डोके दुखीने त्रस्त आहात तर करा हे उपाय

Homoeopathyandmagic in marathi language
0

 डोके दुखीने त्रस्त आहात तर करा हे उपाय 

HEADACHE

 आपण कधीना कधी डोकेदुखीने त्रस्त  झालो असणार किंवा आपल्या आजूबाजूला आपण आज माझे डोके दुखते आहे अशी तक्रार करणारी माणसे पाहिली असतील .परंतु आपण कधी हा विचार केला आहे का कि ही डोकेदुखीची समस्या नेमकी कशा मुळे निर्माण होते .आपण केवळ डोकेदुखी झाली कि केवळ वरवरची मलमपट्टी करण्यातच धन्यता मानतो.मेडिकल स्टोर मध्ये जाऊन एक गोळी आणतो ती खातो परंतु हे चक्र कधी कधी दर आठ दहा दिवसांनी सुरु राहते व आपल्याला देखील गोळी खाण्याची एक प्रकारे सवय लागून जाते .आपण जो पर्यंत परिस्थिती हाताबाहेर जात नाही तो पर्यंत यात बदल करत नाही .कधी कधी सामन्य डोकेदुखी ही देखील गंभीर आजाराची पाया ठरू शकते .
डोके दुखीची करणे:-
डोके दुखी ही दोन सामन्यान्ता ही दोन प्रकारची असते एक म्हणजे प्राथमिक डोके दुखी व दुसरी म्हणजे माध्यमिक डोके दुखी .आज आपण ह्या दोनही डोकेदुखी ची कारणमीमांसा अथवा या  माघील एकंदरीत कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू यात.
प्राथमिक डोकेदुखी :-
या प्रकारची  डोकेदुखी ही  सामन्य या सदरात मोडणारी असते .या माघे काही मोठे कारण नसते .या माघील कारणात झोप अपुरी होणे ,दारूचे मोठ्या प्रमाणत सेवन करणे ,फास्ट फूड या प्रकारात मोडणारे अन्न ,तेलकट ,तुपकट पदार्थ यांचे प्रमाण आहारात मोठ्या प्रमाणत असणे.तसेच झोपेच्या वेळा या अनियमित असणे ,झोपेची मुद्रा नीट नसणे या सारख्या सवयी व करणे कारणीभूत असतात .या मुळे अर्धशिशी ,सायनस,तणावा मुळे होणारी डोकेदुखी यासारख्या सामन्य डोकेदुखीचा समावेश होतो.या मुळे आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही ही डोकेदुखी जशी येते तशीच निघून देखील जाते .
माध्यमिक डोकेदुखी:-
एखाद्या अंतरगत बाबीमुळे उद्भवणाऱ्या डोकेदुखीचा समावेश माध्यमिक डोकेदुखी या बाबीत होतो .या मध्ये शरीराच्या अंतर्गत भागात होनाऱ्या घडामोडीचा प्रभाव पडून या समस्या उध्दभवतात या मध्ये प्रामुख्याने अंतर्गत रक्तस्राव,ब्रेन ट्युमर ,हाय ब्लूड प्रेशर ,रक्त वाहिन्या फुटणे ,ब्रेन ह्य्म्रेज या सारख्या बाबीचा समावेश होतो .यामध्ये बहुतेक वेळा अप्पत्कालीन स्थिती निर्माण होऊन तात्काळ उपचार करणे भाग पडते .
या सर्व समस्या वर होमिओपथिक उपचार पद्धतीचा अवलंब करून चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येऊ शकते.
याचा सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न आपण करू यात .
ज्या लोकांला वारंवार पेन किलर खाऊन देखील डोकेदुखी आटोक्यात ठेवणे कठीण जाते त्यांच्या साठी होमिओपथि ह उत्तम पर्याय आहे.
चला तर मग लक्षण व त्या नुसार करण्यात येणारी औषध योजना बघू यात 
१) अर्सेनिक अल्बम (ARSENIC ALBUM);-
१)ठराविक अंतराने तहान लागणे .
२)स्वताच्या प्रकृतीविषयी चिंता करणे
३)डोळ्यातून पाणी येणे ,डोळ्याची जळ जळ होणे 
४)थोड्या फार शारीरिक कष्टाने थकावट येणे व कमजोर झाल्यासारखे वाटणे .
५)रात्रीच्या वेळी थंड हवेत डोकेदुखीचे प्रमाण वाढणे 
२)एकोनाईट (ACONITE):-
१)डोके जड होऊन डोके फुटेल की काय असे वाटणे .दुखणाऱ्या बाजूवर झोपल्या नंतर जास्त दुखणे 
२)डोक हलविल्याणे चक्कर येणे 
३)सकाळी व संध्याकाळी लक्षणात वाढ होणे परंतु खुल्या हवेत आराम वाटणे 
४)अत्यन्त काळजी वाटून डोके दुखणे ,मरणाची भीती वाटल्यामुळे होणारी डोकेदुखी 
५)आत्महत्येचे विचार सारखे डोक्यात येणे व त्यामुळे होणारी डोकेदुखी 
३)बेलाडोना (BELADONA):-
१)अत्यंत तीव्र व असहनीय अशी डोके दुखी जी सहन होत नाही .
२)माथ्यावर व डोक्याच्या माघील भागात वेदना होणे विशेषता डोक्याच्या डाव्या बाजूला अधिक प्रमाणात वेदना होणे 
३)केस कापल्यावर.सर्दी ,पडसे  झाल्यावर होणारी  डोकेदुखी ,त्याचबरोबर विमान प्रवास केल्यानतर होणारी डोकेदुखी या मध्ये अत्यंत उपयुक्त 
४)दुपारी झोपल्यानतर वेदना वाढणे तसेच डोके गच्च आवळल्यनंतर  वेदना कमी होणे .
४)ब्रायोनिया अल्बा (BRYONIA ALBA ):-
१) डोक्यात सर्व बाजूनी वेदना होणे 
२)वरून चेहर्या पर्यंत येणाऱ्या वेदना .त्यामुळे लाल होणारा चेहरा.
३)त्वचा .चेहरा ,तोंड ,गळा कोरडा पडणे व तीव्र स्वरुपात तहान लागणे 
४)थोडी फार हालचाल केल्याने वेदना वाढणे ,वेदना एकाच डाव्या अथवा उजव्या बाजूला होणे .
५)कॅल्कॅरीया कॅर्बोनिकम (CALCARIYA CARBONICUM):-
१)डोके दुखी सोबतच हातपाय गार पडणे 
२)डोक्यात गारवा जाणवणे विशेषता डाव्या बाजूस 
३)डोळे जड झाल्याप्रमाणे वाटणे व डोक्याच्या पट्टी बांधल्या प्रमाणे वाटणे .
४डोकेदुखून चक्कर येणे .विशेषता कोरड्या ऋतुत 
६)नक्स ओमिकां (NUX VOMICA):-
१)डोक्याच्या मागच्या बाजूस व डोळ्याच्या वरती डोकेदुखीसह चक्कर येणे .
२)डोक्याच्या वरच्या बाजूस कोणीतरी डोक्यात खिळा ठोकल्या प्रमाणे वेदना होणे 
३)अति प्रमाणत चहा ,कॉफी ,नशिले पदार्थ याचे सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम 
 
ही होमिओपथिक औषध डोके दुखीच्या आजारावर लक्षणा नुसार गुणकारी ठरतात व समस्येच मुळा पासून निराकरण करण्यास मदत करतात .
 
होमिओपथिक औषधांचा वापर केल्याने जरी कुठलेही दुष्परिणाम होत नसले तरी औषध घेताना डॉक्टर चा सल्ला घेणे कधीही हितकारक 



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)