केसांवर भांडी विकणारी लोक केसांच करतात तरी काय

Homoeopathyandmagic in marathi language
0
केसावर भांडी 

आपण खेडोपाडी गल्लीबोळातून कधीना कधी केसावर फुगे घ्या असा अवाज ऐकला असेल .आता फुगे ही कल्पना अथवा शब्द म्हणू या तो आता कालबाह्य झाला आहे .आता फुग्याची जागा केसावर भांडी अशी झाली आहे .आता केस देणारे व केस घेणारे आसे दोघेही बदलले आहेत.आपल्या घरात किवा आजूबाजूला बरेच लोक असे आहेत जे केस विन्चरल्या नंतर ते फेकून देतात परंतु हे केस जमा करणारा वर्ग देखील मोठा आहे.दर आठ दहा दिवसांनी फेरी मारणारा फेरीवाला अथवा फेरीवाली आपल्याकडे केस जमा करून घेऊन जाते व त्या बदल्यात आपल्यला एखांदे भांडे देऊन जाते .परंतु आपण कधी विचार केला आहे का या जमा केलेल्या केसाचे पुढेकाय करत असतील  व त्याचा उपयोग कशा करता होत असेल .चला तर आपण आज हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करू यात .
आर्थिक उलाढाल :-
केस जमा करणे हा आर्थिक मिळकतीचा व रोजगार निर्मीतीचा एक मार्ग बनला आहे.गावो गावी फिरून केस विकत घेणारे लोक साधरण १५० रु छटाक या भावानी केस खरेदी करतात .व त्या पेक्षा दस पट चढया भावानी त्याची विक्री करतात .यातून एक प्रकारे रोजगार निर्मिती होते .केसाचा मोठ्या प्रमाणत व्यवसाय दक्षिण भारतात चालतो .भगवान बालाजीच्या चरणी केस अर्पण करण्याची हिंदू धर्मियाची प्राचीन परंपरा आहे .या परंपरेनुसार भगवान बालाजी चरणी केस अर्पण केले जातात .हे जमा झालेले केस योग्य प्रकारे साफ सुफ करून त्यांचे वर्गीकरण केले ते एका विशिष्ट केमिकल मध्ये टाकून स्वच्छ केले जातात .नंतर त्याचे वर्गीकरण करून लांबी नुसार ते वेगळे केले जातात .साधारण पणे बालाजी मंदिरातील भाविकानी अर्पण केलेल्या केसांचा निलाव हा ३०००० हजार रु किलो या प्रमाणात केला जातो .यातून कोट्यावधी रुपयाची उलाढाल दरवर्षी होत असते .या केसांवर प्रक्रिया करणारे उद्योग दक्षिण भारतात एकवटलेले आहेत .
        आपल्या भारतीय केसांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे कारण भारतीय केस हे लाब काळे ,सरळ मुलायमअसतात .गेल्या काही वर्षात या व्यापाराने चांगले मूळ धरल्याचे बघयला मिळते .भारतीय केसांना अमेरिका ,ब्रिटन रशिया या देशान मध्ये चांगली मागणी आहे.यातून गेल्या वर्षी जवळ जवळ ५० लक्ष डालरचा व्यवसाय झाला आहे.
केसाचा उपयोग :-
केसांचा उपयोग
केसांचा उपयोग 

या जमा केलेल्या केसांचा उपयोग टक्कल  पडलेल्या लोकान साठी केसाचे टोप,केसाचे प्याच ,गंगावन ,जाकेट,कृत्रिम दाढी ,मिशा ,ब्रश बनविण्यासाठी केला जातो .ही साधने म्हणजे नाट्यभूमी वर भूमिका करणाऱ्या कलाकार मंडळीन साठी मोठी मदत करण्याचे काम करतात त्यांच्या भूमीकेत चैतन्य निर्माण करण्यास एक प्रकारे हातभार लावण्याचे काम करतात 







टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)