विसरभोळेपणा का होतो?कारणे व उपाय

Homoeopathyandmagic in marathi language
0

 विसरभोळेपणा का होतो?कारणे व उपाय (aminisia cause and solution) 



अनेकदा आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गोंधळ घालतो. एवढचं नाही तर बऱ्याच गोष्टी विसरतोही. विसरण्याच्या या सवयीला सामान्य गोष्ट समजून दुर्लक्षं केलं जातं. परंतु ही सवय जर वेळेसोबत वाढत गेली तर मात्र ही साधारण गोष्ट असत नाही. जर तुम्हीही सतत गोष्टी विसरत असाल, तर तुम्हीही अल्झायमर सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असू शकता. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्षं करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार करा. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका सशोधनातुन विसरण्याच्या आजारापासून बचाव करण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरतं असल्याचे सिद्ध झाले आहे.सशोधनातुन असं सिद्ध झालं आहे की, ज्या व्यक्ती दररोज एक्सरसाइज करतात किंवा घरातील दैनंदिन कामामध्ये व्यस्त असतात, त्यांच्यामध्ये गोष्टी विसरण्याचे प्रमाण फार कमी दिसून येते. संशोधकांनी केलेल्या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, जर व्यक्ती दररोज शारीरिक हालचाली करत असेल तर त्याचं आरोग्य उत्तम राहतं तसेच मेंदू अॅक्टिव्ह राहण्यासही मदत होते. 

वयाने जास्त असलेल्या व्यक्तींमध्ये अल्जायमरची लक्षणं दिसण्यास सुरुवात होते. त्यामुळे अशा व्यक्तींनी दररोज जर व्यायाम किंवा घरातील काम करण्यास सुरुवात केली तर त्यांच्या आरोग्यासोबतच त्यांची स्मरणशक्ती मजबूत होण्यास मदत होते. संशोधनातून असं स्पष्ट होतं की, आरोग्य सुधारण्यासाठी, मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व्यायाम हा सर्वात फायदेशीर आणि स्वस्त उपाय आहे. 

अमेरिकेतील रश यूनिवर्सिटीतील एरोम एस बुचमॅन यांनी सांगितले की, आम्ही संशोधनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूच्या दोन वर्षांआधीच्या शारीरिक हालचालींचे आकलन केले. तसेच त्यांच्या मृत्यूनंतर दान करण्यात आलेल्या मेंदूतील पेशींचा अभ्यास केला. त्यातून असं समोर आलं की, सक्रिय जीवनशैलीमुळे मेंदूवर सकारात्मक परिणाम दिसून येतात. 

संशोधकांना असं आढळून आलं की, मेंदूमध्ये अल्झायमरची लक्षणं अस्तित्वात असतील तर शरीराला सक्रिय ठेवल्याने स्मरणशक्ती वाढविण्यासाठी मदत होते. 

या संशोधनातून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे, जर तुम्ही तुमच्या शरीराला अॅक्टिव्ह ठेवत असाल तर अल्झायमरसारख्या महाभयंकर आजारापासून बचाव करू शकता. अल्झायमरची लक्षणं जास्त करून वृद्धांमध्ये दिसून येतात. 

उदाहरणार्थ अल्झायमरचा रुग्ण ब्रश करणे, स्वच्छतेच्या क्रिया करणे, हेसुद्धा विसरतो. इतकंच नाहीतर तोंडात घास टाकल्यावर तो गिळायलाही विसरतो. 80 वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या 50 टक्के व्यक्तींना डिमेंशिया होण्याची शक्यता असते. सध्या भारतात 43-50 लाख डिमेंशियाचे रुग्‌ण आहेत. सामाजिक, आर्थिक, धार्मिक सांस्कृतिक असं कुठलंही बंधन या आजाराला नाही. गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित अशा कुणालाही हा आजार होऊ शकतो.

मानसोपचारतज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट या रोगाचं निदान करतात. आजाराचं निदान करण्यासाठी एक प्रश्नावली असते. त्या प्रश्नाची उत्तरं घेतली जातात. त्यावरून एखाद्याला डिमेंशिया आहे का, हे शोधता येतं. याशिवया, MRI करूनही या आजाराचं निदान करतात.

 अल्झायमर का होतो:-

अल्झायमरची अनेक कारणं आहे. कुठल्याही एका कारणामुळेच तो होतो, असं नाही. काही कारणं खालीलप्रमाणे आहेत.

वय : 60 वर्षांपेक्षा जास्त वय, हे डिमेंशियाचं कारण असू शकतं.

समाजापासून दुरावणे : लोकांमधली उठबस, संवाद कमी होणे किंवा इतर निवृत्ती, शहर किंवा देश बदलणे, यासारख्या कारणांमुळेआलेला एकटेपणा यामुळेही अल्झायमर होऊ शकतो.

हृदयाशीसंबंधित आजार : मधुमेह, रक्तदाब यासारख्या हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो.

 मुख्य कारणे:-

स्मृती हे मेंदूचे कार्य आहे. मेंदूचा कोणताही भाग, विशेषत: थॅलामस, हिप्पोकॅम्पस किंवा इतर संबंधित भाग, जे आठवणी आणि भावनांसाठी जबाबदार असतात, त्यांच्यावर परिणाम झाल्यामुळे अम्नेशिया होतो. याची काही कारणे याप्रकारे आहेत:

)मेंदूला जखम.

२ झटका.

३) संसर्गा मुळे मेंदू मध्ये सूज येणे.

४) मेंदूत ऑक्सिजनचा अपूरा प्रवाह.

५) ब्रेन ट्युमर.

६) दारूचे अति सेवन.

७) झोप येण्याची औषधे.

८) अल्झायमर किंवा डिमेंशियासारखे मेंदूचे रोग.

९) धक्का किंवा आघात.

१०)तणाव.

उपाय:-

१)ब्रेन फूड्स खा

ज्याप्रमाणे आपल्या शरीराला पोषणाची गरज असते, त्याचप्रमाणे मेंदूलाही निरोगी राहण्यासाठी आणि योग्यरित्या कार्यरत राहण्यासाठी पोषणाची आवश्यकता असते. असे काही नैसर्गिक पदार्थ आहेत जे मेंदूसाठी आवश्यक असतात, त्या पदार्थांचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करायला हवा. ज्यामध्ये, पाण्यात भिजवलेले बदाम, मनुका, तूप, ऑलिव्ह ऑईल, अक्रोड, खजूर यासह ताज्या फळांचा वापर आहारात केल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच मसूर, बीन्स, पनीर आणि मसूर या पदार्थांतही मेंदूसाठी चांगले असतात.

२) औषधी वनस्पती

आयुर्वेदिक औषधी वनस्पती मानवी मेंदूच्या धी, धृती आणि स्मृती या तीन्ही शिकण्याच्या क्षमतांमध्ये सुधारणा करत असतात. गोटू कोला, अश्वगंधा आणि बाकोपा यांसारख्या यातील काही विशेष औषधी गुणतत्व स्मरणशक्ती वाढवण्याचे काम करतात.

३) भाज्या आणि फळांचे प्रमाण वाढवा

एका सर्वेक्षणानुसार, आपला आहार आणि आपली स्मरणशक्ती यांचा एकमेकांशी संबंध असतो. त्यामुळे जास्त प्रमाणात भाज्या आणि फळांचा समावेश आहारात केल्यास विसरभोळेपणा कमी होण्यास मदत होते.

होमिओपॅथीक उपचार पद्धती:-

होमिओपॅथीक उपचार पद्धती ने अनेक आजार बरे केले जातात. यामध्ये अल्झायमर साठी पुढील औषधांचा वापर केला जातो या मध्ये प्रामुख्याने Belladona, Calcaria phos, Alumina, Opium या औषधांचा लक्षणा नुसार वापर केला जातो. 









टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)