उच्च रक्तदाबाने त्रस्त आहात का? काळजी सोडा हे वाचा(High Blood Pressure)

Homoeopathyandmagic in marathi language
1

                               उच्च रक्तदाबाने त्रस्त आहात का? काळजी सोडा हे वाचा  
 

उच्च रक्तदाब अर्थात (high blood pressure)ने त्रस्त बरेच लोक आपल्या अवतीभवती दिसतात .पूर्वीच्या काळी ब्लड प्रेशर ने त्रस्त असणारे लोक लाखात १०-५ दिसून यायची.आता हे प्रमाण हजारात १०-५ असे बदलले आहे .या प्रमाणात बदल का झाला किवा हे प्रमाण का वाढीस लागले याची सविस्तर कारणमीमांसा या लेखाच्या माध्यमातून करून   घेण्याचा प्रयत्न करू यात.
उच्च रक्दाब करणे:-
उच्च रक्तदाबा माघील करणे एकंदरीत आजून तरी माहित नाहीत तरी पण रुग्णाचा इतिहास व या आजारांनी त्रस्त रुग्णाचा इतिहास बघितला तर त्या मध्ये 
१)धूम्रपान
२)अल्कोहोल चे अति सेवन 
३)तीव्र मूत्रपिंडाचा आजार 
४)ताण.आती प्रमाणात ताण तणाव घेणे 
५)बैठे काम करणे .त्यामुळे शारीरिक हालचालीचा आभाव असणे 
६)आहारात मिठाचे प्रमाण जास्त असणे.
७)कौटूबिक इतिहास असणे 
उच्च रक्तदाबाचे निदान :-
उच्च रक्तदाबाचे निदान करताना स्टेथोसकोप ,कफ ,डायल पंप याच्या साह्याने रक्तदाब मोजला जातो .रक्तदाब हा दोन परिणामत मोजला जातो सिस्तोलिक व डायस्तोलिक 
उच्च रक्त दाबाचे प्रकार :-
सामन्यता उच्च रक्त दाबाचे दोन प्रकार आढळतात .
१)साधा अतिरक्तदाब २)अनुषांगिक अतिरक्तदाब 
साधा अतिरक्तदाब :-
या रक्तदाबाचे तसे विशेष असे कारण दिसून येत नाही .या मध्ये व्यक्तीची जीवन शैली ,राहणीमान ,खाण्यापिण्याच्या सवयी ,व्यवसाय ,अनुवाशिक्ता ,या सारख्या सामन्य बाबीचा समावेश होतो .या मध्ये जवळ जवळ ९०-९५ टक्के बाधित लोकांचा समावेश होतो 
अनुषांगिक अति  रक्तदाब :-
या स्वरूपाचा रक्तदाब शारीरिक व्याधीच्या अनुषंगाने निर्माण होतो .या मध्ये शारीरिक व्याधी हा महत्वाचा घटक असतो .म्हणजे अंतर्गत शारीरिक बिघडाचा परिणाम होऊन हा रक्तदाबाचा विकार होतो.हा विकार सर्वसाधारण १०-५ टक्के लोकांन मध्ये दिसून येतो यात किडनीचे आजार ,गर्भरपनातील आजार ,महाधमनीचे विकार याचा प्रामुख्याने समावेश होतो.
उच्च रक्तदाबाचे परिणाम:-
उच्च रक्तदाबामुळे शरीरावर अनेक अंतर्गत व बाह्य परिणाम घडून येतात यामुळे शरीराची अंतर्गत व बाह्य झीज घडून येते .उच्च रक्तदाबामुळे शरीराच्या खलील अवयवावर परिणाम घडून येतो.
१)रक्तवाहिन्या :-
उच्च रक्तदाबा मुळे धमन्याच्या अस्तरामध्ये बदल होतो त्याची जाडी वाढते व त्यात चरबी साठते.त्यास धमनी काठीण्य  असे म्हणतात .या मुळे धमन्यात अडथळा निर्माण होतो ,त्यामुळे धमन्याचा व्यास कमी होतो व रक्त पुरवठ्यास अडचण निर्माण होते त्यामुळे शरीराच्या सर्व अवयवास रक्त पुरवठा होत नाही .जुनाट उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या कमकुवत होऊन त्या फुटतात ,त्यामुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन जीव घेणा प्रसंग उदभावू शकतो .
२)हृदय :-
मानवी शरीराची डावी बाजू ही ह्र्दय बाजू म्हणून ओळखली जाते .म्हरोहिनी ही हृदयाला पुरवठा करणारी महत्वाची वाहिनी आहे.उच्च रक्तदाबामुळे या वाहिनीत देखील चरबी साठून त्याचा हृदयावर दाब पडून हृदयाकडून सर्व शरीरात योग्य त्या प्रमाणात रक्त पुरवठा होत नाही. तसेच हृदया कडून योग्य प्रमाणत रक्त पुरवठा न झाल्याने अति रिक्त रक्त हृदयात साठून राहते व त्याचा आकार वाढतो .परिणामी हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता वाढीस लागते 
३)मेंदू ;-
मेंदू हा मानवी शरीराचा महत्वाचा भाग आहे .धमनी काठीन्या मुळे शरीराच्या इतर अवयवान बरोबर मेंदूस देखील रक्त पुरवठा कमी होण्यास सुरुवात होते त्यामुळे मेदुला इजा पोहचून पक्ष घाता चा झटका येऊ शकतो .
४)डोळे:-
उच्च रक्तदाबाचा मानवी डोळ्यावर देखील परिणाम होतो त्यामुळे डोळ्यातील रक्तवाहिन्या प्रसारण पावून त्या फुटतात त्यामुळे दृष्टी जाऊ शकते .
५)मूत्रपिंड :-
उच्च रक्तदाबास सायलेंट किलर असे देखील संबोधले जाते .कारण याच्या मुळे एक एक अवयव हळूहळू निकामी होण्यास सुरुवात होते. याचा परिणाम मूत्रपिंडावर देखील होतो .उच्च रक्तदाबामुळे मूत्र पिंड योग्य रीतीने काम करत नाही त्यामुळे त्यात विषारी पदार्था चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते कि ज्या मुळे ते निकामी होण्याची शक्यता वाढीस लागते .आहार कसा घ्यावा 

आहार कसा घ्यावा :-
१)काय खाउ नये 
सोडियम युक्त पदार्थआहारातून कमी करावे.लोणची केचप हे पदार्थ टाळावे अति साखर युक्त पदार्थ आहारातून टाळावे .मास चरबी युक्त पदार्थ.बेकरी उत्पादन याचे प्रमाण आहारात नियंत्रित प्रमणात ठेवावे .
२)काय खावे :-
आहारात कच्चे तेल न वापरावे ,रिफाईनड तेलाचा वापर कमी करावा .आहारात पाले भाज्या व फळ फळावळाचे
प्रमाण वाढवावे .
रक्त दाब आटोक्यात आणण्यासाठी उपाय योजना :
मुळात रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ नये या करीत प्रत्येकानं सुरुवातीपासूनच प्रयत्न करणे अथवा काळजी घेणे आवश्यक आहे .परंतु समस्या उद्भवल्यावर काय करावे याचा आढावा या लेखाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू यात .
शारीरिक व्यायम हा याच्यावर अत्यंत जालीम असा उपाय आहे.शारीरिक व्यायामाच्या माध्यमातून आपण उच्च रक्तदाबावर काही प्रमाणात नियत्रण ठेऊ शकतो .
याच बरोबर होमिओपॅथीच्या माध्यमातून देखील आपण उच्च रक्तदाबावर योग्य प्रकारे ताबा मिळवू शकतो.
या मध्ये प्रामुख्याने बेलाडोना ,अर्सेनिक अल्बम ,फोसपरस,क्राटीगस,औरम मेटालीकम या औषधाचा समावेश होतो .
होमिओपॅथीक औषधांचा जरी 





टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा