराब झाले की,ते कमजोर होण्यास सुरुवात होते त्यामुळे ते वेगात तुटते .यामुळे केस गळती होण्यास देखील सुरुवात होते .
२)अनुवंशिकता :-
अनुवंशिकता हा घटक देखील केसा च्या आरोग्यावर परिणाम करणार एक महत्वाचा घटक आहे .जर आपल्या आई किंवा वडिलांचे केस अकाली पांढरे झालेले असतील तर आपले केस अकाली पांढरे होण्याची शक्यता जास्त असते .त्यामुळे कुटूबाचा इतिहास देखील यात महत्वाची भूमिका निभावत असतो .
३)ताण-तणाव:-
ताण तणावाचा आपल्या दैनंदिन जीवनावर दूरगामी परिणाम होत असतो .तनावामुळे आपल्या सर्व शारीरिक रचनेवर परिणाम होतो .यामुळे पचन व्यवस्था बिघडते त्यामुळे शरीराला गरजेचे असणारे पोषक घटक निर्माण होण्यास अडथळा निर्माण होतो त्यामुळे त्याचा परिणाम केसावर देखील होतो .ते कमजोर होतात .व ते पांढरे होण्यास सुरुवात होते.
४)व्यसनाधीनता:-
आज काल तरूण पिढी सहजासहजी व्यसनाच्या विळख्यात सापडताना दिसून येते.त्यामध्ये धुम्रपान अल्कोहल सेवन विविध प्रकरची अमली पदार्थ यांचे प्रमाण आढळून येते .त्यामुळे या तरून वर्गात अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे .
५)वाढते प्रदूषण :
जग जशी भौतिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे तसे आपल्या माघे बर्या वाईट खुणा सोडून जात आहे .त्याचे परिणाम नवीन येणाऱ्या पिढीला विशेष करून भोगावे लागत आहेत .याचा एक परिणाम म्हणजे आपले केस .या प्रदूषणा मुळे आपले केस याला बळी पडत आहेत व अकाली तुटून गळत आहेत व पांढरे होऊ लागले आहेत .
६)कमी वयातील असाध्य आजार :-
कमी वयात जर मधुमेहा सारखे आजार व इतर असाध्य आजर जर झाले तर त्याचा सरळ परिणाम आपल्या शरीर रचनेवर व पोषण घटकावर होतो परिणामी तो केसाच्या रुपाने प्रकट होतो .
या कारणामुळे अकाली केस पाढरे होतात. आता आपण अकाली पांढऱ्या होणार्या केसावर उपाय बघुयात.
अकाली केस पाढरे होण्यावर उपाय :
रासायनिक युक्त शाम्पू ,साबण ,याचा वापर कमी करावा त्याजागी नैसर्गिक घटक नारियल तेल .आवळा तेल ,शिकाकाई याचा केसावर वापर करावा .केस धुताना केमिकल युक्त घटक वगळून केस धुवावे
२)चिंता मुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करावा :
ताण तणावामुळे केसाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो त्यामुळे तणाव मुक्त आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा .
३)ध्यान व योगा :
ध्यान व योगा केल्याने मनावरील ताण कमी होण्यास मदत होते .त्यामुळे रोज वेळ काढून योगा व ध्यान करणे कधीही योग्य .
४)पुरेशी झोप :
पुरेशी झोप ही आरोग्यासाठी संजीवनी बुटी प्रमाणे काम करते .पुरेशी मिळाली तर शरीराला सर्व शारीरिक क्रिया करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो व त्याचा परिणाम शरीराच्या इतर सर्व अवयवान वर होतो .व आरोग्य उत्तम राहण्यास यामुळे नक्कीच मदत होते .
५) वाईट सवयींचा त्याग करणे :
वाईट सवयी व व्यसन यांचा त्याग करून त्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करणे फार गरजेचे आहे .त्यामुळे आपल्या आरोग्यावर होणारे घातक परिणाम टाळण्यास नक्कीच मदत होईल यात शंका नाही
होमिओपथिक औषध पद्धती ही आता जगमान्य पावलेली पद्धती बनली आहे या पद्धतीचा वापर करून अनेक असाध्य अशा आजारांवर उपचार केले जात आहेत .या लेखाच्या माध्यमातून आपण केस गळती व केसाच्या समस्येवर असणारी काही होमिओपथिक औषध याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करू यात
होमिओपथिक औषध:
पिलोकार्पास (PILLOCARPUS)
आपल्या शरीरात असणार्या मेलेनीन नावाच्या घटकामुळे आपल्या त्वचेचा व केसाचा रंग ठरतो .या औषधा च्या वापरामुळे शरीरात मेलेलीन तयार होण्यास मदत होते .शरीरात निष्क्रिय असणार्या मेलेनीन पेशींना सक्रीय करण्यास मदत होत असल्याने पांढरे केस काळे होण्यास सुरुवात होते .
लायकोपोडीयम:(LYCOPODIUM )
ज्याची पचन शक्ती कमजोर आहे अशा व्यक्ती साठी हे औषध अत्यंत रामबाण काम करते .या मुळे पचन शक्ती सुधारून शरीराला आवश्यक असणारे घटक सम प्रमणात मिळून शरीराचे पोषण होते .व केस गळती ,अकाली पांढरे होणे यासारख्या समस्यांवर उपाय करण्यास मदत होते
नैट्रुम मुरीटिकम(NITRUM MURYTICUM :महिलां करिता )फोसफरिकम (PHOSPHRICUM :पूरशान करिता )
या औषधांचा वापर हा हार्मोनल असतुनला मुळे केस पांढरे होत अकाली पांढरे झाले असतील या औषधा चा वापर केला जातो हे औषध स्त्री व पुरुष दोघांवर वर नमूद केल्या प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे करते .कमी वयात जर असाध्यआजार झाला असेल व त्याच्या परिणामी केस गळती अथवा अकाली पांढरे झाले असतील तर त्यावर हे औषध उत्तम रित्या काम करते .
एसिड फोस्फरिकम (ACID PHOSPHRICUM ):
या औषधा च्या वापरामुळे कमी पडलेल्या पोषक तत्वाच्या भरपाई करण्यास मदत होते .त्यामुळे केस गळती ,केस तुटणे ,पांढरे होणे याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते .
होमिओपथिकऔषधाचा जरी काही दुष्परिणाम नसला तरी या औषधाचा वापर करण्या पूर्वी निष्णात होमिओपथिक डॉक्टर चा सल्ला घेणे आवश्यक आहे .
सदर लेख आपणास कसा वाटला हे कमेंट करून नक्की काळवा आम्हाला तुमच्या प्र्तीक्रियाची प्रतीक्षा आहे ..