कावीळ होण्याची कारणे व उपाय
ज्यावेळी रक्तात असणाऱ्या बिलीरुबिन (bilirubin) या पदार्थाचे प्रमाण अधिक होते तेव्हा शरीरातील यकृतावर याचा परिणाम होऊ लागतो. यकृताची काम करण्याची क्षमता हळू हळू कमी होऊ लागते. वाढलेला बिलीरुबिन पदार्थ जस जसा शरीरात पसरू लागतो तस तसे डोळ्यांचा पांढरा भाग, शरीरावरील त्वचा व नखे इत्यादींचा रंग पिवळा होऊ लागतो. कावीळ चा हा रोग जास्तकरून नवजात बालकांमध्ये आढळतो. परंतु काही प्रमाणात वयस्कर लोकांमध्ये देखील या रोगाची लक्षणे दिसू शकतात
काविळीचे प्रकार (Types of jaundice in marathi)
कावीळ रोगाचे तीन प्रमुख प्रकार आहेत-
हेमोलीटीक जाँन्डिस : जर रक्तातील लाल पेशी वेळे आधीच तुटायला लागल्या तर रक्तातील बिलिरुबिन चे प्रमाण वाढायला लागते ज्याला लिव्हर द्वारे कंट्रोल करणे कठीण होते. ज्यामुळे डोळे आणि त्वचा पिवळी दिसू लागते. या स्थितीला प्री हिपेटिक कावीळ अथवा हेमोलीटीक कावीळ म्हटले जाते. हा प्रकार काही औषधी चा दुष्परिणाम अथवा अनुवंशिक रुपाने होऊ शकतो.
हेपैटोसेलुलर कावीळ : अनेकदा लिव्हरच्या लिव्हर च्या समस्ये मुळे देखील कावीळ होतो. नवजात बालकांमध्ये काही enzymes ची कमतरता असते व त्यांचे लिव्हर देखील पूर्णपणे विकसित झालेले नसते ज्यामुळे त्यांना अस्थायी कावीळ होऊ शकतो. वयस्कर लोकांमध्ये हा रोग दारू पिणे, इतर विषयूक्त पदार्थ खाणे आणि इतर काही औषधीच्या दुष्परिणाम म्हणून होऊ शकतो. या प्रकाराला हेपैटोसेलुलर कावीळ म्हटले जाते.
पोस्ट हिपॅटिक कावीळ किंवा ऑब्सट्रक्टि व कावीळ :
पित्त नलिकेत रुकावट निर्माण झाल्याने बिलिरुबिन वाढू लागते आणि हे मुत्रात पसरल्याने मुत्राचा रंग पिवळा होऊन जातो. या प्रकाराला पोस्ट हिपॅटिक कावीळ किंवा ऑब्सट्रक्टि व कावीळ म्हटले जाते.
कावीळ रोगाची लक्षणे – kavil symptoms in marathi
कावीळ झाल्यावर पुढील लक्षणे (kavil symptoms in marathi) दिसू शकतात-
त्वचा, डोळे आणि नखांचा पांढरा भाग जलद गतीने पिवळा होऊ लागणे
फ्लू सारखी लक्षणे दिसणे
ताप येणे
शरीरात कमजोरी
भूक न लागणे
अपचन, उलटी होणे
वजन कमी होऊ लागणे
पोट दुखणे
पिवळ्या गडद रंगाची लघवी
काही प्रमाणात हातावर खाज येणे
कावीळ कशामुळे होते व कावीळ होण्याची कारणे
जर रक्तातील बिलीरुबिन चे प्रमाण 2.5 पेक्षा जास्त झालेले असेल तर यकृतातील नको असलेले पदार्थ स्वच्छ करण्याची प्रक्रिया थांबते व परिणामी बिलीरुबिन चे प्रमाण आधी पेक्षा अधिक वाढायला लागते आणि यामुळे त्वचा पिवळी दिसू लागतो या रोगाला ‘कावीळ रोग’ म्हटले जाते. पुढे काही कारणे देण्यात आली आहे ज्यामुळे कावीळ होऊ शकतो-
हेपिटायटीस
पँक्रिटिक कँसर
अल्कोहल संबंधी लिव्हर चे रोग
दूषित वस्तु आणि खराब पाणी पिल्याने
काही विशिष्ट औषधी घेतल्याने
कावीळ घरगुती उपचार व उपाय
जर आपणास कावीळ ची लक्षणे दिसत असतील तर तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य औषधे उपचार घ्यावा. याशिवाय आपण लवकर बरे होण्यासाठी कावीळ च्या रोगात पुढील घरगुती उपाय देखील करू शकता.
उसाचा रस
उसाचा रस का कावीळ च्या रोगात अत्यंत गुणकारी आहे. जर पीडित व्यक्तीने दिवसातून तीन ते चार वेळा उसाचा रस घेतला तर त्याची प्रकृती लवकरात लवकर सुधारेल
याशिवाय गहूच्या दाण्या एवढा पांढरा चुना उस रसासोबत पील्याने देखील कावीळ चा रोग लवकरात लवकर चांगला होतो.
हळद
कावीळ झाल्यावर घरगुती उपाय म्हणून तुम्ही दिवसातून तीन वेळा एक चमचा हळद अर्धा ग्लास पाण्यात मिसळून पिऊ शकतात. असे केल्याने शरीरात असलेले विष युक्त पदार्थ मारले जातात. हा उपाय शरीरातील वाढलेल्या बिलीरुबिन ला देखील बाहेर काढण्याचे काम करतो.
संत्र्याचे सेवन
संत्री पचनसंस्थेला दुरुस्त करण्याचे कार्य करते. काविळच्या रोगात देखील संत्री अत्यंत गुणकारी आहे. संत्र्याच्या सेवनाने शरीरातील बिलरुबिन चे प्रमाण कमी करण्यास देखील सहाय्य होते.
ताक आणि मठ्ठा प्यावा
काविळ च्या रोगात सकाळ-संध्याकाळ 1-1 ग्लास ताक अथवा मठ्ठा मध्ये एक चमचा सेंधव मीठ टाकून प्यावे. या उपायाने देखील कावीळ रोगात आराम मिळतो.
गुळवेल
गुळवेल हे अत्यंत महत्त्वाचे आयुर्वेदिक औषध आहे, ज्याचा उपयोग अनेक रोगांना ठीक करण्यासाठी केला जातो. कावीळ रोगात गुळवेल चा रस मध मध्ये मिसळून पहाटे सकाळच्या वेळी सेवन करावे. अधिक लाभ मिळवून घेण्यासाठी आयुर्वेदाच्या जाणकारांशी संपर्क साधावा. गुळवेल चे फायदे
कावीळ रोग्याचा आहार
ताजे आणि शुध्द भोजन ग्रहण करावे.
स्वयंपाक बनवण्या आणि वाढण्याआधी हातांना स्वच्छ धुवावे.
जास्तीत जास्त पाणी प्यावे. पाणी पिल्याने शरीर व लिव्हर मध्ये असलेले हानिकारक पदार्थ बाहेर टाकले जातात. म्हणून दररोज पुरेशा प्रमाणात स्वच्छ आणि शुद्ध पाणी प्यावे.
फळांचा रस प्यावा. लिंबू, संत्री आणि इतर फळांचा रस पिल्याने शरीराला नवीन ऊर्जा मिळते व शरीर देखील स्वच्छ राहते.
हळुवार आणि चावून खावे. हळुवारपणे चावून खाल्ल्याने लिव्हर वर जास्त दबाव येत नाही. म्हणून दिवसातून वेगवेगळ्या वेळी थोडे थोडे हळुवार चावून अन्न खावे
काविळीवर काय करावे आणि काय करू नये
कावीळ ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये रक्तप्रवाहात बिलीरुबिनचे प्रमाण जास्त असते. प्रौढांपेक्षा नवजात मुलांमध्ये हे अधिक गंभीर आहे. काय करावे आणि करू नये याचे अनुसरण करून, त्याच्या लक्षणांची तीव्रता रोखणे किंवा कमी करणे सोपे आहे.
कावीळ झालेल्या रुग्णांनी काय आहार घ्यावा याची माहिती घेऊ या. भूक मंदावणं, अन्नावरील वासना उडणं, खाद्यपदार्थांचे, फोडणीचे वास सहन न होणं, उलट्या, मळमळ ही लक्षणं काविळीत दिसतात. अशा वेळी सौम्य खाणं, कमी तेल, कमी वास (उदा. लसूण, कांदा, फोडणी) असलेले पदार्थ, फळ, सूप, फळांचा रस, मऊ भात, डाळ, इत्यादी दिल्यास रुग्णाला थोडं-फार खाणं जातं. कावीळ बरी होऊ लागल्यावर, म्हणजे ५, १० दिवसांनी भूक हळूहळू पूर्ववत होते. असं झाल्यानंतर रुग्णानं त्याचा नेहमीचा आहार पूर्ववत सुरू करणं अगदी जरूरीचं आहे. अशा वेळी पथ्याचा आहार चालू ठेवण्याचा कोणताही फायदा नाही.
काविळीचा आहार - गैरसमज
भारतामध्ये काविळीसाठी विविध प्रकारच्या उपचार पद्धती आहेत. प्रत्येक उपचार पद्धतीचा आहार या विषयावर वेगळा विचार असतो. या शिवाय घरातील मंडळी रुग्णाला त्यांचा परीनं सल्ला देत असतात. यामुळे काविळीच्या रुग्णाच्या मनात गोंधळ होतो. अॅलोपॅथीच्या अनुषंगानं खालील गैरसमज आहेत.
•पिवळे पदार्थ, भोपळा, पपई, हळद, खाल्यानं कावीळ वाढते.
तेल, तूप खाऊन कावीळ वाढते. तेल, तूप, लोणी आहारातून पूर्ण वर्ज्य केले पाहिजे.
कुठलाही शास्त्रीय आधार नसताना बराच काळ पथ्य चालू ठेवून १०-२० किलो वजन कमी होऊन कृश झालेले असंख्य रुग्ण दिसतात. काविळीच्या रुग्णाची भांडी, कपडे वेगळे ठेवण्याची आवश्यकता नाही. काविळीच्या रुग्णाची भूक सुधारण्यास त्यानं लवकरात लवकर पूर्ण आहार घेणं गरजेचं आहे.
काविळीच्या रुग्णांनी कोणती औषधं टाळावी?
पॅरासिटेमॉल, अॅनॉक्सेसिलीन कॅलक्लूलिना, टी.बी.वरील औषधं डॉक्टरांच्या सल्यानेच घ्यावी. शक्यतो ती टाळावीत. कावीळ बरी करण्याच्या नावाखाली वरेच उपचार केले जातात. वैद्यकीय परवाना नसलेल्या उपचार पद्धती आणि उपचार देणाऱ्यांपासून या रुग्णांनी दूर राहावं. औषधं, पुड्या, भस्म, कांदे आणि ज्यांचे घटक स्पष्ट लिहिलेले नाहीत, माहीत नाहीत अशी औषधं टाळावीत.
हेपेटायटिसची कावीळ लसीद्वारे टाळता येते का?
हिपेटायटिस ए व बी यांवर अतिशय परिणामकारक लस उपलब्ध आहे. हे लसीकरण पूर्ण घेतल्यास ही दोन प्रकारची कावीळ पूर्ण टाळता येते.
हिपेटायटिस इ वर (सर्वसाधारणपणे २० वर्षावरील लोकांमध्ये दिसणारी कावीळ) पुढील १-२ वर्षांत लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हिपेटायटिस सी वर अद्याप लस नाही.
लसीकरणाशविाय कावीळ टाळण्यासासाठी काय खबरदारी घेता येते?
ए व इ प्रकारची कावीळ दूषित अन्न अथवा पाण्यातून पसरते. उन्हाळ्यात, पावसाळ्यात या रुग्णांचं प्रमाण वाढतं. पदार्थ तयार करणारी व्यक्ती काविळीनं बाधित असल्यास, पदार्थ तयार करताना दूषित पाणी वापरल्यास किंवा वापरलेले ग्लास, कप, कपडे धुण्यास दूषित पाणी वापरल्यास, या वापरणाऱ्या, सेवन करणाऱ्या लोकांना कावीळ होण्याचा धोका असतो. काही पदार्थ उदा. चिंचेची चटणी, पाणी पुरी, चटण्या ज्यामध्ये दूषित पाणी वापरलं जाऊ शकतं अथवा खूप हाताळले जातात, ते टाळावेत. थोडक्यात, अस्वच्छ ठिकाणी खाणं टाळावं.
बी व सी प्रकारची कावीळ काही हाय रिस्क ग्रुपना होऊ शकते. दूषित रक्त, टॅटू, अपरिचीत व्यक्तींशी असुरक्षित लैंगिक संबंध या गोष्टी टाळाव्या. आश्चर्याची गोष्ट अशी, की वैद्यकीय व्यवसायातील मेडिकल आणि पॅरा मेडकिल लोकांना बी व सी प्रकारच्या काविळीचा धोका जास्त असतो. हिपेटायटिस बीची लस न घेतलेली बरीच मंडळी या गटातील आढळतात. या सर्वांनी हिपेटायटिस बीची लस जरूर घ्यावी.
काविळीवर होमिओपॅथीक औषध:-
चेलाडीयम, चायना, मार्क साल, फास्परस, बर्योनिया या ओषधांचा विशेष करून काविऴ नियंत्रित करण्यासाठी होमियोपैथीत वापर केला जातो.