केस गळतीमुळे त्रस्त असाल तर करा हे उपाय

Homoeopathyandmagic in marathi language
0
केस गळतीमुळे त्रस्त असाल तर करा हे  उपाय

केस गळती

आज कालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत माणुस केवळ वेगात पळत आहे.तो केवळ भौतिक सुख सुविधा निर्माण करण्यातच सर्वव्यापी गुंतन पडला आहे.मग तो पुरुष असो अथवा  स्त्री प्रत्येकाला  केवळ करियर करायचे आहे.याचा परिणाम आपल्या सामाजिक व शारीरिक घटकावर किती होईल याचा विचार करायला आज कोणीही तयार नाही.या जीवन शैलीचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत आहे . आपल्या खाण्यापिण्याच्या बदलेल्या  सवयी झोपण्याची बदलेल वेळापत्रक याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागला आहे.हा परिणाम म्हणजे  आपले अकाली गळणारे केस.आज जगभरातील जवळजवळ ३०% लोक हे केस गळतीमुळे त्रस्त आहेत.यातील बहुतेकांंचा प्रवास हा केस गळती कडुन संपूर्ण केस  गळती कडे झालेला बघायला मिळत आहे.आपण यामागील कारणे जाणून घेण्याचा कधी  प्रयत्न केला आहे का.नाही ना तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून याची
कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
केस गळती होण्याची कारणे:-
१) पुरेशा झोपेचा अभाव
मानवी शरीर हे काही मशिन नाही.याची रचना ही गुंतागुंतीची व किचकट अशा स्वरुपाची आहे.ही रचना समजून घेणे आजच्या आधुनिक विज्ञानाला देखील पुर्ण पुणे शक्य झालेले नाही.अशा या मानवी शरीरास काही कालावधीनंतर विश्रांतीची आवश्यकता असते.मानवी शरीरास किमान ८ ते १० तासा पर्यंत विश्रांती गरजेचे आहे.नाहीपेक्षा  किमान ६  तास तरी झोप आवश्यक आहे.आज कालच्या धकाधकीच्या आयुष्यात ती मिळणे देखील दुरापास्त झाले आहे.याचा परिणाम आपल्या शरीरावर नक्कीच होतो.व केस गळती च्या  रूपाने तो आपले अस्तीत्व दाखवून देत असतो.
२) आहारात पोषक घटकांची कमतरता:-
आजच्या आधुनिक युगात आपण केवळ फास्ट फूड खाऊनच पोट भरण्यात  धन्यता मानत आहोत.बदलेल्या जीवन शैलीचा आपल्या आहारावर देखील परिणाम झाला आहे.केवळ वेळ नाही या सबबीखाली आपण बाहेर मिळणाऱ्या अन्न पदार्थांवर अवलंबून राहायला लागलो आहोत.यामुळे मानवी शरीरास आवश्यक असणारी पोषक घटकांची कमतरता शरीरास जाणवू  लागली आहे  आपल्या शरीरास हिरव्या पाल्याभाज्या ,डाळी,कडधान्ये यातून आवश्यक असणारी पोषक तत्व मोठ्या प्रमाणात मिळतात ती आपल्या घरातून दिवसेंदिवस गायब होताना दिसत आहेत .त्याच बरोबर जास्त उत्पन्न घ्याण्याच्या हव्यासापोटी जो रासयनिक कीड नाशकाचा .खतांचा भरमसाठ वापर केला जात आहे तो देखील  आपल्या शरीराला कमजोर करत आहे.
आधुनिकतेच्या नावाखाली आपण जी केमिकल युक्त शाम्पू,साबण यांचा वापर करत आहोत त्यामुळे सुद्धा आपल्या केस गळतीस मोठ्या प्रमाणत हातभारच लागत आहे .
आज आपल्या अवती भोवती केस गळती कमी करण्याची ,नवीन केस उगवण्याची हमी देणारी अनेक औषध उपलब्ध आहेत परंतु एक तर ती खूप महाग आहेत किना त्याचे दुष्परिणाम तरी आहेत 
आज आपण होमिओपथिक पद्धतीने केस गळती कशी कमी करून उपचार करता येतील याचा आढावा घेण्यचा प्रयत्न करणार आहोत.
३) केस गळती थांबविण्याचे उपाय :-
होमिओपथिक उपचार पद्धतीत रोग्या पेक्षा लक्षण समोर ठेऊन उपचार केले जातात .त्यामुळे आपण लक्षणा प्रमाणे औषध बघण्याचा प्रयत्न करूयात .
१)थुजाऑक्सिडेटलीस  THJA OCCIDENTALIS):-
ह्या औषधाचा उपयोग ज्या व्यक्तींच्य डोक्यात ओला व कोरडा कोंडा होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते व त्याच्या परिणामी केस गळती होते,तसेच ज्याची केसाची वाढ अत्यंत धीम्या गतीने होते ,त्याच बरोबर डोक्यात मोठ्या प्रमाणत खाज येते व खाजवील्यानंतर बरे वाटते आशा लोकांन साठी हे औषध अत्यंत उपकारक आहे .
२)फोसपरस(PHOSPERS ):-
जर एखाद्या विकारात रक्तस्राव झाल्यानंतर केस गाळती होतअसेल तर ,केस गुचछांन मध्ये गळत असतील ,कोंडा मोठ्या प्रमाणात झाला असेल तर ,तसेच केस केस गळती मुळे व कोंड्या च्या प्राधूरभावामुळे केस अकाली पांढरे झाले अस्रतील तर उन्हाळ्यात उष्णतेमुळे डोक्यात खाजेच प्रमाण वाढत असेल तर या औषधाच्या वापरामुळे नक्कीच आराम पडू शकतो 
३)सेपिया (SEPIA)
स्त्रियान मध्ये बाळंत पण नंतर मोठ्या प्रमाणात केस गळतीची समस्या निर्माण झाल्यास ,डोक्यात फोडी होण्याचा विकार निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात खाज सुटते ही खाज मुख्यता डोके व कानाच्या माघील बाजूस प्रामुख्याने दिसून येते .फंगल इन्फेक्शन मुळे केस गळती होणे या सारख्या विकारांवर हे औषध गुणकारी आहे .
४)फोस्फोरीकम एसिडम:-
या औषधाचा वापर आश्या लोकान साठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त आहे जे लोक खूप दिवसापासून दीर्घ आजारी आहेत व कमजोर व थकलेले आहेत .
ताप व टायफाईड सारखा आजार होऊन गेल्यानंतर केस गळती होत असेल तर ,मानसिक व शारीरिक कमजोरी मुळे केस गळती होत असेल तर ,तरूण मुलांन मध्ये अकाली केस गळती होणे ,केस सफेद होणे  या विकारावर ,शरीरात पाणी अथवा रक्ताची कमतरता निर्माण होऊन केस गळती होत असेल तर हे औषध खऱ्या अर्थानी गुणकारी ठरते .
५)सल्फर  (SULPHAR):-
या औषधाचा सामन्यात अकाली वृद्ध दिसणारी व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीचे केस अकाली वेळे आधी पांढरे होतात त्याच्या साठी हे औषध रामबाण आहे .
तसेच कोंड्या मुळे केस होणारी केस गळती कोरड्या केसाची समस्या असणारी मुले यांच्या साठी हे औषध गुणकारी आहे .
६)अर्सेनिक अल्बम (ARSENIC ALBUM ):-
या औषधाचा वापर जे लोक शारीरिक दृष्ट्या कमजोर व अशक्त आहेतअशा लोकान साठी खऱ्या अर्थानी उपकारक आहे.यामुळे केसान व्यतिरिक्त इतर समस्या देखील दूर होण्यास मदत होते .


होमिओपथिक औषध बनवताना औषधा ची मात्रा ही कमी प्रमाणात वापरली जाते हे खरे असले व त्याचे दुष्परिणाम होत नसले तरीही ही औषध घेण्यापूर्वी डॉक्टर चा सल्ला घेणे कधीही चांगले .







टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)