कायम आनंदी कस राहावे? How can stay always happy?
खरं सांगायचं झालं तर माणूस हा नेहमी म्हणजेच दिवसातले २४ तास आनंदी राहूचं शकतं नाही.कारण आयुष्यात सुख/आनंद हा क्षणिक असतो,तो थोड्याश्या दुःखाणे पण संपूर्ण नाहीसा होतो.आयुष्य हे क्षणभंगुर, अनिश्चित अनेक दुःखाने,चिंतेने वेढलेले आहे. त्याला तो शाप आहे.या शापावर उपाय म्हणून निर्विकार मनाने जसे आहे तसे जीवन जगले पाहीजे ,नाहीतरी आपल्या हातात चिंता करण्यापलीकडे काय आहे ? वांझोटया चिंता करू नये. मृत्यू हेच सर्वांचे destination आहे मग माणूस बुद्धिवान असल्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित समजायला हरकत नसेल.या सर्व परिस्थितीत आपण नेहमी आनंदी कसे राहू याचा विचार या लेखाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करू यात.
१. प्रत्येक माणसाची आनंदाची परिभाषा वेगळी असते.
२.जीवनात येणाऱ्या छोटछोट्या गोष्टीतून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा.
३.तुम्हाला तुमच्या जीवनात काय केल्यावर आनंद मिळतो, त्यावर जास्त भर द्या.
४.आवडत्या व्यक्तींना वेळ द्या,त्यांच्याशी मनसोक्त बोला,मनसोक्त हसा,हवं ते करा.
५.प्रत्येक गोष्टीत,प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
६.इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी करत नशिबाला दोष न देता स्वतःला नशीबवान समजून जीवनाचा आनंद घ्या.
७.समोरच्या व्यक्तीकडून किंवा कुणाकडूनही जास्त अपेक्षा करू नका,म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख होणार नाही.
८. ज्या गोष्टी आवडतं नाही त्याकडे दुर्लक्ष करा,आणि इतरांच्या आनंदाने आनंदी व्हा.
९.जीवनात येऊन गेलेले आनंदी क्षण मनात फिरते ठेवा.
१०.आयुष्यात कधी एकटेपणा/उदास वाटल्यास आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोला,किंवा आपल्याला आवडत्या ठिकाणी किंवा शांत ठिकाणी एक फेरफटका मारून या.
११.आनंद हे दुसऱ्या व्यक्तीत, वस्तूत किंवा गोष्टीत कदापि नसते ते तुमच्या स्वतःवरच्या प्रेमात आहे. आनंदी राहायचं आहे तर स्वतःला स्वीकारा. तुम्ही जगासाठी सावळे,उंच, बुटके,बेरोजगार, आळशी,एकटे आहात पण स्वतःसाठी आदर्श बना. तुमचा संघर्ष फक्त तुम्हाला माहित आहे तर स्वतःशी प्रामाणिक राहा.आनंदी होण्यासाठी स्वतः जसे आहात तसे स्वीकारा दुसऱ्याचे अनुकरण करू नका
१२.विचार करा यापूर्वी तुम्ही आनंदी कधी होता? नवीन नौकरी, तुम्ही मिळवलेली डिग्री, तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला जास्त आनंदी ठेवते का? मला विचारालं तर यामधले आनंद क्षणभंगुर असते. आनंद कधीच दुसऱ्याचे अनुकरण करण्यात, दुसऱ्या व्यक्तीत किंवा मिळवलेल्या खोट्या प्रतिष्ठेत नसते तर आनंद हा शोध आहे. एक आशा आहे. स्वतःशी प्रेमळपणे वागण्यात आनंद आहे. तुम्ही स्वतःच्या बळावर जे व्यक्ती बनत आहात त्यात आनंद आहे.
सकाळी लवकर उठून व्यायाम करा. एक कमवलेले शरीर तुम्हाला जगण्या वागण्यात जो कॉन्फिडन्स देतो ते कुठलाच मोबाईल,गाडी देऊ शकणार नाही.
१३)चांगली नाती बनवा चांगला जोडीदार, मित्र, परिवार या मुळे तूम्ही एक सुखी आयुष्य जगाल. नवीन लोकांना भेटा, बोला. सोशल सर्कल बनवा.
१४)उत्तम रसिक बना संगीत, चित्रपट याची आवड निर्माण करा. छंद बाळगा, पुस्तकं वाचा.
१५)निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जात जा. ट्रेकिंग करा. मेडिटेशन करा.
१६)क्रिकेट, फुटबॉल किंवा असाच एखादा मैदानी खेळ खेळत जा. स्विमिंग करा.
१७)पुरेसे पैसे कमवा आणि अनावश्यक गोष्टींवर खर्च टाळा, कर्ज करू नका, बचत करा.
१८)रुचकर पण पोषक आहार घ्या जीभ आणि तब्येत दोघांचा समतोल साधा.
१९)व्यसनं टाळा. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो शिवाय आपल सुख एखाद्या व्यसनावर अवलंबून ठेवू नका.
या उपयांचा आपण अवलंब केला तर आपणास नक्कीच फायदा होईल.