पित्ताच्या समस्येने ग्रस्त आहात का?तर करा हे उपाय
पित्ताशय आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव आहे .या पित्ताश्यातून एक स्राव निघतो त्यास पित्त रस असे म्हणतात .या पित्त रसाची आपल्या शरीरास महत्वाची भूमिका असते .या पित्त रसाच्या साह्याने आपल्या शरीरातील अन्न पचन होण्यास मदत होते .व आपले अन्न योग्य प्रकरे पचले जाते .परंतु अति तिथे माती या म्हणी प्रमाणे जर हेच पित्त अति प्रमाणात स्रावण्यास सुरुवात झाली तर त्याचा परिणाम आपल्या पचन संस्थेवर होऊन पचन व्यवस्था बिघडण्यास सुरुवात होते .पित्ताच्या समस्येने ग्रस्त अनेक व्यक्ती आपल्या अवती भोवती आढळून येतात.परंतु त्यावर मुळा पासून समाधान काही होत असल्याचे काही दिसून येत नाही.आज आपण या लेखाच्या माध्यमातून याची सविस्तर कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पित्त होण्याची करणे :-
पित्त हे चयापचय क्रिया ,पोषण,आकलन ,त्वचेचा रंग .बुद्धी ,भावना यावर एक प्रकारे नियंत्रण ठेवण्याचे काम करते .परंतु याच्या प्रमाणात फरक पडला कि कमी जास्त प्रमाणात स्रावण्यास सुरुवात होते .तर यामाघील एकंदरीत कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू यात
१)झोपेच्या वेळेत सुत्रता नसणे :-
मानवी शरीरास झोप ही गरजेची आहे.झोप ही मानवी शरीरास उर्जा देण्याचे काम करते.आपण जर पुरयाशा प्रमाणात झोप घेतली तर आपल्या सर्व शारीरिक क्रिया या योग्य प्रकारे काम करतात परंतु झोप जर अपुरी झाली तर शरीरातील आम्लीय घटकाचे प्रमाण वाढून पित्ता चा त्रास होतो.या प्रकारचा त्रास रात्रपाळीच्य वेळेत काम करणाऱ्या लोकांला मोठ्या प्रमणात होतो
२)आहाराची सवयी:-
आहार हा देखील आपल्या आरोग्यावर परीणाम करत असतो .जास्त तेलकट ,तिखट ,मसालेदार पदार्थ खाल्यानंतर शरीरात हमखास पित्ताचे प्रमाण वाढून जळजळ होण्यास सुरुवात होते.
3)अपेय पान :-
अपेयपाण म्हणजे दारू ,सिगरेट ,कॉफी ,निकोटीन युक्त पदार्थ यांचे प्रमाण आहारात वाढल्यास पित्त वाढीस लागते .
४)मानसिक ताण :-
मनसिक ताण हा तसेही शरीरास घातकच असतो .मानसिक ताणामुळे शारीरिक क्रिया प्रभावित होतात व त्याचे पर्यावसन पित्ताचे प्रमाण वाढण्यात होते .
५)अनुवंशिकता :-
आई किंवा वडिलांना पित्ताचा त्रास असेल तर पुढील पिढीला याचा त्रास होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते .म्हणजेच अनुवांशिकता यात मोठी भूमिका बजावत असते.
६)जुनाट आजार पण :
जुनाट आजार पण असेल व त्या सोबत जर औषध चालू असेल तर पित्त होण्याचा शक्यता वाढीस लागते.
पित्ताची लक्षण :
१)निद्रानाश
२)चक्कर येणे
3)छातीत जळजळ होणे
४)उलटी होणे
५)श्वासात दुर्घंदी येणे
६)जेवणाची वेळ टळून गेल्यानंतर मळमळ होणे
७)केस गळतीचे प्रमाण वाढणे
८)घश्याला कोरड पडणे
९)अचानक उष्मा जाणवणे व शरीराला गारवा देणाऱ्या घटकांची निकड भासणे
पित्तामुळे होणारे आजार :-
१)अतिसार
२)ताप
3)मळमळ व उलट्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणे
४)कावीळ
५)सांधे दुखी
६)रक्तात गुठळ्या होणे
७)सांध्याचे विकार उद्भवणे
८)पोटात व्रण पडून अल्सर होणे
९)निराश मनसस्थिती तयार होणे
पित्त शमवण्यासाठी उपाय :
पित्त शमवण्यासाठी आता पर्यंत काही ठोस असा उपाय आता पर्यंत तरी सापडलेला नाही तरी पण तात्पुरत्या स्वरुपात उपचार करून रोग्याला तात्पुरता दिलासा ददेण्याचा प्रयत्न केला जातो .तरी पण खालील काही बाबींचा आपल्या आचारणात समावेश केल्यास पित्ता च्या समस्येवर आराम मिळतो
१)जेवणाच्या सवयी नियमित करा.
२)झोपेच्या सवयी सुधारा .नियमित ६-८ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.
३)अपेय पाण टाळा.
४)तेलकट ,तिखट मसालेदार पदार्थ खाण्याचे टाळा
५)निकोटीन युक्त घटकाचे सेवन टाळा
हि केवळ वर वर ची मलम पट्टी केल्या सारखे आहे.होमिओपथिक उपचार पद्धतीत यावर कायमचे समाधान आहे यात लक्षणा नुसार औषध रचना ठरवली जाते यात प्रामुख्याने कार्बोवेज CARBOVEG
लायकोपोडीयम (LYCOPODIUM),नुक्स ओमिका (NUX VOMICA),पल्सटीला (PULSTILA ),
ब्रायोनिया (BRYONIYA),अर्सेनिक अल्बम (ARSENIC ALBUM) या सारख्या औषधीचा वापर केला जातो .या उपचार पद्धतीने रोग व रोगी दोन्हीही मुळापासून बरे होतात .
होमिओपथीक औषधांचा जरी काही दुष्परिणाम होत नसला तरी यांचा वापर करण्यापूर्वी निष्णात डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
आपणास हा लेख कसा वाटला ते कमेंट करून सांगा व आवडल्यास नक्की शेअर करा .