मुत खडा झालाय तर करा हे उपाय(kidney stone solution)

Homoeopathyandmagic in marathi language
0

 मुत खडा झालाय तर करा हे उपाय(kidney stone solution)

 



आज आपण बहुतेक लोकांन कडुन वारंवार ऐकत असतो की, मला किडनी स्टोन चा त्रास होत आहे.मला युरीनची समस्या आहे.किंवा माझ्या कमरेत दुखते आहे ही किंवा याप्रमाणे असणार्या इतर समस्या या बहुतेक वेळा किडनी स्टोनच्या समस्यांशी संबंधित असतात.त्याचे वेळीच निदान होणे हे देखील गरजेचे आहे.कधी कधी सामन्यतः केवळ वेदना शामक खाऊन या वेदनेचे शमन केले जाते.ज्यामुळे समस्या या कमी होण्यापेक्षा वाढतच जातत.व याचा कधी तरी विस्फोट होऊन हाॅस्पीटलची वारी करावी लागते.
किडनी स्टोन कसा होतो:-
किडनी स्टोन हा मानवी शरीरातील चयापचयातील बिघाडामुळे लघवीचे प्रमाण कमी होऊन शरीरात कॅल्शियम,युरिक असिड यांचे प्रमाण वाढुन त्याचा परिणाम खडे निर्माण होण्यात होतो.आहारात खारट पदार्थ,औषधी गोळ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असणे.तसेच अनुवंशिकतेचा प्रभाव देखील यासाठी काही प्रमाणात कारणीभूत असु शकतो.
किडनी स्टोन होण्याची कारणे:-
पाणी कमी पिणे हे किडनी स्टोन होण्याचे एक प्रमुख कारण आहे असे म्हटले तर ते वावगं ठरणार नाही.पिण्यास बोअरवेल्स चे पाणी वापरणे.आहारात सोडीयम व कॅल्शियम युक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात समाविष्ट असणे.लघवीला वेळेवर न जाणे.लठ्ठपणा हा देखील किडनी स्टोन होण्यासाठी एक कारणीभूत घटक आहे.त्याचबरोबर अनुवंशिकता हा देखील एक घटक या मध्ये महत्वाची भूमिका बजावतो .आई किवा वडील यांच्या पैकी जर कोणाला मुतखड्याची समस्या असेल तर मुत खडा होण्याची शक्यता वाढते.

किडनी स्टोन वर गुणकारी उपाय :- 
किडनी स्टोन वर तसे तर बरेच उपचार केले जातात प्रत्येकाचा कमी अधिक फरकाने फायदा होतो,परंतु किडनी स्टोन होण्याची प्रक्रिया ही निरंतर चालणारी क्रिया असल्यामुळे ती वारंवार उदभवते त्यामुळे याला कायम स्वरूपी अटकाव करण्यासाठी होमिओपथिक उपचार पद्धती ही नक्कीच फायदेशीर ठरू शकते .होमिओपथित लक्षण आधारित उपचार पद्धतीचा अवलंब करून उपचार केले जातात .
अर्जेनट्रम नाईट्रीकम (ARGENTUM NITRICUM):-
या औषधाचा वापर मुख्यता किडनीच्या वेदनेत केला जातो .ज्या वेळी किडनीच्या आजूबाजूला वेदना होऊन सूज येते त्या वेळी या औषधाचा वापर केला जातो.या सोबत लघवीच्या प्रमाणात कमतरता येणे ,लघवी नकळत होणे ,लघवीतून रक्त जाणे,किडनीच्या क्षेत्रात स्पर्श केल्याने वेदनेत वाढ होणे विशेषता रात्रीच्या वेळी या लक्षणात हेऔषध गुणकारी ठरते 
बेलाडोना(BELLADONA):-
तीव्र व असहनीय वेदना होणे,लघवी बंद होणे,प्रोटेस्ट ग्रंथी वाढणे,लिबू पाणी पिण्याची इच्छा होणे,या लक्षणात रोगी खूप जास्त प्रमाणात पाणी पितो.चेहरा लाल होणे.हे औषध सर्वसाधारण कमी कालावधी करिता होणाऱ्या विकरा करिता दिले जाते.
बेंजोइक असिड (BENZOIC ACID):-
या औषधीचा वापर हा मुख्यता जेव्हा मूत्राचा वास येतो व मूत्राचा रंग हा तपकिरी असतो त्या वेळी प्रामुख्यानी केला जातो.याच बरोबर रक्ततपासणीत युरिक एसिड च  प्रमाण आढळून येणे.झुकल्यावर अथवा श्वास घेतल्यानंतर किडनीत वेदना होणे .मूत्र मार्गात मूत्र विसर्जन न केल्यास वेदना होणे या सारख्या लक्षणात या औषधाचा वापर केला जातो.
बेर्बेरीस वल्गरीस(BERBERIS VULGARIS):-
उजव्या बाजूच्या किडनीत जर मुतखडा झाला तर हे औषध प्रभावी ठरते.याच सोबत किडनीच्या आजूबाजूच्या क्षेत्रात तीव्र वेदना होणे,मुत्र विसर्जन केल्यानंतर जळ जळ होणे या सारखी लक्षण असतील तर हे औषध प्रभावी ठरते.
कॅन्थारीस(CANTHARIS):-
लघवीची तीव्र इच्छा होणे .लघवी करण्यापूर्वी जळजळ होणे.मुत्र विसर्जन केल्यानंतर संपूर्ण मुत्रामार्गात जळजळ होणे त्याच प्रमाणे थेब थेब लघवी येणे व त्यातून रक्त स्त्राव होणे.या सारखी लक्षण जर निर्माण होत असतील तर या औषधाचा वापर केला जातो.
वर नमूद केलेली लक्षण व औषध यांचा परस्पर ताळमेळ घेऊन जर औषधाची निवड केली तर निश्चितच आपण या व्याधी पासून मुक्त होऊ शकतो यात शंका नाही 
होमिओपथिक औषधाचा जरी काही दुष्परिणाम नसला तरी औषध घेण्या  अगोदर डॉक्टर चा सल्ला घेणे कधीही  हितकारक.  














टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)