धुळीच्या समस्याने allergy कंटाळले आहात का? तर मग जाणून घेऊ कारणे व त्यावरील उपचार (DUST PROBLEM CAUSE,SOLUTION,AND TREATMENT)

Homoeopathyandmagic in marathi language
0

              धुळीच्या समस्याने कंटाळले आहात का? तर जाणून घेऊ कारणे  त्यावरील उपाय 


मला   ऍलर्जी आहे.मला हे होत आहे ,मला ते होत आहे अशा तक्रारी आपल्या कानावर सतत पडत असतात.यामध्ये कोणाला धुराची  ऍलर्जी असते तर कोणाला वासाची  ऍलर्जी असते .या  ऍलर्जी मुळे लोक भयंकर त्रस्त असतात त्यामुळे लोक नेहमी काहींना काही उपाय करण्याच्या प्रयत्नात असतात .या सर्व  ऍलर्जी मध्ये धुळीची  ऍलर्जी असणारे जास्त लोक दिसून  येतात .आपल्या आजूबाजूला वातावरणामध्ये धुळीचे प्राबल्य हे अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आज कालच्या काळात आपण कामा निमित्त प्रवास मोठ्या प्रमाणात करतो त्याचा देखील परिणाम यावर होतो.या  ऍलर्जी  मागे असणारी कारण मीमांसा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या लेखाच्या माध्यमातून  करू यात 

धुळीच्या  ऍलर्जी ची कारणे:-
या स्वरूपाच्य  ऍलर्जी साठी  ऍलरजनस सारखे घटक मुख्यता जबाबदार असतात .हे घटक सामन्यता आपल्या घरात आढळून येतात .तसे तर यांचा वावर हा सर्वत्र असतो.हे घटक म्हणले लहान आकाराचे कीटक असतात .या कीटकांना डस्ट माइट्स असे संबोधले जाते .हे डस्ट माइटस अत्यंत सूक्ष्म असतात जे कि डोळ्यांनी दिसत नाहीत .आपल्या त्वचेच्या मृत पेशी ह्या डस्ट माइटसचे खाद्य असते .या मृत पेशिपासुनच घरगुती धुळीची निर्मिती होत असते .हे माईट आपल्या शरीरात गेल्यामुळे आपल्या रोगप्रतिकार शक्ती शीण करण्याचे काम यामुळे होते .या माइटस मुळे होणारे मुख्य परिणाम म्हणजे नाकात व घशात यामुळे जळजळ होण्यास सुरुवात होते .या डस्ट माईटसच अस्तित्व चटई,घरातील फर्निचर यावर दिसून येते .व या माध्यमातून ती आपल्या शरीरात प्रवेश करते .या माईटस मुळे अन्न दुषित होऊन अन्नातून विष बाधा होऊ शकते .तसेच लहान मुल व वयोवृद्ध व्यक्ती यामुळे लवकर बाधित होऊ शकतात .धुळीच्या एलर्जी साठी वाढते प्रदूषण देखील कारणीभूत कारणीभूत आहे .या प्रदूषणामुळे केमिकल युक्त घटक हवेत मिसळतात व ती हवेमार्फत मानवी शरीरात प्रवेश करतात व त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात 


धुळीच्या  ऍलर्जी ची लक्षण :-
१)शिंकणे 
२)नाक वाहाणे 
३)डोळ्याची जळजळ होणे 
४)डोळ्यातून पाणी वाहने 
५)डोळे लाल होणे 
६)शुल्लक कारणाने सर्दी होणे .ही सर्दी होण्याची किया ही वारंवार होणे 
७)दम्याचे प्राथमिक लक्षण दिसणे .यामध्ये छातीत घरघर होणे ,दम लागणे,त्वचेवर कधी कधी लालसर पुरळ उठणे  या प्रकारची लक्षण दिसून येतात .ही लक्षण म्हणजे दम्याची सुरुवात म्हणावी लागेल .

ऍलर्जी चे निदान करण्याची पद्धत :-
कुठल्याही आजाराचे निदान करण्यासाठी त्या माघील कारणमीमांसा जाणून घेणे अवश्यक असते .धुळीच्या एलर्जीची चाचणी करण्याकरता त्वचेची तपसणी केली जाते .त्वचेची तपसणी करताना घरगुती अर्कचा ट्रिगर तपसणी करण्या करता वापरला जातो .यामध्ये आपल्या त्वचेवर येणाऱ्या गांधीच्या व्यासावरून व लालसर पनावरून परीक्षण केले जाते .आपली त्वचा जर खूपच संवेदनशीलअसेल तर रक्त चाचणी केले जाते .रक्ताच्या चाचणीत एलर्जीची लक्षण नक्कीच दिसून येतात .याच बरोबर नाकातील म्युकस व डोळ्यतील लालसर पणा यांची देखील तपासणी करून यातील दोष शोधला जातो.
एकदा एलर्जीचे निदान झाले कि उपचार करणे सोपे जाते व रुग्ण बरा होण्यास मदत होते 
घरगुती निवारक उपाय :-
धूळ हा या सर्वाचा मुख्य शत्रू असल्याने आपल्या आजूबाजूला म्हणजे आपल्या वापरात असणाऱ्या सर्व  वस्तू धूळ मुक्त कशा राहतील यावर प्रामुख्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे,यात उशाच्या खोळी वरचे वर बदलणे ,बेडशीट बदलणे ,सतरंजी जमा करून ठेवणे .धूळ उडू नये म्हणून पाण्याचा वापर करणे .शक्य झाले तर व्ह्कुम क्लीनर चा वापर करून धूळ साफ करावी 
उपचार :-
प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने यावर उपचार करणे आता शक्य होत आहे यामध्ये प्रामुख्याने इम्युनो थेरपी ही पद्धती मोठ्या प्रमाणत उपयोगी ठरत आहे व याचे परिणाम देखील चांगले दिसून आले आहेत .तसेच या सोबत नाकातून स्टेरोईड सारखी औषध दिली जातात .त्यामुळे एलर्जी च्या प्रभावामुळे नाकात उद्भवनार्या समस्येवर आराम मिळण्यास मदत झाली आहे.
या सारख्या औषध पद्धती जरी असल्या तरी होमिओपथक औषध पद्धती याबाबत गुणकारी सिद्ध होत आहे .यामध्ये एलर्जीसाठी विशेषतः एपिस (APIS),अर्सेनिक अल्बम (ARSENIC ALBUMB ),नक्स ओमिका (NUX VOMICA),सबडीला (SABDILA),पल्सटीला (PULSTILA) या औषधांचा वापर या एलर्जीत केला जातो .या औषधाच्या वापरामुळे एलर्जी नियंत्रणात येऊन नियमित वापराने पूर्ण बरी होते .
होमिओपथिक औषधाच्या वापराने जरी काही दूष परिणाम होत नसले तरी यांचा वापर करण्यापूर्वी तज्ञ डॉक्टर चा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कॉमेंट करून कळवा व आवडल्यास शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)