दात दुखीने त्रस्त आहात का ? चिंता सोडा हे वाचा (Solution for teeth problem)

Homoeopathyandmagic in marathi language
0

 दात दुखीने त्रस्त आहात का ? चिंता सोडा हे वाचा (Solution for teeth problem)

दात दुखी केवळ नाव जरी कानावर पडले तरी आपल्या अंगावर नक्कीच शाहारे आल्याशिवाय राहत नाहीत कारण या दात दुखीचा अनुभव आपल्या पैकी प्रत्यकाने आपल्या जीवनात कधीना कधी नक्कीच घेतला असणार व त्या वेदनेत रात्र जागून काढली असणार यात शंका नाही .या काळात सर्व इष्ट देवा दिकांचा देखील धावा करून झाला असणार व याचा शेवट दंत वैद्या कडे जावून एकतर दात उपटून झाला असणार किवा यानंतर क्लिनिक च्या वाऱ्या करीत झाला असणार यात शंका नाही.या लेखाच्या माध्यमातून आपण या दात दुखीला एकंदरीत जबाबदार असणारे घटक व त्यावर वेळीच करता येणे सारखे उपाय यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत 

दात दुखीची करणे :-

तसे पाहू गेले तर दात दुखी मागे  बर्याच कारणांचा समावेश होतो यातील काही ठळक करणाचा आढावा घेण्याच  प्रयत्न करू यात यामध्ये दातात पोकळी होणे ,दातात आतून हानी होणे ,दाताला मार लागणे,आहारात गोड पदार्थाचे प्रमाण जास्त असणे .याच बरोबर गरम गार पदार्थ खाताना योग्य पथ्य न पाळणे यया सारख्या प्रमुख बाबींचा समावेश होतो 

दात दुखीपासून दूर राहण्याचे काही उपाय :-

१)दैनंदिन आहारात साखरेचे प्रमाण कमी करणे 

२)आहारातील फास्ट फूड चे प्रमाण कमी करणे .शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा 

३)थंड पेय आहारात नसले तरी चालेल 

४)दाताच्या स्वचछतेकडे विशेष लक्ष दया.दात दिवसातून दोन वेळा तरी चांगल्या टूथ पेस्ट ने साफ करा.

५)अन्न व्यवस्थित चावून व्यवस्थित गिळा.

६)आहारात तंतुमय पदार्थाचे प्रमाण वाढवा .

७)शक्यतो अति गरम अथवा अति गार पदार्थ खाण्याचे टाळावे

८)वर्षातून किमान दोन वेळा तरी दाताची तपासणी करून घ्या .

९)दातातील सर्व ग्याप भरून घ्या. दाता मध्ये ग्याप राहणार नाहीत याची काळजी घ्या 

शेवटी दाताच्या आरोग्यावर आपल्या शरीराचे आरोग्य अवलंबून असते हे विसरून चालणार नाही 

दाताच्या या विकारावर होमिओपथिक उपचार पद्धती मध्ये देखील काही औषधींचा समावेश आहे यामध्ये सायलिसिया (SAILISIYA),अर्निका (ARNICA),मार्क सोल (MARKSOAL),स्टेफीसग्रीया (STYFISGRIYA)

या सारख्या प्रमुख औषधांचा समावेश होतो याच्या वापराने दात दुखी तर थांबतेच पण ती परत उदभवण्याचे प्रमाण देखील कमी होते .

होमिओपथिक औषधांचे जरी काही दुष्परिणाम नसले तरी याचा वापर करण्यापूर्वी होमिओपथिक डॉक्टरचा सल्ला घेणे कधी चांगले .






टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)