तळ पायाची आग होणे कारणे व उपाय
मानवी शरीर हे तसे पहिले तर व्याधीचे भांडार आहे .आपण प्रत्येक व्यक्तीला थोडे वय झाल्यानंतर विचारले तर तो काहीना काही शारीरिक तक्रार करणारच आजच्या या धाव पळीच्या युगात माणसला स्वताच्या शरीराकडे बघण्यास वेळच नाही तो केवळ वार कानात गेलेल्या घोड्या प्रमाणे चौखोर उधळ्तोच आहे ,या धावपळीचे काय परिणाम त्याच्या प्रकृतीवर होतील याचा तो जरा देखील विचार करत नाही त्यामुळे ज्या प्रमाणे आपण एखाद्या मशिनरीवर प्रमाणापेक्षा जास्त जोर टाकला तर ती एक दिवस नक्कीच बंद पडते किंवा तिच्यात काहीना काही बिघाड निर्माण होतो व तिचा पार्ट बदलावा लागतो तसेच माणसाचे देखील आहे.या आधुनिक काळात माणूस आहारा विहाराकडे लक्ष ण देता केवळ धावत राहतो व त्याचे पर्यावसन विविध आजाराच्या रूपाने आपल्या समोर येते .या लेखाच्या मध्यमातून आपण आज तळ पायाची आग होणे व त्यामागील कारण मीमांसा जाणून घेण्याचा प्रयत्न करू यात .
तळ पायाची आग होण्याची कारणे:-
१)वातावरणीय बदल :वातावरणीय बदलाचा परिणाम देखील आपल्या शरीरावर होत असतो त्याच्या परिणामी देखील आपल्या तळपायाची आग होऊ शकते
२)बराच काळ एका ठिकाणी उभे राहणे :जर आपल्या कामाचे स्वरूप हे उभे राहून करणे या सदरात येणारे असेल तर त्याचा परिणाम आपल्या पायावर होतो व कधी -कधी तळपायाची आग होणे यामध्ये त्याचे रुपांतर होते .
3)अतिरीक्त वजन: अतिरीक्त वजन ही अनेक आजाराची जननी असते .त्यामुळे ते आपल्या सोबत अनेक व्याधी देखील गेऊन येते .या अतिरिक्त वजना चा भार तळपायावर पडून तळ पायाची आग होण्याची शक्यता नाकारता येत नाही
४)खूप चालणे :- कधी काळी आपण खूप चललो असेल किवा आपण सध्याच्या काळी मोठ्या प्रमाणात पायपीट करत असू तर आपले पाय दुखू शकतात व त्या मुळे आपल्या पायाची आग होऊ शकते .
५)औषधाचा दुष्परिणाम :आपणास जर काही व्याधी असेल व त्याचे औषध सुरु असेल तर त्याचा दुष्परिणाम म्हणून आग होण्या सारखी समस्या निर्माण होते .
६)मधुमेह :मधुमेह जर प्रथमिक अवस्थेत असेल तर त्याच्या परिणामी मुंग्या येण्यासारखे परिणाम दिसून येतात
७)सवयी : आपला आहार विहार हा आपली जीवन शैली निश्चित करत असतो .आपण करत असलेली व्यसन देखील आपल्या शरीरावर कमी अधिक प्रमणात परिणाम करत असतात .त्यामुळे वाईट सवयीना वेळीच प्रतिबंध करणे आवश्यक आहे.यात धुम्रपान ,मद्यपान ,इतर घातक सवयी यांचा समावेश होतो .त्याच्या परिणामी देखील तळ पायाची आग होऊ शकते
८)जुनी सर्जरी :पूर्वी पायाची जर एखादी सर्जरी झाली असेल तर त्याचा परिणाम देखील पायावर होऊन पायाची आग होऊ शकते .
९)अनुवांशिकता :-बर्याच बाबतीत अनुवांशिकता हा घटक महत्वाचा असतो .जर आपल्या आई किंवा वडिलांना या स्वरुपाची समस्या असेल तर आपण या समस्येने ग्रस्त होण्याचे प्रमाण जास्त असते .
तळ पायाची आग होणे उपाय :-
१)पायाची रोज रात्री झोपताना खोबरेल तेलाने मालिश करा. या मुळे तळव्यांना होणारा रक्त पुरवठा सुरळीत होऊन तळपायाची आग कमी होण्यास मदत होईल कारण पायाची आग होण्याचे मूळ कारण म्हणजे रक्त पुरवठ्यात अडथळा निर्माण होणे हे होय .ररक्त पुरवठा जर सुरळीत झाला तर आग होणे कमी होत जाते
२)कोरपड ही उष्णता रोधक म्हणून काम करते त्यामुळे रोज रात्री झोपताना कोरपड गर पायाला लावल्यास उष्णता कमी होण्यास मदत होते
३)धने व साखर सम प्रमणात खालल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते
४)मुलतानी मिट्टीत उष्णता रोधक पणा असतो .यामुळे पायाला थंडावा येऊन पाय गार पडतात
५)थंड पदार्थ खाल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते .त्यामुळे आहारात दही ,ताक,लिंबू सरबत यांचा समावेश करावा .
ह्या घरगुती उपाया सोबतच होमिओपथिक उपचार पद्धतीने देखील आपण यावर उपचार करू शकतो .यामध्ये खालील औषधाचा समावेश होतो यामध्ये सल्फर (SULPHAR) कॅल्कॅरीया कार्ब (CALCARIA CARB),अर्सेनिक अल्बम (ARSENIC ALBUMB),बेलाडोना (BELADONA) या औषधाचा समावेश होतो .
होमिओपथिक औषधांचा जरी काही दुष्परिणाम नसला तरी याचा वापर करण्यापूर्वी निष्णात होमिओपथिक डॉक्टर चा सल्ला घेणे गरजेचे आहे .