डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन परिचय (DR Babasaheb amdedkar jivan parichya)jayanti 14 april 2023

Homoeopathyandmagic in marathi language
0

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन परिचय (DR Babasaheb amdedkar jivan parichya)jayanti 14 april 2023

भारत वर्षात व भारत खंडात जी काही महान व्यक्तीमत्व होऊन गेली त्या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व्यक्ती मत्व होऊन गेले.त्यांची जयंती १४ एप्रिल रोजी संपूर्ण भारतात व जगभरात साजरी केली जाते .आज आपण बाबासाहेबांचा शून्यातून पुर्णत्वा कडे झालेला प्रवास जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करू यात. 

जीवन परिचय :-
                 बाबासाहेबाचा जन्म झाला तो काळ हा  इंग्रज अंमलाच व जातीयवादी विद्वेषाचा होता .वर्ण व्यवस्थेचा पगडा समाजमनावर पूर्ण पणे स्वार होता .अशा काळात "हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही" अशी भीष्म प्रतिज्ञा जाहीर पणे करणाऱ्या बाबासाहेबाचा जन्म आजच्या मध्यप्रदेशातील महू  या ठिकाणी १४ एप्रिल १८९१ रोजी दलित कुटुंबात झाला .त्यांचे वडील रामजी सकपाळ हे सैन्यत सुभेदार पदावर कार्यरत होते.घरची परिस्थिती तशी बेताची म्हणावी अशीच होती .हाता तोंडाशी गाठ पडणे तसे मुश्कील म्हणावे अशी अवस्था .अशा अवस्थेत देखील रामजी बुवांनी भीमरावा ला शाळा शिकविण्याचा निर्णय घेतला व तो जिद्दीने पूर्ण करून दाखवला .त्या काळात दलिताने शाळा शिकणे म्हणजे मोठे अग्नी दिव्य केल्या सारखेच होते .त्या अग्निदिव्यातून भीमराव खर्या अर्थाने तावून सलाखून निघाले व बाबासाहेब बनले.बाबासाहेबांना आंबेडकर हे आडनाव त्यांच्या आंबेडकर या गुरप्राप्त झाले.त्यांच्या गुरुजींनी त्यांच्यातील सुप्त गुण खऱ्या अर्थाने ओळखले व त्यांच्यातील व्यक्तिमत्वाला घासूनपुसून लखलखीत करण्याचे काम केले
शौक्षणिक प्रवास:- .
                   शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण घेण्याकरता ते वडिलान सोबत मुंबईला आले .पदवी पर्यंतचे सर्व शिक्षण त्यांनी मुंबईतूनच पूर्ण केले .दरम्यानच्या काळात १९०६ मध्ये त्यांचा विवाह भिकू वालांगकर यांची कन्या रमबाई शी झाला.बाबासाहेबानी कठोर परिश्रम करून एल्फिन्स्टन कॉलेज मधून बी.ए ची पदवी प्राप्त केली .या कमी त्यांना बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली.त्या नंतर बडोदा संस्थानात त्यांनी काही काळ नोकरी केली .परंतु ज्ञान प्राप्तीची लालसा त्यांच्यातील तपस्व्याला स्वस्थ बसून देईना त्यामुळे त्यांनी बडोदा नरेशांकडून पुन्हा शिष्यवृत्ती प्राप्त करून कोलंबिया विद्यापीठात एम.ए च्या अभ्यासक्रमा साठी प्रवेश घेतला .१९१५ साली एम.ए पूर्ण केल्यानंतर कोलंबिया विद्यापीठातूनच त्यांनी पी एच  डी मिळवली .त्या नंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला परंतु शिष्यवृत्तीची मुदत संपल्यामुळे त्यांना माघारी यावे लागले .यानंतर काही काळ त्यांनी बडोदा संस्थानात नोकरी केली परंतु जाती व्यवस्थेतील भेदभावामुळे त्यांना नोकरी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला .त्यामुळे काही कालावधी नंतर ते मुंबईत परतले .मुंबईत आल्यानंतर त्यांनी वकिली करून व इतर काही कामे करून आपले राहिलेले शिक्षण पूर्ण केले .
सामाजिक योगदान :-
            जग फिरून आल्यामुळे बाबासाहेबाच्या मनात येथील समाज व्यवस्थेबद्दल एक प्रकारे चीड निर्माण झाली होती यातून आपले बांधव बाहेर पडावे या करिता तत्यांनी समाज कार्यास स्वताला वाहून घेण्याचा निर्णय घेतला.व ते सक्रीय समाज करणात सक्रीय झाले.यातूनच १९१९ साली त्यांनी साउथ बूयरो कमिशन समोर आपली बाजू परखड पणे मांडली व दलितान साठी स्वतंत्र मतदार संघ असावे अशी प्रमुख मागणी केली.त्याच्या या मागणी मुळे देशात खळबळ उडाली .या विरोधात महात्मा गांधी यांनी येरवडा कारागृहात उपोषण सुरु केले .शेवटी त्यांच्या मागणीला काही प्रमाणात यश येऊन ती मान्य झाली .दरम्यानच्या काळात त्यांनी जन जागृती व्हवी लोक समजदार व्हावे या साठी मूकनायक व बहिषकृत भारत ही दोन मासिक व साप्ताहिक सुरु केली .यातून त्यांनी सामन्य ,वंचित ,दलित  य घटकावर होणऱ्या अनन्यावर परखड पणे मत मांडून अनन्याला वाचा फोडन्याचे महत्व पूर्ण काम केले . याच कालावधीत त्यांनी त्यांचे अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण केले .
धार्मिक योगदान :-
आपल्या मासिक व सप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेक ज्वलंत विषय हातळले व ते यशस्वी पणे तडीस देखील नेले. जातपात तोंडक मंडळाच्या 1937 च्या अधिवेशनात त्यांनी सादर केलेल्या सूचना रूपी मसुदा हा जातीव्यवस्था नष्ट करण्यास हातभार लावण्यास कारणीभूत ठरला. याच बरोबर चवदार तळ्याचा सत्याग्रह ,मनुससमूर्ती दहन,महाड सत्याग्रह ,काळाराम मंदिर प्रवेश यासारखी अंदोलने  त्यांनी केली 
या काळात १९३५ मध्ये त्यांनी धर्मांतरची घोषणा यवले या ठिकाणी केली व भारतभर फिरून त्यांनी बौद्ध धर्माचे तत्व लोकांला पटवून दिले.
राजकीय करकिर्द :-
कॉँग्रेसी विचार धारा ही त्यांना पहिल्या पासून तितकीशी रुचलेली नव्हती . त्यामुळे त्यांनी पहिल्या पासून स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न  सुरुवाती पासूनच केला होता पण तो त्यांच्या हयातीत काही पूर्ण होऊ शकला नाही रिपूब्लिकण पक्ष स्थापन करण्याचा विचार होता . ब्रिटिश मंत्रिमंडळात नेहरूंच्या आधिपत्या खाली काम करणाऱ्या मंडळात त्यांनी कायदा मंत्री म्हणून काम पहिले व ते योग्य रीतीने पूर्ण केले त्यांच्या अथक परिश्रमाने घटना समितीचा मसुदा पूर्ण झाला . ते घटना समितीचे प्रमुख होते . स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदामंत्री होते .१९५२ मध्ये त्यांनी संसदेत हिंदू कोड बिल मांडले परंतु त्याला विरोधझाल्याने त्यांनी कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला व कॉंग्रेस पासून लांब गेले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला 

महापरिनिर्वाण :-
बाबासाहेब त्यांच्या शेवटच्या करकीदित भारतभर फिरले अनेक धर्मांतर परिषदा आयोजित केल्या . ६ डिसेंबर १९५६ रोजी वयाच्या ६६ वर्षी दिल्लीतील राहात्या घरी त्यांचे महापरिनिर्वाण झाले व हा महामानव सर्वाना पोरक करून आपल्यातून आपण केलेल्या अफाट कार्याचा पसारा  व क्रांतीची धगधगती ज्योत मागे  ठेवून निघून गेला.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)