जुनाट खोकल्याने त्रस्त आहात का तर मग करा हे उपाय
आपण सर्वांनी दोन वर्षापूर्वीचा काळ आठवला तर आपल्याला खोकला या शब्दाचे क्रियेचे महत्व समजून येईल .त्या वेळी केवळ ठसका आला तरी समोरचा माणूस संशया ने आपल्या कडे पाहायला सुरुवात करायचा व खोकणारा देखील दबावात येऊन जायचा त्याला देखील काय करावे किंवा काय करू नये असे होऊन जायचे व तो ठसका असला तरी तो जबरदस्तीने दाबण्याचा प्रयत्न करायचा आज आपण बघितल तर आपल्या संपर्कात असणार्या काही लोकांला खोकला हा कायम स्वरूपी कोरोना पासून चिकटला आहे तर काही लोकांनला पूर्वी पासूनच याचा त्रास जाणवत आहे .व त्यांनी याच्यावर उपाय करण्यासाठी खूप प्रयत्न देखील केले असतील .तर आज आपण खोकला व त्याच्या मागील कारणमीमांसा व उपाय जाणून घेण्याचा प्रयत्न करू यात .खोकला येण्याची कारणे:-
१)धुम्रपानाची सवयी:-
खोकला येण्यास धुम्रपान करणे हे एक प्रमुख कारण आहे .जर धुम्रपान करण्यची सवय असेल तर खोकला येण्यास ही सवय कारणीभूत ठरते व याचा परिणाम आपल्या फुफुसावर होतो व खोकला आपल्या मागे चिकटतो .तसेच लोक इतर व्यसन करत असतील तर त्याचा देखील परिणाम आपल्या शरीरावर होतो.
२)एलर्जी :-
जर आपणास धुळीची एलर्जी असेल तर त्याचा परिणाम आपल्या श्वसन संस्थेवर होतो व फुफुसाची हानी होते त्यामुळे खोकला सुरु होतो
3)दम्याचा त्रास :
जर पूर्वी पासून दम्याचा त्रास असेल तर खोकला सुरु होतो .हा खोकला कोरडा व ओला अशा स्वरूपाचा असतो .ओल्या खोकल्यात कफ पडतो तर कोरड्या खोकल्यात छातीत वेदना मोठ्या प्रमाणत होतात
४)फुफुसाचा कर्करोग :-
फुफुसाचा कर्करोग देखील खोकल्यास कारणीभूत असतो .फुफुस जर व्याधी ग्रस्त असेल तर खोकला येण्यास सुरुवात होते .यात ओला व कोरडा दोन्ही खोकल्याचा समावेश असतो .
५)जंतू संसर्ग :
श्वसन संस्थेत जर जंतू संसर्ग झाला असेल तर खोकला येण्यास सुरुवात होते जो प्राथमिक उपचार करून बरा होतो.
खोकल्यावर उपाय :-
हायड्रेशन :
घसा जर ओला राहिला तर खोकला कमी होण्यास मदत होते त्यामुळे खोकला येत असेल तर घसा कायम ओला राहील याची काळजी घ्यावी
मध व हळद :-
मध व हळद ही खोकल्यावर गुणकारी म्हणून काम करते .हळद व मध ही खोकल्यावर गुणकारी म्हणून प्राचीन काळापासून प्रचलित आहे .त्यामुळे खोकल्यासाठी हळद व मध गुणकारी आहे .
मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने श्वास नलिकेत असणारे जंतू मरतात त्यामुळे घसा साफ राहण्यास मदत होते .त्यामुळे अशा अवस्थेत मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने खोकल्याला आराम पडतो.
अडुळसा सिरफ हे खोकल्याची तीव्रता कमी करण्यासाठी उपकारक आहे त्यामुळे प्राथमिक स्थितीत याचा वापर करणे लाभदायक आहे .
या सर्व उपयान बरोबरच जर आपणास खोकल्याचा पूर्ण पने बिमोड करायचा असेल तर होमिओपथिक उपचार हा या वर एक चांगला व लाभदायक पर्याय ठरू शकतो .या मध्ये फॉसफरस (PHOSPHERS),ब्रायोनिया अल्बा (BRYONIYA ALBA),बेलाडोना (BELADONA),पल्सटीला (PULSTILA)रुमेक्स(RUMEX)या औषधांचा वापर केला जातो
होमिओपथिक औषधाचा जरी काही दुष्परिणाम नसला तरी याचा वापर करण्यापूर्वी होमिओपथिक डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे .