मानसिक चिंता कारणे व उपाय (Mind depression cause and solution)

Homoeopathyandmagic in marathi language
0

  मानसिक चिंता  कारणे व उपाय (Mind depression cause and solution)



                                                  

आज काल माणूस  हसण विसरत चालला आहे .आजकाल माणूस संवाद साधणे विसरत चालला आहे.माणूस बंद कपाटात असणार्य शोभेच्या वस्तूची जागा घेण्याच्या तयारीत असल्याप्रमाणे वागतो आहे.माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात जग  छोटे बनत चालले आहे व माणूस अधिकाधिक एकाकी बनत चालला आहे .आपण  आपल्या पासून शेकडो किलो मीटर अंतरावर असणार्या व्यक्ती सोबत सहज तास तास भर गप्पा मरतो ,त्याचे सुख दुख समजून घेण्याचा प्रयत्न करतो .त्याला शाब्दिक स्वरुपात भवनीक साद घालत बसतो .परंतु आपण ज्या एका छता खाली राहतो ,ज्यांच्या सोबत राहतो त्याच्याशी बोलण्यास मात्र आपणास वेळ मिळत नाही .आपण एकाच छता खाली राहून देखील  आपल्याला कुटुंबातील व्यक्तीची सुख दुख त्याच्या जीवनातील समस्या याविषयी कधी कधी तीळमात्र कल्पना नसते.थोडक्यात सांगयचे म्हणजे आपली समाजव्यवस्था ही संवादा कडून विसंवादा कडे वेगाने वाटचाल करत आहे.या वेगा मुळे आपण व आपली समाजव्यवस्था ,कुटुंबव्यवस्था  यात भरडली जात आहे .व याचा परिणाम म्हणून समाजात वाढणारी  समाजिक अस्वस्थता  उद्विग्नता .आज आपण या लेखाच्या मध्यमातून मानसिक अशांती साठी  कारणीभूत असणार्या घटकाची एकंदर कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करणार आहोत . आपण सर्वांनी कधीना कधी ,कुठल्याना-कुठल्या चिंतेत दिवस काढले असतील परंतु ती वेळ गेल्यानंतर आपल्या लक्षात आले असेल की,अरे आपण ज्या बाबत चिंता करत होतो त्यात तर काहीच अर्थ नव्हता.म्हणजे साप समजून आपण जीभुई धोपटत होतो ती तर दोरी होती.
मानसिक अशांती कारणे:-
१)घरातील अथवा कामाच्या ठिकाणी असणारे वातावरण:-
आपण जर काही काम करत असलो तर आपला बहुतेक वेळ हा कामाच्या ठिकाणी च जातो.तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांन सोबत तिथल्या एकंदरीत वातावरणा सोबत आपण समरस होऊन जातो.कामाच्या ठिकाणी असणारे वातावरण जर योग्य असेल तर आपले मन प्रसन्न राहाते.आपला कामाच्या प्रती उत्साह मोठ्या प्रमाणात वाढतो.परंतु स्थिती जर यांच्या उलट असेल तर मात्र आपली मानसिक स्थिती ढासळण्यास सुरूवात होते.त्याचा परिणाम आपल्या देह बोलीवर व आपल्या सर्व व्यक्तीमत्वर होतो.व आपण चिंता व निराशेच्या डोहात विहार करु लागतो.व कधी कधी नाका तोंडात पाणी जाऊन श्र्वास बंद पडण्याची वेळ येते.
याच प्रमाणे आपले घरगुती वातावरण कसे आहे,चर्या ठिकाणी कुठल्या समस्या आहेत याचा देखील प्रभाव आपल्यावर पडतो.व आपले मानसिक स्वास्थ्य याने प्रभावित होते.
२) सामाजिक वातावरण:-
आपली जडण घडण कुठल्या वातावरणात झाली यावर देखील आपले मानसिक आरोग्य अवलंबून असते.आपल्या आजुबाजुचे वातावरण कसे आहे यावर देखील आपली मानसिक जडणघडण होत असते
३)बालपण:-
आपले बालपण हे आपल्या जीवनाला दिशा देण्याचे महत्त्वाचे काम करत असते म्हणजेच ज्या प्रमाणे एखाद्या रोपटयाची निटनेटकी काळजी घेतली तर ते पुढे चांगले फळ देते तसेच मनुष्याचे देखील असते.आपल बालपण जर अत्यंत त्याला खाली गेले तर आपण देखील पुर्ण आयुष्य भिती, चिंता यांच्या सावटाखाली च जगतो.व आपल सर्वांगिण व्यक्तीमत्व तसे बनते.
3) व्यसनाधीनता:-
मानसिक आरोग्य बिघडविण्यात हा घटक मोलाची भूमिका बजावताना आपल्याला दिसुन येतो.व्यसनाधीनते मुळे माणुस स्वतावरील नियंत्रण त्याच्या नकळत गमवण्यास सुरूवात करतो जे त्याच्या स्वताच्या देखील लक्षात येत नाही.यामुळे स्वभाव अस्थिर बनण्यास सुरूवात होते.निर्णय क्षमता नष्ट होते व माणूस एकटे पणाचा शिकार होतो तो समाजात व समाज त्याच्यापासून लांब जाण्याची क्रिया सुरु होण्यास सुरुवात होते .हे सर्व समजत असून देखील व्यक्ती स्वता मध्ये सुधारणा न करता समजला व समज व्यवस्थेला दोष देतो .व चिंतेच्या डोहात अखंड बुडून जातो .त्यामुळे त्याची समाजातील पत प्रतिष्ठा सर्व काही धुळीस मिळत.याचा परिणाम म्हणजे माणूस यातून आत्महत्या करण्यास देखील भाग पडतो.


मानसिक अशांती अथवा चिंता या वर उपाय :-
१)ध्यान धरणा :
आपल्या संस्कृतीत अथवा आपल्या सर्व आध्यत्मिक ग्रंथामध्ये मनाचे वर्णन आढळून येते .यात मनाला वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा देऊन त्याचे वर्णन केलेले आहे.मन हे चंचल पक्ष्या प्रमाणे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर सतत विहार करत असते .आपल्या मनात एकाच वेळी शेकडो विचारांची लढाई सतत सुरु असते. यात कधी कोण जिंकेल अथवा कधी कोण हरेल हे सांगणे कठीण असते .या साठी या मन रुपी पक्ष्यास एकाच फांदीवर घरटे बांधून स्थिर करणे गरजेच असते तरच ते आपले बस्तान योग्य रितिने बसवू शकते व यासाठी ध्यान धरणा  व योगा हे उत्तम मार्ग आहेत .आपण जर रोज नियमित योग व ध्यानाचा मार्ग पत्करला तर आपले चौखोर उधळणारे मन एका जागी स्थीर येऊन बसते .आपली निर्णय शमता वाढून आपण योग्य निर्णय घेण्यास सुरुवात करतो .आपण सहज-सहजी विचलित होत नाही .आपला आत्मविश्वास वाढतो त्यामुळे आपली चिंता करण्याची सवय कमी कमी होऊन ती बंद होते .व  आपण एक प्रकारे चिंता मुक्त जीवन जगण्यास सुरुवात करतो.यामध्ये परमेश्वरी सामर्थ्याची देखील जोड मिळते .त्यामुळे आपला आत्मविश्वास दुनावण्यास मदत होते .
२)अपेक्षांनचे ओझे :
माणूस जन्माला आल्या पासून अपेक्षानचे ओझे सोबत घेऊन येते असतो .तुकाराम महाराजांनी म्हटले च आहे कि "जीवन दुख मूळ"म्हणजेच जन्म हाच मुळात दुखाचा पाया आहे व अपेक्षा हा त्याचा कळस आहे.आपण कधी कधी जीवनाकडून ,म्हणजे स्वता कडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा ठेवतो त्याच बरोबर आपण आपल्या सोबत असणाऱ्या इतरान कडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा बाळगतो .जगात काही प्रेत्यक व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण होत नसतात तशा त्या आपल्या देखील पूर्ण होत नाही .त्यामुळे या अपूर्ण रहिलेल्या इच्छा आकांक्षा याच्या अदृश्य ओझ्याखाली खाली आज नकळत प्रत्येक व्यक्ती भरडली जात आहे .यावर रामबाण उपाय म्हणजे प्रथम या अपेक्षांच्या ओझ्याखालुन बाहेर पडून मुक्त जीवन जगण्यास सुरुवात करून बघा .अपेक्षा नसतील तर अपेक्षाभंग होणार नाही व दुख देखील होणार नाही .व अपेक्षा भंग झाला म्हणून आपण विनाकारण चिंताग्रस्त देखील होणार नाही .
३)संगत गुण :
आपण आपला बराचसा वेळ हा आपल्या मित्र परिवारासोबत अथवा कार्यालयीन कर्मचार्यान सोबत घालवत असतो .या मध्ये आपण कुणाच्या संगतीत राहतो याचा देखील मोठा परिणाम आपल्या एकदर व्यक्तिमत्वावर होत असतो .त्यामुळे नकारात्मक विचार सरणी असणार्या किवा आपल्याला सतत माघे ओढणाऱ्या लोकान पासून नेहमी लाब राहण्याचा प्रयत्न करावा.
४)संवाद साधणे:
आपल्याला जर एखादी अडचण निर्माण झाली तर त्याबाबत आपल्या जवळील लोकान सोबत त्याबाबत चर्चा करणे कधी ही हितकारक असते .कारण चर्चेने कुठलीही समस्या सहज सुटू शकते.आपण जर इतरान सोबत न बोलता केवळ गप्प बसून राहिलो तर याचे रुपांतर ज्या प्रमाणे काटा कुरूप करतो त्या प्रमाणे चिंता रुपी भुंगा आपल्याला आतून पोखरत जातो .कारण प्रत्येक समस्येवर समाधान हे असतेच .
याच बरोबर या समस्येवर होमिओपथिक उपचार पद्धती देखील उपयुक्त आहे रोग्याचे एकंदरीत लक्षण व त्याची देहबोली याचे निरीक्षण करून या औषधीचा वापर केला जातो .यामध्ये प्रमुख्याने अर्सेनिक अल्बम (ARESENIC ALBUMB),एपिस मेलीफिका (APIS MELIFICA),बेलाडोना (BELDONA),इग्निशिया  अमरा (IGNITIYA AMRA),फोसफेरस(PHOSPHERS) या सारख्या औषधांचा प्रामुख्याने समावेश होतो 
होमिओपथिक औषधांचा जरी काही दुष्परिणाम होत नसला तरी या औषधांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही  चांगले.
आपणास हा लेख कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.
आवडल्यास इतरान सोबत शेअर करा.



 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)