उन्हाळा उष्माघात कारणे बचाव व उपाययोजना

Homoeopathyandmagic in marathi language
0
               उन्हाळा उष्माघात कारणे व उपाययोजना 


 

आपल्या आजूबाजूला  टोप्या ,पंचा ,छत्री ,लिंबू सरबत ,उसाचा रस यांची जोरदार विक्री सुरु झालेली 
 दिसली  की, .यातून आपल्याल्या उन्हाळा सुरु झाल्याची जाणीव व्हायला  सुरुवात होते.गुलाबी थंडीअस्ताला जाताना आपल्या माघे रखरखीत उन्हाळ्याची चाहूल सोडून जाते.ज्याच्या झळा कमी अधिक प्रमाणात सर्व ठिकाणी हवामानानुसार बसायला सुरुवात होते.यात कमी अधिक प्रमाणात सर्व जीव ,प्राणी ,पक्षी,मानव होरपळून निघायला सुरुवात होते .पाऊस जसा अति प्रमाणात झाल्यावर महापूर येतो व त्याला अतिरूष्टी म्हणतात त्याचप्रमाणे थंडी मोठ्या प्रमाणात पडल्यावर कडाक्याची थंडी असे म्हणतात व अति थंडी मुळे हिम दंश होतो.तसेच उन्हाचा कडाका वाढल्यावर उष्माघात होण्याचा धोका वाढतो .आज आपण उष्माघात होण्याची क्रारणे व त्यावरील उपाययोजना जाणून घेण्याचा प्रयत्न करू यात 
उष्माघात :-
साध्या सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे उष्माघात म्हणजे  सुर्याघात .या परिस्थितीत गरम हवामानातदीर्घ काळ राहिल्यामुळे शरीराचे तापमान १०४ फारनाइट अथवा ४० सेल्सिअस पेक्षा जास्त होते.थोडक्यात सांगायचे झाले तर शरीर थंड ठेवणारी यंत्रणा कोलमडून पडते व आपले शरीर ओव्हर हिट होते .
उष्माघात चे  बळी:तसे पहिले तर उष्माघात हा कोणालाही होऊ शकतो परंतु त्यातली त्यात तो लहान मुले,वयस्कर व्यक्ती ,शारीरिक कष्टाचे काम करणाऱ्या व्यक्ती ,अति कसरत करणाऱ्या व्यक्ती यांना होण्याचा धोका जास्त असतो .अशा व्यक्तींना या काळात जास्त जपन हितकारक असते .
उष्माघाताची कारण:-
उष्माघातानचे प्रमुख कारण  म्हणजे प्रमाणा बाहेर वाढलेले शारीरिक तापमान ,भ्रम व कोमा ही होत.त्वचा ही कोरडी व गरम होते .जर उष्माघात तणावामुळे होत असेल त्वचा नरम होते .
लक्षण :-
१)हृदयाची धड धड वाढणे 
२)श्वासाची गती वाढणे 
३)रक्तदाब वाढणे किवा कमी होणे 
४)घाम थांबणे 
५)मळमळ/उलट्या होणे
६)डोकेदुखी .डोके दुखण्यास सुरुवात होणे
७)मानसिक भ्रम होणे 
८)हात पाय ताठरणे 

 

उष्माघात उपचार :-
उष्माघातावर  सुरवातीला प्रथोमपचार केले जातात यामध्ये 
१)व्यक्तीला प्रथम सावलीत आणावे 
२)व्यक्तीला खाली झोपवावे .त्याचे हात पाय सरळ करावे 
३)कपडे सैल करावे किवा काढून टाकावे 
४)व्यक्तीला थंड पाणी पाजावे किवा चहा कॉफी पाजावे शक्यतो अल्कोहोल युक्त पेय देण्याचे टाळावे 
याच बरोबर उष्माघाता वर होमिओपॅथी मध्ये लक्षण आधारित काही उपचार आहेत त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ यात .
)नेटरम मूर (NETRAM MUR):-
उन्हात गेल्यानंतर जेव्हा शरीरातील मिठाचे प्रमाण व पाणी कमी होते चक्कर आल्यासारखे वाटून डोळ्याची जळ ज ळ होते त्या वेळी या औषधाची शिफारस केली जाते कारण हे औषध मिठा पासून तयार केलेले आहे.
२)ग्लोनाइन (GLONINE):-
रक्त दाब वाढतो .उन्हात गेल्यानंतर चक्कर येते.उशीवर डोके ठेवल्यावर प्रचंड प्रमाणात दुखते .शरीराचे तापमान वाढते .ताप येतो.भीती वाटते.
३)बेलाडोना (BELLADONA):-
मोठ्या प्रमाणात तहान लागणे .डोके दुखणे ,घसा कोरडा पडणे ,तीव्र कान दुखी सुरु होणे या सारखी लक्षण जाणवतात .
होमिओपथिक औषधा चे जरी काही दुष्परिणामनसले तरी ही औषध डॉक्टर च्या निरीक्षणा खाली घेणे कधी ही चांगले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)