नोकरी सांभाळून कुठले व्यवसाय करता येतील?

Homoeopathyandmagic in marathi language
0

 नोकरी सांभाळून कुठले व्यवसाय करता येतील? 

आज आपण आपल्या अवती भवती नोकरी व्यवसाय करणारी लोक बघतो .त्यात काही लोक व्यवसाय करतात तर काही नोकरी करतात .नोकरी करणारी लोक हे व्यवसायिक लोकांला सुखी समजतात तर व्यवसायीक लोक नोकरी करणार्या लोकांनला सुखी समजतात परंतु ज्याची परिस्थिती त्याला माहिती असते .आज आपण नोकरी सोबत कुठला व्यवसाय करता येईल का याचा विचार करू यात .हे व्यवसाय करताना आपण शिल्लक राहणाऱ्या वेळेचा सदुपयोग कसा करावा याचा विचार करू यात .
१)ऑनलाईन मार्केटिंग :-
तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करून पैसे कमवू शकता .यासाठी तुम्हाला थोडी वाट मात्र पहावी लागेल .त्यानंतर याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील 
२)ब्लॉगिंग :-तुम्ही जर लिखनाची आवड असेल तर ब्लॉग लिहून तुम्ही पैसे कमवू शकता 
3)घरगुती मेस व्यवसाय :-तुमच्या आजूबाजूला कॉलेज ,कारखाने असतील तर तुम्ही या ठिकाणी किंवा गरजू लोकांला पोहच जेवणाचे डबे पोहचवू शकता यातून देखील तुम्हाला अतिरिक्त कमाई होऊ शकते .
४)शिकवणी वर्ग चालवणे :तुम्ही जर एखाद्या विषयात तज्ञ असाल तर त्या बाबतीत शिकवणी वर्ग तुम्ही सुरु करू शकता ते देखील तुमच्या वेळेच्या सोयीनुसार तसेच हे तुम्ही  ऑनलाईन देखील करू शकता .
५)शेयर मार्केट :तुम्हाला जर शेयर  मार्केट च ज्ञान असेल तर शेयर मार्केट गुंतवणूक करून देखील तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता .परंतु य करता तुम्हाला मार्केट च ज्ञान योग्य प्रकारे असणे गरजेच आहे .
६)सिझन प्रमाणे व्यवसाय बदलून :आपल्या देशात इतके सण महोत्सव कदाचितच इतर देशात साजरे केले जात असतील .या सणावारा प्रमाणे लागणाऱ्या वस्तू आपण त्या त्या वेळी विकू शकतो .यात दिवाळीला पणत्या,नवरात्रीला माती ,संक्रातील  पतंग या सारख्या वस्तूची आपण विक्री करू शकतो .यातून आपल्या कमी वेळेत चांगली कमाई होऊ शकते .
या सारखे छोटे मोठे व्यवसाय आपण नोकरी सोबत करू शकतो जेणे करून आपल्या कमाई ला हातभार लागू शकतो .



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)