वाढत्या वजनाच्या समस्येवर रामबाण उपाय(over weight problem solution )

Homoeopathyandmagic in marathi language
0

                                             वाढत्या वजनाच्या समस्येवर रामबाण उपाय

अन्न ,वस्त्र ,निवारा या मानवाच्या तीन मुलभूत गरजा आहेत.मुलभूत म्हणजे अत्यंत गरजेच्या. या शिवाय मानवाचे आडू शकते अशा गरजा.या गरजान मध्ये थोडे फार जरी इकडे तिकडे झाले तरी मानवी जीवनावर त्याचा दूरगामी परिणाम घडून येऊ शकतो .या मुलभूत गरजा मधील अन्न ही गरज अत्यंत महत्वाची आहे.या गरजेचा लंबक थोडा फार जरी इकडे तिकडे झाला तरी मानवी जीवनात उलथापालथ घडून येऊ शकते .आफ्रिकेतील जवळ जवळ ६० टक्के देश उपासमारीने ग्रस्त असल्याचे आज दिसून येते.त्याचबरोबर विकसन शील म्हटल्या जाणाऱ्या आपल्या भारतात देखील उपासमारीची मोठी समस्या होती.हरितक्रांती च्या प्रयोगाने आपण त्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे.तरी देखील आदिवासी बहुल भागात बाल मृत्यू च्या प्रमाणात वाढ होताना दिसून येते .सरकार जरी त्या वर उपाय योजना करण्याचा प्रयत्न करत असले तरी तो तितकासा फलदायी झाल्याचा दिसून येत नाही .अशी एकीकडे अवस्था असताना दुसरी कडे या उलट परीस्थिती दिसून येते .या मध्ये दोन वर्गा मधील तफावत म्हटली तरी चालेल यात एक वर्ग असा आहे कि ज्याला दोन वेळेला हाता तोंडाशी गाठ पडण्याची भ्रांत आहे.व एक वर्ग असा आहे जो अति पोषणाचा शिकार झाला आहे व त्याला वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरावे लागत आहेत पण त्याचा काही ही असर न पडता उलट इतर आजाराची निर्मिती होत आहे .


आज अतिरिक्त वजन ही इतर जगतिक समस्या सोबत एक जागतिक समस्या बनत आहे.जागतिक सोबत ती एक कौटूबिक समस्या बनत आहे.याने सर्व परिवार ग्रस्त असल्याचे आपल्याला दिसून येते. स्वताला विकसित म्हणून घेणाऱ्या देशात ही समस्या फार झपाट्याने पसरत आहे .अतिरिक्त वजन हे आपल्या सोबत अनेक आजर देखील घेऊन येत आहे.यामुळे तरूण पिढी याच्या विळख्यात लवकर सापडत आहे.
वजन वाढीचे करणे :-
१)खाण्या पिण्याच्या चुकीच्या वेळा
२)अपुरी झोप
3)आहारात फस्ट फूड चे प्रमाण जास्त असणे
४)अल्कोहोल सेवनाचे जास्त प्रमाण 
५)कामाच्या सवयी ,बैठे कामाचे स्वरूप 
६)शारीरिक हलचल व्यायामाचा अभाव 
७)अनुवांशिकता
८)_शारीरिक व्याधी व त्यासाठी घेण्यात येणारी औषध
९)पालेभाज्या आहारात कमी असणे 
तुमच्या कंबरेचे माप ३७ इंच पुरुष असाल तर व स्त्री असाल तर ३१.५ पेक्षा जास्त असेल तर तुमचे आरोग्य धोक्यात आहे असे समजण्यास हरकत नसावी .परंतु तुमचा शरीर भार सूचकांक किती आहे याची सर्व प्रथम खात्री करणे गरजेचे आहे .तुमच्या शरीराचा शरीर भार सूचकांक 20 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही लठ्ठ पणाच्या श्रेणीत मोडता .आणि जर तुम्ही 25.9 ते 29.5 मध्ये असाल तर तुम्ही अति लठ्ठ या श्रेणीत मोडता .
वजन वाढीचे दुष्परिणाम :-

१)उच्च रक्तदाब आणि श्वसन विकार

२)झोपेचे प्रमाण कमी होणे 

३)हृदयात वेदना होणे 

४)गुडघे आणि पाठी खालच्या भागात वेदना 

५)पचन समस्या बिघडणे .

६)कोलास्ट्रोल वाढणे

७)मधु मेह सारख्या समस्यांची सुरुवात होणे .

जर वेळीच वजन वाढीवर नियंत्रण मिळवले नाही तर त्याचे अत्यंत दूरगामी परिणाम होऊ शकतात .

वजन वाढी वर उपाय :-

१)योग्य वेळी जेवण घ्या .जेवणाची वेळ चुकवू नका

२)पुरेपूर झोप घेणे

३)मद्यपान कमी करणे 

४)प्रक्रिया केलेले अन्न व जंकफूड टाळावे

५)सहा महिन्यातून एक वेळ रक्त चाचणी करावी

६)आहारात फळ,भाजीपाला,डेअरी युक्त पदार्थ याचा समावेश करावा 

७)वर्षातून एक वेळेस संपूर्ण शरीराची तपासणी करून घ्यावी 

या उपायाचा प्रमुख्याने वापर करावा.

याच  बरोबर होमिओपथिक उपचार पद्धतीने देखील वजनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते .

यामध्ये कॅल्कॅरीया कार्ब ,नेटरम फॉस,लायकोपोडीयम ,नेटरम मुर्याटीकम ,ग्राफायटीस या सारख्या औषधाचा वापर करून वजन करून वजनात घट करता येऊ शकते .

होमिओपथिक औषधाचा जरी काही दुष्परिणाम नसला तरी या औषधाचा वापर करण्यापूर्वी निष्णात डॉक्टर चा सल्ला घेणे आवश्यक आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)