जागतिक हास्य दिन ;-आपल्या जीवनातील हास्याचे महत्व WORLD LAUGHING DAY)

Homoeopathyandmagic in marathi language
0

           जागतिक हास्य दिन ;-आपल्या जीवनातील हास्याचे महत्व WORLD LAUGHING DAY)


आज जागतिक हस्य दिन .या हस्य दिनाची सुरुवात १० मे १९९८ मध्ये मदन कटारिया या डॉक्टरने केली होती.तेव्हा पासून प्रत्येक वर्षी हा दिवस मे महिन्याच्या पहिल्या आठवडयातील पहिल्या रविवारी साजरा केला जातो.हास्य या शब्दात व कृतीत जादू आहे.हसरा चेहरा पहिला कि एक आपले पणाची भावना मनात निर्माण होते.प्रत्येकाला हसऱ्या चेहऱ्याची व्यक्ती हविहावी शी वाटते.लहान मुलाच निरागस हसण पाहून सर्व ताण निघून जातो.या मुलाच्या ह्स्याची किमत कीतीही मूल्य दिले तरी लावली जाऊ शकत नाही .

हसण्याचे फायदे :-

१)परस्पर द्वेषाची भावना कमी होते:

हसण्यात एक प्रकारची जादू आहे .हासन्यामुळे  मुळे लांबची व्यक्ती जवळ येते .परस्पर संवाद वाढीस मदत होते .लोक वैर विसरतात .कधीकधी ज्या गोष्टी बोलून समजत नाहीत त्या केवळ एका ह्स्याच्या लकेरीत समजून जातात .आज काल माणूस केवळ धावतो आहे का आणि कशा साठी हे त्याला देखील अजून उमजलेले नाही .केवळ तो धावतो आहे.या धाव पळीत  तो इतका लांब येऊन पोहचला आहे कि तो हसणेच विसरून गेला आहे.

२)सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागतो :-

हास्याचा महत्वाचा परिणाम म्हणजे सकरात्मक दृष्टीकोन वाढीस लागतो .यामुळे एक नवीन उर्जा वाढीस लागते .माणूस नेहमी चांगला विचार करतो 

३)आरोग्य सुधारते :

नियमित हसल्यामुळे चेहर्याचे सौंदर्य खुलून दिसते .चेहरा प्रसन्न दिसतो .तेसच शरीरातील इतरअवयवांना देखील याचा फायदा होतो .नेहमी काळजीत राहणाऱ्या व्यक्तीला कधीना कधी रुद्य विक्राराचा झटका येणार हे सांगयला काही जोतीष्याची गरज नाही.या उप्पर सदा आनंदी रहाणार्या व्यक्ती चा रक्त प्रवाह हा सुरळीत राहून तो हृदय मजबूत करण्यास मदत करतो 

४)झोपण्याच्या समस्येवर इलाज :-

जर तुम्ही निद्रानाशाने ग्रस्त असाल तर हसण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण हसण्यामुळे मेलाटेनीन नावाचे संप्रेरक निर्माण होते त्यामुळे झोपेची समस्या दूर होण्यास एक प्रकारची मदत होते .

५)ताण तणाव कमी होतो :-

हसण्यामुळे शरीरातील स्नायू वरील ताण कमी होण्यास मदत होते .व शरीराला ताज्या ऑक्सिजन चा पुरवठा होण्यास मदत होते .

६)दुख हलक होण्यास मदत होते:-

माणूस कितीही दुखात असला तरी त्याला कधीना कधी त्यातून बाहेर पडावेच लागते कारण जीवन हे शेवटी क्षणभंगुर आहे .जर तो हसला नाही आनंदी झाला नाही तर त्याच्या जीवनाला काहीच अर्थ राहत नाही .त्यामुळे हस्य हे असे टोनिक आहे जे मोठ्यातील मोठ्या दुखाला हलक करायचं काम करत असत 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)