आर्थीक बाबतीत व्यक्ती गरीब का राहातो?
गरिबी का वाढते याची मुख्य ३ मुख्य कारणे आहेत .व ४ थे कारण पैश्याचे नियम न पाळणे. जर या व्यतिरिक्त कोणी गरीब असेल तर तो त्याच्या नशिबाचा भाग म्हणावा लागेल.
१. व्यसन -
जर व्यक्तीला दारू/गांजा सारखे व्यसन लागलं असेल तर त्याच्याकडून एखादा निर्णय घेऊन तो तडीस नेण्याची अपेक्षा ठेऊ नका. नशेडी व्यक्तीची निर्णय क्षमता खुंटलेली असते आणि तो प्रत्येक गोष्टीत पळवाट शोधतो आणि अपयशाची कारणे सांगत बसतो. पण मुख्य कारण म्हणजे त्याचे व्यसन आहे है तो कधीच मान्य करत नाही.
प्रत्येक काम तो अर्धवट सोडून देणार/एखाद्या कामाला तो वाहून घेत नाही. मन लावून एखादे काम पूर्ण करू शकत नाही. मग त्यात तोटा झाला की नसलेली कारणे सांगत बसतो आणि डबल नशा करतो.
व्यसनापासून दुर रहा गरिबी तुमच्यापासून दूर राहील.
२. दवाखान्याचा आकस्मिक खर्च -
आजकाल दवाखान्याचा खर्च खूप वाढलेला आहे. आपल्या कुटुंबातील कोणालाही कधीही एखादा उद्भवू शकतो आणि पूर्ण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळते.
त्यासाठी आरोग्य जपा. दररोज सकाळी व्यायाम आणि योग्य आहार घ्या. चांगल्या सवयी बाळगा. पालेभाज्या/फळे/दही ताक/सलाड चा आहारात समावेश करा.
जंकफूड घेऊ नका. २-३ महिन्यातून एकदा घेतले तर चालेल पण असे फूड टाळलेले चांगले.
तुम्ही केलेल्या बचतीचा नॉमिनी डॉक्टर आहे का? त्यासाठी आरोग्य विमा काढून घ्या. दवाखान्याचा खर्च आटोक्यात आणण्यासाठी खूप गरजेचे आहे.
आरोग्य विमा काळाची गरज.
३. नैसर्गिक/आकस्मिक आपत्ती-
बरेच कुटुंब घरातील कर्ता व्यक्तीच्या माघारी गरिबीत जीवन जगतात. त्यासाठी कमावत्या व्यक्तीचा विमा असणे आवश्यक आहे. आकस्मिक येणारी आपत्ती कोणावरही कधीही येऊ शकते. तुम्ही जर तुमच्या बायको मुलावर आई वडिलांवर प्रेम करत असाल तर आजच टर्म इन्शुरन्स काढून घ्या. PMSBY -PMJJY कुटुंबातील सर्व व्यक्तीचे असावे.
४. पैश्याचे नियम -
अ. वेळ अमूल्य आहे. वेळ हीच पैसा आहे. नोकरी कामधंदा मिळत नाही म्हणून बेकार राहू नका. खायला काळ आणि भूई ला भार राहू नका. काहीतरी समाज उपयोगी कामधंदा करा. काहीतरी कमवा. एक दिवस ही न कमावता बसून राहू नका.
ब. पहिला उत्पन्नाचा स्रोत पक्का झाला असेल तर नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करा.
क. झालेल्या कमाई मधील ३०% तरी बचत गुंतवणुक करा.
ड. कमाई पेक्षा जास्त खर्च करू नका.
इ. कोणालाही पैसे देऊ नका. पुन्हा आपलेच पैसे चोरासारखे मागावे लागतात.
पैश्याचे नियम शिकण्यासाठी "बेबिलोन का सबसे अमीर आदमी" हे पुस्तक वाचा.
आणि सर्वात महत्वाचे कोणालाही उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी भारतामध्ये खूप संधी आणि मार्केट उपलब्ध आहे. काम पण उपलब्ध आहे पण तुमची ईच्छा पाहिजे. बरेच जण एमपीएससी यूपीएससी परीक्षेची तयारी केलेले असतात त्यामुळे तुम्हाला प्रत्येक काम छोटे वाटते मग तुम्ही बेकारी ओढवून घेतलेली असते. हि एक प्रकारे वरवर ची कारण आता आपण काही ठळक बाबींचा आढावा घेण्याचा प्रयत्न करू यात.
एका प्रसिध्द आंतरराष्ट्रीय संस्था अक्सकॉम च्या अहवालानुसार आपल्या देशातील 10 टक्के श्रीमंतांकडे देशातील एकूण संपत्तीच्या 77.4 टक्के संपत्ती आहे. तर, देशातील 1 टक्के श्रीमंतांच्या संपत्तीत 39 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे 50 टक्के गरिबांच्या संपत्तीत फक्त 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे भारतातील 13.6 कोटी लोक 2004 पासून कर्जदार आहेत आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीत विशेष बदल झालेला नाही. एकंदरीत 'श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आणखी गरीब' ही परिस्थिती देशात तयार झाली आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या विषम विभागणीला थोड्याबहुत प्रमाणात भांडवलशाही किंमत-यंत्रणा, तर बऱ्याच अंशी भांडवलशाहीच्या आधारभूत संस्था कारणीभूत झालेल्या आहेत. समाजातील मालमत्तेच्या विषम विभाजनामुळे तसेच निरनिराळ्या व्यवसायांमध्ये आणि उद्योगधंद्यांमध्ये कामगारांना व मजुरांना प्राप्त होणाऱ्या कमीअधिक उत्पन्नामुळे आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. मालमत्तेच्या खाजगी हक्कामुळे मूठभर धनिक वर्गातील व्यक्तींना भांडवलावरील व्याज, जमिनीचा खंड, भाडेपट्टी, स्वामित्व शुल्क व भांडवलाच्या विनियोगापासून मिळणारा नफा अशा वेगवेगळ्या मार्गांनी उत्पन्न मिळते. तसेच मालमत्तेवरील वंशपरंपरागत वारसाहक्कामुळेही आर्थिक विषमतेत मोठी भर पडते.
आपल्या देशांत प्रामुख्याने तीन वर्ग दिसून येतात: एक वर्ग जमीनजुमला, मालमत्ता स्वाधीन असलेल्या धनिकांचा आणि दुसरा वर्ग मध्यमवर्गीयांचा जातीपातीच्या समाजात काही करायच्या आधी लोक काय म्हणतील हा विचार करत बसणारा पण श्रमिकवर्गापेक्षा अधिक आर्थिक स्थैर्य असलेला स्वताची थोडीफार जमीन असलेला आणि गरजेपुरत मासिक वेतन असलेला आणि शेवटचा तिसरा वर्ग म्हणजे काहीच हाती नसलेला श्रमशक्तीशिवाय दुसरे काहीच हाती नसलेल्या निर्धनांचा म्हणजे श्रमिकांचा. धनिकवर्गाला वर सांगितलेल्या अनेक मार्गांनी उत्पन्न लाभते. व मध्यमवर्गीयांना कष्ट करून गरजेइतक कमीअधिक उत्पन्न मिळवतो, याउलट तिसऱ्या श्रमिकवर्गाला केवळ मजुरी, मासिक वेतन, मेहनताना या स्वरूपात उत्पन्न मिळते.
निरनिराळ्या उद्योगधंद्यांत मजुरीचे दर वेगवेगळे असतात. वैद्यक, अभियांत्रिकी, वकिली वगैरे उच्च व्यवसायांत प्रवेश मिळविण्यासाठी शिक्षणावर बराच खर्च करावा लागतो. यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब यांना शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे अशा लायक व्यक्तींचा पुरवठा, त्या त्या व्यवसायातील मागणीच्या मानाने बराच मर्यादित राहतो. म्हणून ह्या व्यवसायांत वैयक्तिक उत्पन्नाचे प्रमाण अधिक असते. गरीब जनतेला उच्च शिक्षण किंवा प्रशिक्षण यांवर अधिक खर्च करणे परवडत नाही. वेतनातील व अर्जनातील विषमता यांमुळे निर्माण होते. समाजातील आर्थिक विषमता बहुतांशी मालमत्तेच्या विषम विभाजनामुळे व मालकी हक्काच्या परंपरागत प्राप्तीमुळे निर्माण झाली आहे. निरनिराळ्या उद्योगधंद्यांतील कमीअधिक वेतनांमुळे किंवा मजुरीच्या दरांमुळे निर्माण होणारी आर्थिक विषमता त्या मानाने मर्यादित स्वरूपाची असते.
उपाय :-
व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या गरिबी साठी स्वतः जबाबदार असते. जो पर्यंत तुम्ही स्वतः जबाबदारी घेत नाही तो पर्यंत तुम्हाला यातून कोणी काढणार नाही.
स्वतः च्या नाकर्तेपणा झाकण्यासाठी सरकार सिस्टीम समाज यांना ब्लेम करत बसू नका.
श्रीमंत माणसे आणखी संपत्ती ची वाढ़ व्हावी म्हणून अनेक मार्ग शोधून आर्थीक आवक वाढवत असतात त्यानां एकप्रकारे व्यसन असते आपण समाजात नेहमीच योग्य स्तरावर विराजमान राहिले पाहिजे आपली पुढची पिढी आनंदात ऐश्वर्या त राहिली पाहिजे म्हणून प्रत्येक माणूस स्वतःला अजमावत असतो आपले ध्येय पूर्णत्वाला नेण्यासाठी,
आणि आपण गरीब म्हणतो पण ते केवळ अज्ञान आळस ध्येय नसलेले , बुरसटलेले विचार असलेली शाल पांघरतात व ऊबदार पणा येतो म्हणून जे आहे ते संपवता व भूक लागल्यावर कामधंदा शोधतात अथवा मागणे पसंत करतात मग गरीब आणखी गरीब होतो,
थोडक्यात काय तर श्रीमंत कोसोयोजने दूरदृष्टी ठेऊन जगतात आणि गरीब म्हणवून घेणारे पायापुरते बघतात आजचे भागले उद्याचे उद्या पाहू. येथे फरक एकच आळस नसणे आणि असणे.
पाऊस पाण्याची गरज सर्व जनतेला असते. पावूस पडण्यासाठी कितीही कृत्रिम प्रयत्न जारी केले तरी जोपर्यंत ढग बाष्प/ याने भरणार नाहीत तो पर्यंत पाऊस पडणार नाही, आणि वाऱ्याच्या मदतीने हव्या त्या प्रदेशावर/इच्छीत जागेवर येणार नाहीत तोपर्यंत त्याचा उपयोग असणार नाही.
अगदी तसेच गरिबी निर्मूलनाचे आहे. सरकारने कितीही दीर्घकालीन प्रयत्न जरी केले तरी, जो पर्यंत आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार. त्यासाठी पानसाठे आधी भरले तरी पाहिजेत. त्यासाठी देशाच्या उत्पना मध्ये सातत्याने वाढ झाली पाहिजे. आणि त्यानंतर त्या उत्पना चे कार्यक्षम रित्या वितरणही झाले पाहिजे. सरकार फार फार तर ह्या वितरण प्रक्रियेमध्ये अधिकाधिक कार्य क्षमता आणू शकेल, इतकेच सरकारच्या हातात. (ते ही इच्छा असेल तर, नाहीतर स्वतःच खात राहिले तर श्री. राजीव गांधी म्हणाल्या प्रमाणे सरकारने असे वितरित केलेल्या १०० पैकी १५ च सामान्य माणसापर्यंत पोहोचतील).
इथे मुद्दाम नोंद घ्यावी असे म्हणजे सरकारही स्वतः उत्पन्न मिळवू शकते, पण सरकारचा उत्पन्न कमावणे हा मुख्य कार्य उद्देश नाही. तर त्यांनी समाज कल्याण ची कामे प्रामुख्याने केली पाहिजेत. हे उत्पन्न निर्मितीचे काम प्रामुख्याने देशातील शेती, उद्योग व्यवसायाचे असते. त्यांना चलना देणे, प्रोत्साहन देणे हे सरकारचे काम. बस इतकेच सरकारने इमाने इतबारे सातत्याने केल्यास गरिबी दूर होवू शकते.