झोपेत घोरण्यामुळे त्रस्त असाल तर करा हे उपाय

Homoeopathyandmagic in marathi language
1

                                             झोपेत घोरण्यामुळे त्रस्त असाल तर करा हे उपाय

घोरण्यामुळे अथवा घोरणाऱ्यामुळे त्रस्त  नाही अशी व्यक्ति सापडणे तशी दुर्मिळच . आपल्या सभोवताली घोरण्यामुळे अनेक वैतागलेले लोक आढळतील . यात गमतीचा  भाग म्हणजे जी व्यक्ति घोरते तिला दुसऱ्या व्यक्तीने कितीही सांगितले तरी  घोरणारी व्यक्ति आपण घोरतो हे  कधीही मान्य करत नाही.हे साधे घोरणे देखील कधी कधी धोकादायक ठरते. त्यामुळे याची योग्य ती कारणमीमांसा करून त्यावर उपाय शोधने देखील गरजेचे आहे. चला तर मग या माघील कारणमीमांसा जाणून घेन्याचा प्रयत्न करू यात . 

घोरण्याची करणे :-

घोरणे तशी सामान्य क्रिया आहे. आपण झोपतो तेव्हा आपली जिभ ,तोंड ,वायुमार्ग शिथिल होऊन अरुंद होतात . क्षवास घेताना हे अवयव कंपित पावतात व घोरण्याचा अवाज येतो. 

तसे पाहू जाता काही सामान्य कारणे आहेत ती पुढील प्रमाणे :

१)धूम्रपान व दारूचे अति सेवन 

२)गरोधर पणा 

३)अति लठठ पणा

४)प्रतिबंधक औषधांचे सेवन 

५)सायनस  ची समस्या असणे 

६)आनुवंशिकता असणे किंवा जीभ जाड असणे  

या सारख्या कारणांचा समावेश घोरण्या मागे सर्वसाधारण पणे दिसून येतो.

घोरण्याचे परिणाम :-

घोरण्यामुळे अपुरी झोप होते त्यामुळे व्यक्ती दिवसभर सुस्तीत  राहते .एकग्रता कमी व काम करण्याची इच्छा कमी होते.चीड चीड वाढते .त्यामुळे मानसिक विकार वाढतात त्या कारणानाने हृदय विकाराचा धोका वाढतो .वजन वाढते.त्यामुळे इतर विकारात देखील भर पडते .या मध्ये मधुमेह चा देखील धोका वाढतो.

घोरण्यावर होमिओपॅथी मध्ये उपचार उपलब्ध आहेत .या पद्धती मुळे घोरण्यावर कायम स्वरूपी उपाय योजना करता येते.

उपाय योजना :-

आपण सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे घोरण्याने तश्या  काही खूप मोठ्या समस्या निर्माण होत नाही परंतु घोरणे दीर्घ काळ जर राहिले तर यातून गुंता गुंत वाढून इतर समस्या निर्माण होऊ शकतात यामुळे यावर कायम चा उपाय शोधणे गरजेचे आहे .होमिओपॅथी मध्ये यावर कायम स्वरूपी ची उपाय योजना दिली आहे.ती लक्षणा नुसार खालील प्रमाणे आहे.

१)लीमना माईनर (LIMNA MINOR):-

लीमना माईनर हे अशा लोकांन साठी उपयुक्त आहे ,ज्या लोकांन ला घोरण्या सोबतच नाक बंद होण्याची व तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या आहे ,तसेच अंतर्गत सुजी मुळे घोरण्याची समस्या असेल ,त्याचबरोबर पावसाळ्यात जर मोठ्याप्रमाणात घोरण्याची समस्या असेल तर या औषधाची शिफारस केली जाते .

२)चाइन (CHINA):-

लहान मुल जर झोपेत घोरत असेल तर व दिवसभर सुस्त राहात असेल तर या मध्ये हे औषध गुणकारी ठरते 

३)डल्कामारा(DALKAMARA):-

जर झोपेत तोंड उघडे राहत असेल व व्यक्ती घोरत असेल तर या औषधाचा वापर उपयुक्त ठरतो .

४)लक कॅनिनम (LAC CANINUM ):-

जे लोक अति संवेदनशील असतात व जे लोक विशेषता हिवाळ्यात घोरतात त्यांच्या साठी हे औषध विशेष उपुक्त आहे.

या सोबत काही स्वत हून करण्यासारखे उपाय म्हणजे वजन कमी करणे ,झोपण्याची पोझिशन बदलणे ,त्याचबरोबर पुरेशा प्रमाणात झोप घेणे हे देखील महत्वाचे आहे.

होमिओपथिक औषधा मुळे जरी काही दुष्परिणाम होत नसले तरी औषध घेण्या अगोदर होमिओपथिक डॉक्टर चा सल्ला घेणे कधीही लाभदायक .




 



टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा