उन्हाळी लागल्यावर काय करावे ?what to do in Strangury situation.

Homoeopathyandmagic in marathi language
0

                 उन्हाळी लागल्यावर  काय करावे ?what to do in  Strangury situation.




निसर्ग चक्रात ऋतू बदलला कि सृष्टीत बदल होतात काही दृश्य स्वरुपात दिसतात तर काही अदृश्य स्वरुपात असतात .त्याचा बरा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो .प्रत्येक व्यक्तीची शरीर रचना त्यांची रोग प्रतिकार शक्ती ही व्यक्ती परत्वे वेगवेगळी असते .उन्हाळा सुरु झाला कि आपल्याला थंड पदार्थ व थंड पेय पिण्याची आवश्यकता भासते .तसेच हिवाळ्यात गरमा गरम भजी ,मसाला दुध पिण्याची निकड आपल्याला भासते.तसेच या ऋतू बदला सोबत आपण काही सर्व सामन्य समस्येला देखील बळी पडतो .यामध्ये सार्वत्रिक स्वरुपात दिसून येणारी समस्या म्हणजे उन्हाळ्यात उन्हाळी लागण्याची समस्या .या लेखाच्या माध्यमातून आपण आज उन्हाळी लागण्याची कारणे व त्यावरील उपाय यावर उहापोह करण्याचा प्रयत्न करणार आहोत .

उन्हाळी लागण्याची करणे :

१)तापमानातील बदल :

उन्हाळ्यात तपमानात बदल होत असतो  कधी जास्त तर कधी कमी होत असते .त्याचा परिणाम आपल्या शरीराच्या बाह्य व अंतर्गत भागात होत असतो हा तापमानातील बदल आपले शरीर कधी कधी सहन करू शकत नाही त्याचा परिणाम आपल्या मुत्र संस्थे वर होऊन आपल्याला उन्हाळीच्या समस्येला तोंड द्यावे लागते 

2)पाण्याचे कमी होणारे प्रमाण :-

आपले शरीर हे मोटारी प्रमाणे काम करत असते .एखाद्या गाडीला थंड करण्यासाठी जसे रेडीएटर असते व त्या मध्ये टाकलेल्या पाण्याच्या फिरण्यामुळे मोटार थंड राहते .मानवी शरीराचे देखील असेच असते .आपल्या शरीरात पाणी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचे कम करत असते .उन्हाळ्यात वाढणाऱ्या तपमाना सोबतच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होते या कमी होणार्या पाण्यामुळे शरीर थंड ठेवण्यात आवश्क भूमिका निभवायचं काम करणाऱ्या क्षाराचे प्रमाण कमी होते व उन्हाळीची समस्या निर्माण होते 

3)जंतू संसर्ग:

कधी कधी आपली रोग प्रतिकार शक्ती जर शिण असेल तर आपण कुठल्याही संसर्गास सहजासहजी सहजी बळी पडू शकतो त्याचीच  परिणीती मुत्र मार्गात संसर्ग होण्यात होते व त्याचे पर्यावसन उन्हाळीत होते 

४)मधुमेह :

जर मधुमेह सारखा आजारानी तुम्ही ग्रस्त असाल व त्यात जर बहुमुत्र ते च्या समस्येला तुम्हाला तोंड द्यावे लागत असेल तर मुत्र मार्गात जंतू संसर्ग होण्याची शक्यता निर्माण होते व त्यामुळे देखील उन्हाळी लागते 

५)औषधांचे सेवन :

आपण जर आजारी असाल व औषधी गोळ्या घेत असाल तर त्यातील केमिकल च्या मात्रे मुळे देखील मुत्र मार्गात संसर्ग होण्याचा धोका वाढतो व त्यामुळे उन्हाळी लागू शकते 

६)सवयी :-

मनुष्य हा सवयीचा गुलाम असतो असे म्हणतात ते काही खोटे नाही सवयी मुळे अनेक चांगल्या वाईट गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात यामुळे आपल्या जीवनाची दिशा व दशा ठरत असते .काही लोकन मद्ये नैसर्गिक क्रियेच्या बाबत मोठी अनस्था दिसून येते .आपले शरीर हे चांगल्या वाईट गोष्टीचे आपल्याला सिंग्न्ल देत असते परंतु मनुष्य याबाबतीत दुर्लक्ष करतो व त्याचे परिणाम विविध व्याधी च्या स्वरुपात त्याला भोगावे लागतात .

उन्हाळी लागणे उपाय :-

१)पाण्याचे प्रमाण :-

शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य त्या पातळीला राहील याची काळजी घ्यावी .नेहमी भरपूर पाणी प्यावे .आहारात थंड घटक काकडी ,कलिंगड ,यासारख्या घटकांचा समावेश करावा .

2)उन्हात फिरताना :

उन्हात फिरताना डोक्याची काळजी घ्यावी म्हजे डोके झाकूनच बाहेर पडावे .होता होईल तेवढे उन्हात फिरणे टाळावे .

3)लिंबू वर्गीय फळाचा आहारात समावेश :

शरीरातील कमी झालेल्या क्षाराची भरपाई झाली तर आपल्याला त्रास होत नाही .लिंबू  वर्गीय घटका मद्ये नायट्रिक असिड चे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीराचे झीज भरून येते म्हणून आहारात लिंबू वर्गीय फळाचा संत्री .मोसंबी .लिंबू याचा समावेश गरजेचा आहे.या सोबत ताक,लस्सी ,झास  ,हे घटक देखील या काळात पिणे शरीरास लाभदायक आहेत .

याच बरोबर उन्हाळी साठी होमिओपथिक उपचार पद्धती देखील मोठ्या प्रमाणत लाभदायक आहे या मध्ये सर्वसाधारण नक्स ओमिका (NUX VOMICA),कॅन्थारीस ,थुजा (THUJA ),लायकोपोडीयम (LYCOPODIUM) या होमिओपथिक औषधांनचा समावेश होतो .या औषधांन मुळे आपल्या शरीरात निर्माण झालेल्या अंतर्गत समस्या मूळा पासून दूर होण्यास मदत होते .

होमिओपथिक औषधांचा जरी काही  दुष्परिणाम नसला तरी यांचा वपर करण्यापूर्वी निष्णात डॉक्टर चा सल्ला घेणे आवश्यक आहे .








टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)